उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गिरीश कुबेर, दै० लोकसत्ता)

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं हे असं वास्तवाचं भान सुटावं अशी प्रत्येक राज्यकर्त्यांचीच इच्छा असते. अशा काळात करमणुकीला अतोनात महत्त्व येतं. कला आणि करमणूक यातील भेद कळायची कुवतही समाज हरवून बसतो.

Read More »

क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११)

४ एप्रिल २०११. आज गुढी पाडवा. मराठीजनांचा नववर्षारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या शुभदिनी आपल्यापैकी काही जण सोने-दागिने खरेदी करतील किंवा घरात काही मौल्यवान चीजवस्तू खरेदी करतील. अशा वेळी मोठी रक्कम तर आपण खिशात घेऊन फिरत नाही. आणि त्यामुळे पैसे भरताना जर आपण क्रेडिट कार्डाचा (पतपत्रिकेचा) वापर केला तर तो व्यापारी बेकायदेशीररीत्या आपल्याकडून व्यवहाराच्या किंमतीच्या दोन-चार टक्के अधिशुल्क वसूल करण्याची शक्यता आहे. त्या संबंधात खालील लेख अवश्य वाचा.

Read More »