हिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.

Read More »

क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)

विश्वरचनेच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञान आणि अध्यात्म आपल्या परीने लाखो वर्षे करीत आहेत. विज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञानात गेल्या दोन शतकात झालेल्या विस्मयकारक प्रगतीने साऱ्यांना केवळ थक्क करून सोडले आहे, असे नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याचा तो एकमेव मार्ग असल्याचा भ्रमदेखील निर्माण केला आहे. प्रयोगसिद्धता, सातत्य आणि सार्वकालिकता ही विज्ञानाची बलस्थाने होती. व्यक्तिगत अनुभूति आणि अनुभव ह्यांना त्यात स्थानच नव्हते. कारण त्यातून येणारे निष्कर्ष अवैज्ञानिक ठरवून ते नाकारण्याकडेच वैज्ञानिक जगताचा कल होता. पण, आता आपल्याच चाचण्या, कसोट्या, प्रयोग हे अंतिम सत्यापर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत याची जाणीव वैज्ञानिक जगतास झाली आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान तत्त्वज्ञानातून याचे किमान सूत्र तरी सापडेल अशा आशेने वैज्ञानिक जगत भारतीय ज्ञानमार्गाच्या अभ्यासाकडे वळले आहे. भारतीय असेल ते त्याज्य आणि पाश्चात्त्य असेल ते शुद्ध वैज्ञानिक अशा भ्रमातून बाहेर येऊन आपणदेखील भारतीय विचारदर्शन नव्यावैज्ञानिक प्रगतीस मार्गदर्शक कसे ठरेल ह्याचा विचार करायलाच हवा. भारतीय संशोधनासमोरचे हे खरे आव्हान आहे. ब्रह्म आणि जगत यांतील अद्वैताचा आता वैज्ञानिक अंगाने शोध घेतला जाणार आहे. जागतिक वैज्ञानिक संशोधनाच्या केंद्रस्थानी परतण्याची भारतीय संशोधकांना ही फार मोठी संधी आहे.

Read More »

Heisenberg, Quantum Physics and Indian Philosophy

न्यूटनने (Newton) मांडलेल्या आधुनिक वैज्ञानिक तत्त्वज्ञानाची चौकट आईनष्टाईनच्या सापेक्षतावादाच्या उपपत्तीने (Theory of Relativity) मोडून टाकली. न्यूटनचे जडवादी, द्वैतवादी (ऊर्जा आणि द्रव्य ह्यांचे शाश्वत संधारण – conservation of energy and mass अशा) विचारांवर आधारित असणारे सर्व मूलभूत सिद्धान्त सापेक्षवादामुळे कोलमडून पडले आणि आईनष्टाईनने पूर्णतः आगळ्यावेगळ्या प्रकारच्या, सामान्य माणसांना अशक्य आणि काल्पनिक वाटेल अशा वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. आणि त्यावरच पुढील (श्रॉडिन्जर, बोहर, हायझेनबर्ग इत्यादी) श्रेष्ठ पदार्थवैज्ञानिकांनी पुंजकणवादाची उपपत्ती (Quantum Theory) अधिकाधिक विकसित केली. ही उपपत्ती भारतीय तत्त्वज्ञानाच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या (सर्वं खलु इदं ब्रह्म) आणि विश्वाच्या पूर्णत्वाच्या सिद्धान्ताच्या (पूर्णमदः पूर्णमिदं…) अगदी जवळ जाते.

Read More »