मायबोली मराठी भाषा दिन – नैमित्तिक नव्हे, नित्यच पाळावा

आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे आपल्या मायबोली मातेचा विचार असायला हवा. त्यासाठी जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा, जितके काही शक्य असेल ते सतत करीत राहिले पाहिजे. त्यातूनच एक मोठी चळवळ उभी राहू शकेल, एक मोठी क्रांती घडू शकेल.त्यात आपल्याला आपल्या मातेचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल व शांतपणे शेवटचा श्वास घेण्याच्या वेळी आपली सदसद्विवेकबुद्धी आड येणार नाही. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मग आपणही म्हणू शकू, “याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा”.

Read More »

पोलिसांची ‘भाषा’ (दै० सकाळ, मुक्तपीठ, १५ फेब्रु० २०१०)

वाटले, यात बिचार्‍या कानडी पोलिसांची काय चूक, त्यांना हिंदी येत नसेल तर ते काय करणार? पण आम्हीच वेडे ठरलो. त्यातील एक हवालदार चौकीबाहेर आल्यावर आमच्याशी हिंदीतून बोलला आणि त्याने सांगितले, “इथे सर्वांना हिंदी येते, पण कोणीही बोलणार नाही. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान आहे.”

Read More »

’मायबोली मराठी भाषा दिन’ व ’मायबोली मराठी सप्ताह’ साजरा करण्यासाठी कार्यक्रम (वृत्त व आवाहन)

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय?

Read More »

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

Read More »

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचनांसाठी ’मराठी+एकजूट’ द्वारा आवाहन

महाराष्ट्र शासनाने डॉ० आ०ह० साळुंखे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सादर केला आहे आणि त्या समितीने – म्हणजेच पर्यायाने शासनाने – जनतेला दि० २८ फेब्रुवारी २०१०पर्यंत सदर मसुद्यावरील सूचना पाठविण्यास सांगितले आहे. आपण ह्या मसुद्याच्या अनुषंगाने, त्यात आपण सुचवू इच्छित असलेल्या सर्व सूचना आमच्याकडे विरोपाने (ई-मेलने) पाठवून द्याव्यात अशी ’मराठी+एकजूट’ द्वारा आम्ही विनंती करतो. ’मराठी+एकजूट’कडे आलेल्या सूचनांचे मान्यवरांच्या सहाय्याने एकत्रित संकलन करून, त्यात आवश्यक तिथे मान्यवरांचे स्पष्टीकरण/भाष्य जोडून, ते ’मराठी+एकजूट’च्या सूचना करणार्‍या सहकार्‍यांच्या नामनिर्देशासह शासनाच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीला सादर केले जाईल.

Read More »

संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर)

फेसबुक, ऑरकुट, महाजालावरील विविध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात.  वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keyboard) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलब्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत.  मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. ही सर्व माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.

Read More »

खासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत (वृत्त: दै० सकाळ, १२ फेब्रु० २०१०)

आज उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवणार्‍या महाराष्ट्रातील कुठल्याही खासगी शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यादीवर दृष्टी टाकल्यास त्यात बेकायदेशीरपणे ५० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या प्रमाणातील मुले महाराष्ट्राबाहेरील आहेत हे सहजच समजून येते. यावर कदाचित आता अंकुश ठेवता येईल.

Read More »

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.

Read More »

मायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)

आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वाभिमानाचा बळी देण्याबद्दलची उदाहरणे आज आपण महाराष्ट्रात सतत पाहत असतो. राजकीय स्वार्थापुढे परक्याचे जोडेही शिरसावंद्य मानण्याची काही तथाकथित नेत्यांची हुजुरेगिरीची संस्कृतीही आपल्याला आता फार नवीन राहिलेली नाही. पण स्वभाषाभिमानापुढे व्यावसायिक फायद्यालाही दुय्यम स्थान देणे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडतील काय आणि घडलीच तर त्याचे इतर मराठी माणसे कौतुक करतील की संकुचितपणा म्हणून हेटाळणी करतील?

Read More »

विद्येच्या माहेरघरात रोवली मराठी एकजुटीची मुहूर्तमेढ (वृत्त: दै० लोकसत्ता, ०१ फेब्रु० २०१०)

“मराठीच्या नावाने राजकीय घटक सरसावून पुढे येत असले तरी जोपर्यंत नागरिकांची समर्थशक्ती उभी राहत नाही, तोपर्यंत मराठीच्या बाजूने न्यायाचा कौल पडणार नाही. त्यासाठीच अशा चळवळींची गरज आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.”

Read More »