संगणित: संगीतातील स्वरांचे गणित (ले० प्रा० मनोहर राईलकर)

संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती आज सापडणे कठीण. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील अनेक गूढ, तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. ‘सा’ म्हणजे काय? संवादिनीच्या (बाजाच्या पेटीच्या) कुठल्याही पट्टीला ‘सा’ म्हणता येईल असं म्हणतात, ते कसं? वरचा सा, खालचा ‘सा’ म्हणजे काय? एखादा गायक ‘काळी एक’ या पट्टीमध्ये गातो तर एखादी गायिका ‘काळी तीन’ या पट्टीत गाते; असे कधीकधी ऐकू येते, त्याचा अर्थ काय? पाश्चात्य स्वर व भारतीय स्वर यांमध्ये साम्य व भेद कोणते? असे अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्याला पडत असतात, पण आपल्याला ते समजण्यातले नाही असा विचार करून आपण ते कुतूहल तसंच दडपून टाकतो. पण संगीतशास्त्रातील स्वरांच्या गणिताबद्दलच्या खालील लेखामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.

Read More »

पुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ले० अभिजीत थिटे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

तेजशलाका इरेना सेंडलर

लेखक: अभिजीत थिटे

अमेय प्रकाशन, पृष्ठे: ११६, मूल्य: १५० रुपये

होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे “कर्तृत्व” पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून? मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील? ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.

Read More »

पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगती – स्वाभिमान ते निरभिमान

आपले एक पुण्याचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी सांगितलेला एक भावपूर्ण अनुभव. वाचून पहा आणि आपल्या भावना अवश्य कळवा.

—————————————

प्रिय मराठी बांधवांनो,

सप्रेम नमस्कार.

मी मध्यंतरी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. तिथून एके दिवशी मराठी माणसाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक अशा पन्हाळगडाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे वर्तमान यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे, केवळ ऐहिक प्रगतीच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी मूलभूत स्वभाव वैशिष्ट्य़ांमध्येसुद्धा. स्वदेश व स्वसंस्कृतीसाठी दिल्लीच्या मोगलाईशी प्राणपणाने लढणारा मराठी माणूस आज दिल्लीश्वरांपुढे गोंडा घोळण्यात धन्यता मानतो. फारशी, अरबी भाषांमधील शब्दांच्या आक्रमणापुढे मराठी भाषा लोप पावण्याची भीती ओळखून मराठीभाषाशुद्धीसाठी मराठीतील (बहुधा देशातील) पहिला राजव्यवहार शब्दकोश बनवून घेणार्‍या पराकोटीची दूरदृष्टी असलेल्या शिवछत्रपतींचे वंशज म्हणवणार्‍या आपणाला आज आपल्या राज्यात आपल्या मायबोलीची व संस्कृतीची पूर्णपणे उपेक्षा करून इंग्रजी आणि हिंदी भाषांची जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नांबद्दल काहीही खंत न वाटता उलट त्यात प्रतिष्ठा वाटते.

हा टोकाचा परस्परविरोध मला पन्हाळा-भेटीत अधिक प्रकर्षाने जाणवला व त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता लक्षात येताच शरमेने मान खाली झाली.

माझी ही रडकथा तुम्हालाही ऐकवावी व माझ्या दुःखात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हे पत्र लिहित आहे. (आनंद एकटाच उपभोगावा आणि दुःखात मात्र वाटेकरी शोधावे असा माणसाचा स्वार्थी स्वभाव असतो, त्यालाही हे धरूनच आहे म्हणा.)

पन्हाळा हे कोल्हापूरपासून केवळ २० कि०मी०वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुमारे ४००० लोकवस्तीचे एक गाव. क्षेत्रफळ विस्तीर्ण म्हणजे ४०० एकराचे असले तरीही तसे हे खेडेच. जमीन ही काळ्या कातळाची व जांभा दगडाची असल्यामुळे शेती अशी नाहीच. गुरांना चरायलाही फारशी माळराने नाहीत. पाण्यासाठी विहीरी मात्र बर्‍याच आहेत असे म्हणतात. पण एकंदरीत शेती व दूधदुभत्याच्या अभावामुळे येथील स्थानिक जनता उदरनिर्वाहासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यतः पर्यटनावरच अवलंबून. पण पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ऋतुकालावर अवलंबून (seasonal) असल्यामुळे एकंदरीत तशी गरीबीच आढळते. शिक्षणाचे प्रमाणही फार नसावे. एकूण लोकसंख्येपैकी बरेच मुसलमान आहेत आणि तेही शिवाजी महाराजांवर प्राणापलिकडे निष्ठा असणारा व त्यांच्यासाठी बलिदान करणारा पन्हाळ्याचाच सिद्दी वाहब (महाराजांचा अंगरक्षक सिद्दी हिलाल याचा मुलगा) याच्या नावाने शपथ घेणारे. सर्वांची मातृभाषा, (पितरभाषासुद्धा) मराठीच.

Read More »

मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स)

प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,

आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.

Read More »

स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे….

वरील विषयावर आम्हा मराठीप्रेमी मित्रांच्या रिंगणात चर्चा चालली असताना खालील मते मांडली गेली. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? जरूर लिहा.

श्री० सलील कुळकर्णी म्हणाले:

१. स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा, विशेषतः भय्या मंडळींपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. पण मराठी आणि परप्रांतीयांशी तुलना करताना फक्त एवढीच गोष्ट लक्षात न घेता या भोवतीची इतर संबंधित वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

Read More »

पुस्तक ओळख – ’नीलची शाळा’ (ले० ए० एस० नील)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

नीलची शाळा

लेखक: ए० एस० नील

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये

एक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. ‘आज्ञाधारकता’ हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकडे कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो ‘शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त’ असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.

Read More »

पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये

पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:

मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.

तुमचं कविता लेखन काय म्हणतय?

उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!

Read More »

पुस्तक ओळख – ‘व्हाय नॉट आय?’ (ले० वृंदा भार्गवे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

व्हाय नॉट आय?

लेखिका: वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.

जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, “डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. ”

मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

Read More »