जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,

जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?

Read More »

पुस्तक ओळख – केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ (संपादक: विलास खोले)

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

संपादक : विलास खोले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे: २३८, मूल्य: २५० रूपये

केशवराव कोठावळे ( २१ मे १९२३ – ५ मे १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.

Read More »

पुस्तक ओळख – ‘मराठी बोलू कौतुके…’ (मुंबई मराठी साहित्य संघ)

एका नवीन उत्तम पुस्तकाबद्दल माहिती वाचल्यावर ती आपणा सर्वांपर्यंत पोचवावीशी वाटली म्हणूनच हा प्रपंच.

दैनिक सकाळ, बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ मधील वृत्त:

साहित्य संघाचाही मराठीचा झेंडामराठी बोलू कौतुके…

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानोबा-तुकोबांची ‘अमृताते पैजा जिंके’ म्हटल्या जाणार्‍या मराठी भाषेचे वैभव सांगणार्‍या एका देखण्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली आहे. ‘मराठी बोलू कौतुके…’

या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे (शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी भाषा), डॉ. सदानंद मोरे (तुकारामाचे काव्य आणि मराठी भाषा), डॉ. मो. दि. पराडकर (पंडिती काव्याचे मराठीला योगदान), डॉ. रामचंद्र देखणे (लोककाव्य आणि मराठी भाषा) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान) आदी लेखकांनी मराठीविषयीचे चिंतन केले आले आहे.

Read More »

’इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाविषयी वाचकांच्या काही उल्लेखनीय प्रतिक्रिया

‘इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल श्री० सलील कुळकर्णी यांनी केलेले विवेचन.

—————-

प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,

सप्रेम नमस्कार.

काही महिन्यांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत केलेल्या भाषणाबद्दलचा लेख मला पुण्यातील आमचे ज्येष्ठ सुहृद प्रा० राईलकर यांच्याकडून मिळाला. प्रा० राईलकर हे आमच्या दृष्टीने समर्थ रामदासांप्रमाणे ऋषितुल्य गुरू व मार्गदर्शकच आहेत. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्यास मिळते हे माझे मोठेच भाग्य!

वाजपेयींच्या भाषणामध्ये इंग्रजांनी ६०० वर्षांच्या आपल्या भाषाविषयक न्यूनगंडावर व मानसिक दास्यत्वावर निश्चयाने कसा विजय मिळवला याबद्दलचा उल्लेख वाचला व माझे कुतुहल मला स्वस्थ बसू देईना. इंग्रजांची सतराव्या शतकातील मानसिक स्थिती व आपली आजची स्थिती यात मला अनेक बाबतीत विलक्षण साम्य वाटले व ह्याबद्दलची सर्व माहिती जमवून आपल्या मराठी बांधवांसमोर ठेवलीच पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.त्याबद्दलची माहिती महाजाल, वाजपेयींनी संदर्भित केलेले पुस्तक इत्यादी स्रोतांमधून मिळवली व मग प्रस्तुत लेख तयार केला.

Read More »

राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय? (मराठी अभ्यास केंद्राचे निवेदन)

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हल्लीच पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील मराठीविषयक आग्रही भूमिकेबद्दल केलेल्या दिशाभूल करणार्‍या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेले निवेदन.

Marathi Abhyas Kendra (12th October 2009)

We refer to the misleading comments of Prime Minister Manmohan Singh and Congress President Sonia Gandhi made during the recent election campaigning in Maharashtra, wherein they emphasised that they treat all the languages in India as equal and having pride for one’s language and considering it above other languages is tantamount to divisive politics. In this context we have a doubt.

Read More »

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)

आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल.  

Read More »

मराठी शाळांची थडगी उभारण्याचं धोरण थांबवा (ले० प्रा० दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र)

भारतातील सर्व भाषाभिमानी राज्यांनी आपापली राज्यभाषा शालेय शिक्षणात (पाचवी ते दहावी) सक्तीची केलेली आहे. तेथील राज्यशासन बहुजनसमाजापर्यंत ज्ञान पोचवण्याच्या दृष्टीने स्थानिक भाषेतील शाळांना व महाविद्यालयांना जास्तीतजास्त मदत करतात. भाषाभिमानाच्या बाबतीत कुठलाही पक्ष मोडता घालू शकत नाही, अगदी कॉंग्रेस व कम्युनिस्ट पक्ष देखिल. मात्र महाराष्ट्रातील परंपरेनुसार स्वभाषा आणि स्वसंस्कृती याबद्दल पूर्णपणे अनास्था आढळते. आपण परक्यांची खुशामत करण्यातच ’यशवंत’ होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच धन्यता मानतो.

प्रा० दीपक पवार, (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र) यांनी लिहिलेला खालील लेख पहा.

Read More »

पुस्तक ओळख – ’प्रिय जी. ए.’ (ले० सुनीता देशपांडे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

प्रिय जी. ए.

लेखिका: सुनीता देशपांडे

मौज प्रकाशन गृह, पृष्ठे: १८६, मूल्य: २०० रूपये

नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे

दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे

अशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का? तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो? कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का? तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ टिकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा! म्हणजे निश्चित असं आपण काहीच नसतो.  त्या त्या क्षणी ते ते असतो. तेव्हा ही वैफल्याची जाणिव खरी आहे, तितकंच तिच्यावर स्वार होऊन माणसं दौडत फार मोठा पल्ला गाठू शकतात हेही खरं आहे. कारण शेवटी काहीच खरं नाही तसं काही खोटंही नाही हेच खरं आहे.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com