मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

“आध्यात्मिक काय किंवा विज्ञानातली काय मूळ तत्त्वं भाषातीत असतात. त्यांना भाषेचं बंधन नसतं.

कॅल्क्युलसचा शोध थोडा मागंपुढं पण एकाच काळात इंग्रज न्यूटनला आणि जर्मन लाइब्निट्झला लागला. युक्लिडेतर (non-Euclidean) भूमितीचा शोध साशेरी (इटालीय), लांबेर (फ्रेंच), गाउस (जर्मन), लोबाशेव्स्की (रशियन) आणि योहान बोल्याए (हंगेरीय) ह्या पाच वेगवेळया भाषांतील गणित्यांना सामान्यतः एकाच काळात पण, टप्प्याटप्प्यानं लागत गेला. विशेष म्हणजे ह्या भूमितीच्या शोधात इंग्रजांचा कसलाच हातभार लागला नाही. मग मुळातून वाचता आलं पाहिजे ह्याचा अर्थ, ह्या सर्व भाषाही प्रत्येकानं बालपणीच शिकायच्या का?”

प्राध्यापक मनोहर राईलकर यांचा उच्चभ्रूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आणखी एक लेख. पूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_मातृभाषेचं मानवी जीवनातील स्थान_ले० प्रा० राईलकर

.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.

.

– अमृतयात्री गट

.

ता०क० याच विचारसूत्राशी संबंधित असे आणखी काही लेख आपण खालील दुव्यांवर वाचू शकता.

https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/03/शहाणा-भारत-आणि-वेडा-जपान-ल/

https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

.

Tags: ,,,,

.

9 thoughts on “मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

  1. सप्रेम नमस्कार,
    माता, मातृभूमि आणि मातृभाषा बद्दल चे आदर प्रत्येकाचे मर्मस्थळ असते असे मला वाटते. ‘मूळ तत्त्वं भाषातीत असतात. त्यांना भाषेचं बंधन नसतं’, पण खालील गोष्टींवर नज़र घाला –
    – आपल्या आयुर्वेद चिकित्सा शिक्षणाला व पदवीला जागतिक पातळीवर मान्यता मिळावे म्हणून फ़क्त इंग्रजी माध्यमातून या पुढे आयुर्वेद शिकता येईल असे प्रशासनाने ठरविल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच ‘लोकसत्ता’ मध्ये पाहिल्याचे आठवते.
    – सोफ्टवेर च्या क्षेत्रात भारतात खूप प्रगती झाली आणि जागतिक पातळीवर भारतीयान्नी तर खूप-खूप यश गाठले असे ऐकतो खरे, पण अजून ही आपल्याला इन्ग्रज़ीचे ज्ञान नसले तरी वापरता यावे असे मशीन उपलब्ध झालेले नाहीत. मशीन इंग्रजी समजत नाही (फ़क्त ० & १ समजते) हे सगळ्यान्ना माहीत आहे तरी आपल्या भाषेत काम करायचे तर application software, operating system, BIOS इत्यादि इंग्रजी दलाल आहेतच. कुठे काही चुकले किंवा विघ्न पडले तर तेच इंग्रजीत मेसेज येतांत। C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का? भारतीय भाषांत प्रोग्राम्मिंग (कम्पायलर) आहेत काय?
    – घंटी ऐकून फोन उचलल्यावर किती जण (किती टक्के?) ‘हेलो’ ऐवजी आपल्या भाषेत काही म्हणतांत? मी सुद्धा वेगळे काही म्हणत नाही.
    -फ़क्त मेडिकल स्टोर च नावच का मराठीत लिहिलेलं असावं? औषध काय घेतोय हे देणार्यावर विश्वास ठेवूनच का घ्यावे? हा तर खरा अँधविश्वास.
    या भाषांच्या घोळात आपण भारतीय काय पीड़ा सहन करतोय हे आपल्यालाच ठाऊक. ज्या भाषेत बोलत असतो त्या भाषेतले शब्दच कित्येकदा त्या क्षणी आठवत नाहीत. बोलतान्ना डोक्यावर ताण पड़ते. हुशार मंडळी झकास अश्या वेळी इतर भाषांतले शब्द वापरतांत तर काहींना विकार पड़तांत, दोषयुक्त बोलण्याने कमीपणा भासत असतो.
    या उलट इंग्रजीचे ज्ञान मोठ्या कंपन्यांना आपुले माल (व आपल्याला बुद्धि ?) विकायला सोपे मार्ग प्रशस्त करते (तितकाच मार्केटिंगचा खर्च वाचतो – मूळ तत्त्वं भाषातीत असतात !) ??

    • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      {{- सोफ्टवेर च्या क्षेत्रात भारतात खूप प्रगती झाली आणि जागतिक पातळीवर भारतीयान्नी तर खूप-खूप यश गाठले असे ऐकतो खरे, पण अजून ही आपल्याला इन्ग्रज़ीचे ज्ञान नसले तरी वापरता यावे असे मशीन उपलब्ध झालेले नाहीत. मशीन इंग्रजी समजत नाही (फ़क्त ० & १ समजते) हे सगळ्यान्ना माहीत आहे तरी आपल्या भाषेत काम करायचे तर application software, operating system, BIOS इत्यादि इंग्रजी दलाल आहेतच. कुठे काही चुकले किंवा विघ्न पडले तर तेच इंग्रजीत मेसेज येतांत। C-DAC, पुणे इथे तरी भारतीय भाषांत ‘source code’ लिहिला जातो का? भारतीय भाषांत प्रोग्राम्मिंग (कम्पायलर) आहेत काय?}}

      बिहारमधील परिस्थिती अत्यंत हलाखीची, रोजगाराची परिस्थिती बिकट व एकूण जीवनाचा स्तर बराच खालचा असल्यामुळे बिहारी लोक मुंबईत येऊन येथील इतरांच्यापेक्षा कमी पैशात कामे करतात व त्यातूनही पैसे वाचवून ते पैसे बिहारला नेऊन तिथल्या नातेवाईकांच्या समोर ऐट करतात. सॉफ्ट्वेअरवाले फार वेगळे नाहीत. मजूर पाठवून कितीही पैसे कमावले तरी भारताने स्वतः डिझाईन करून सॉफ्टवेअरमध्ये फारशी उत्पादने (products) बनविलेली नाहीत, प्रचालन प्रणाली (operating system) सारखे सॉफ्टवेअर तर जवळजवळ नाहीच. अगदी इंग्रजीतही नाही, भारतीय भाषांचे तर राहू द्या. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये केवळ पैसे कमावले म्हणूण आपण फार मोठे झालो हा गैरसमज आहे. चीन, इस्रायल, जपान, जर्मनी व इतर अनेक देशात उपयोजकास (user) इंग्रजीचे ज्ञान नसले तरी सर्व सूचना स्थानिक भाषेत मिळू शकतात. इतकेच नव्हे तर त्यातील अनेक सुविधांचे स्वरूप स्थानिक आवश्यकतांप्रमाणे, रीतिरिवाजांप्रमाणे बदलले जाते. यालाच सॉफ्टवेअरचे स्थानिकीकरण (localisation) म्हणतात. विंडोज किंवा इतर जगन्मान्य प्रणालींमध्ये भारतीय भाषांचे पर्याय नसले तरी Estonian, Faeroese, Icelandic, Indonesian, English (Trinidad), Maori अशा अनेक लहानसहान भाषिकसंख्या असणार्‍या भाषांचे पर्याय असतात. त्याला कारण एकच आणि ते म्हणजे तेथील देशांना असलेला आपल्या भाषांबद्दलचा अभिमान व त्यासाठी ते विविध क्षेत्रात घालत असलेला दबाव.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. वैचारिक लिखाणात बोलीभाषा वापरणे म्हणजे इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात स्लॅंगबोलीत लिखाण करणे आहे, हे मनोहर राईलकरांना माहीत असायला हरकत नाही. बोलीभाषा ही एका लहान क्षेत्रात राहणार्‍या छोट्या लोकसंख्येची बोलायची भाषा असते. तिच्यात केलेले लिखाण ज्यांच्या मूळ प्रमाणभाषेची ती बोली आहे, त्या सर्व भाषकांना समजतेच असे नाही. त्यामुळे आपले लिखाण सर्व मराठीभाषकांना समजावे असे वाटत असेल तर, राईलकरांनी ते प्रमाणभषेत लिहिण्याची मेहेरबानी करावी. बोली भाषेत तशी खास गरज़ नसताना केलेले लिखाण हे निर्विवादपणे अशुद्धलेखन समजले जाते.

    भाषांच्या संदर्भात आपल्या देशाची जगातल्या कुठल्याच देशाशी तुलना होऊ शकत नाही हे माहीत असताना, इस्रायल, जपान, जर्मनी यांची नावे लेखात लिहिणे अनाकलनीय आहे. जगातल्या कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, हे मी अनेक उदाहरणे देऊन यापूर्वी अनेकदा सिद्ध केले आहे.
    मराठी पहिलीपासून इंग्रजी शिकावे असे राज्यसरकारचे मत आहे, सर्व विषय इंग्रजीत शिकवावे असे नाही. त्यामुळे त्यावर केलेली चर्चा व्यर्थ आहे.

    महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे सर्वात जास्त नुकसान इथल्या शिक्षणतज्‍ज्ञांनी केले आहे हे निश्चित. म्हणून इतर अनेक प्रांत या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा सरस आहेत. आपल्या मुलांनी काय आणि कसे शिकावे हे शिक्षणतज्ज्ञांपेक्षा पालकांना अधिक चांगले कळते.

  3. लेखातले विचार अतिशय़ सुसंगत आहेत.
    ते कळले तरी वळवताना आपणच आडकाठी घालतो य़ाचं कारण सवय़ व भिती.
    विचार प्रामाणिक व सत्य असल्यामुळे विचारांच्या दिशेने जाण्यात सर्वांचं हित आहे असं मला वाटतं.

    • प्रिय डॉ० नीना आंबेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे योग्य वाटते. पण यातून आपण प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर निश्चयाने, जिद्दीने मार्ग काढला पाहिजे. सर्वच कृती इतर कोणीतरी करावी म्हणून बाजूला ठेवली की काहीच घडत नाही. जे बुद्धीला पटतं, जे सत्य, प्रामाणिक आहे याची खात्री वाटते, ते आपण प्रत्यक्ष कृतीत आणू शकत नसलो तर स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून घेण्यास आपण लायक ठरतो का?

      जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, अगदी भारतातील थोर नेतेसुद्धा (उदा० रवींद्रनाथ टागोर, लो० टिळक, महात्मा गांधी, स्वा० सावरकर असे अनेक), शिवाय शैक्षणिक धोरणाविषयीचा कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता आयोग, भावनिक एकात्मता परिषद, अशा अनेक विद्वानांनीही तेच सांगितले आहे. जगभरातील शेकडो उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण आपल्या मेंदूवरील दास्यवृत्तीचा अंमल अजून उतरत नाही आहे. उलट त्याची नशा अधिकच वाढत आहे.

      या अमृतमंथन अनुदिनीवर देखील आपण बरेच लेख प्रसिद्ध केले आहेत. मासल्यासाठी खालील लेख वाचून पहा. आपली मतेही अवश्य या विचारपीठावर मांडा.

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.