All the legal rights, respect and importance, granted by the statute to other official languages in their respective states must also be conferred upon Marathi in Maharashtra. “We do not ask for anything more, but we shall not settle for anything less too”. Can such a demand be termed as improper, illegal or immoral by any standards?
एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)
भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत; हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो. या सर्व विधानांमध्ये काही विरोधाभास आहे असे आपल्याला वाटते का? त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे आणि म्हणूनच मी भारतीय आहे व या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही विधानेही सुसंगतच आहेत, हे मनाला स्पष्टपणे उमगायला हवे.
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.
भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल.
एक देश, एक भाषा कशासाठी? (ले० प्रा० प्रकाश परब, म०टा० दि० २९ सप्टें० २०१९)
भारताला राष्ट्रभाषा नाही आणि तिची आता गरजही नाही. राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केलेल्या सर्वच भारतीय भाषा राष्ट्रीय महत्त्वाच्या भाषा आहेत. हिंदी आणि इंग्रजी ह्या भारतीय संघराज्याच्या राजभाषा म्हणजे प्रशासकीय कामकाजाच्या भाषा आहेत. स्वीत्झर्लंडसारख्या छोट्याशा देशांमध्ये चार चार अधिकृत भाषा गुण्यागोविंदाने नांदू शकतात तर भारतासारख्या देशात बावीस भाषा किंवा त्यांहूनही अधिक भाषा समान दर्जाने सहज नांदू शकतात.
बालभारतीपुरस्कृत अभिनव मराठी संख्यावाचनपद्धतीबद्दल काही शंका (ले० सलील कुळकर्णी)
“लोकांच्या मनातील सर्व शंकांना बालभारतीकडे समाधानकारक उत्तरे नसल्यास त्याचा अर्थ असा होईल की बालभारतीने त्यांच्या निर्णयापूर्वी पुरेशी तयारी न करता घाईने निर्णय घेतला आहे. बालभारतीने लक्षात घ्यायला हवे की भाषेतील संख्यानामवाचक शब्द बदलणे हा मुद्दा केवळ बालभारतीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील गणिताचे धडे आणि शालेय गणिताची परीक्षा एवढ्याशीच संबंधित नाही. तो मुद्दा मराठी समाजाच्या पुढील सर्व पिढ्यांच्या भाषेशी आणि जीवनव्यवहाराशी संबंधित आहे. त्यामुळे मुख्यतः भाषेशी संबंधित असलेला हा निर्णय बालभारतीने पुरेशा भाषाशास्त्रीय पुराव्याशिवाय आणि प्रयोगाधारित पाहणीशिवाय, केवळ काही गणिततज्ज्ञांच्या सल्ल्यावरून घेणे चुकीचे आहे. तेव्हा बालभारतीने सध्या हा निर्णय रद्द करून त्याविषयी पुन्हा विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत, तसेच व्यवस्थित संशोधन, प्रयोग व पाहणी करावी आणि त्या संबंधातील सर्व माहिती जनतेपुढे सादर करून त्याबद्दलच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात आणि जनतेच्या शंकांचे समाधान करावे. त्यानंतर जनतेचे मत अनुकूल असल्यास बालभारतीने शासनाची अनुमती घेऊन मग संख्यानामांत बदल करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही.”
गांधीहत्या, कपूर आयोग व सावरकर – भाग १ (ले० अक्षय जोग)
आयोगाचे निष्कर्ष वा त्याच्यासमोरील पुरावे न्यायालयावर बंधनकारक नसतात. न्यायालय ते फेटाळू शकते, पण न्यायालयाचे निर्णय फेटाळण्याचा वा त्यांना चुकीचे म्हणण्याचा अधिकार आयोगाला नसतो. कपूर आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले, तरीही विशेष न्यायालयाचा निर्णयाधिकार त्यांच्या आयोगापेक्षा वरचढच असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुध्द सरकार अपिलात गेलेच नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.
इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)
प्रास्ताविक: विज्ञानाच्या परिभाषेकरता इंग्रजी शब्द घ्यायला हरकत नसावी, असं पुष्कळ विद्वानांना वाटतं. एके काळी मलाही तसं वाटत असे. पण, जपानची अफाट प्रगती पाहिली आणि त्यामागचं विश्लेषण कळलं, तेव्हा वाटलं, “आपल्या विचारांत काही तरी घोटाळा आहे.” आणि पुनर्विचार सुरू केला. वरील मत व्यक्त करणारे वर असं सांगतात, “इंग्रजीनं नाही का अन्य भाषांतले शब्द स्वीकारले? मग आपल्याला काय हरकत? असे शब्द घेऊन इंग्रजी भाषा टणक झाली, तशी मराठी का होऊ नये?” हे प्रतिपादन मराठी भाषकांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणारं असल्यानं त्याचा परामर्श घेणं अत्यावश्यक आहे.
पुनश्च! : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम
मराठीतील नियतकालिकांची परंपरा तब्बल १८५ वर्षांची. त्यांतील लेखनाने प्रबोधन आणि कल्पकता यांची सांगड घालत मराठी भाषेला सौष्ठव प्राप्त करून दिले. या दीर्घ आणि समृद्ध परंपरेतील कालसुसंगत लेखन ‘आज’च्या वाचकांना उपलब्ध करून देणारा ‘पुनश्च’ हा उपक्रम २१ सप्टेंबर रोजी वाचकार्पण होत आहे. अॅप व संकेतस्थळ या नव-तंत्रमाध्यमांद्वारे सुरू होणाऱ्या या आगळ्या उपक्रमाविषयी..
निद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)
संस्कृत भाषेची महती आणि भविष्यासाठी तिची उपयुक्तता सांगणारा विशेष लेख.
भाषा, वाङ्मय आणि संस्कृती या तीन घटकांना मिळून संस्कृत हे नाव आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवे. संस्कृतचे आगळेपण या तिन्ही रूपांत आहे. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये ह्या तीन घटकांच्या अनुषंगाने उलगडून दाखवीत तिचे कालातीत महत्व सांगताहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्कृत विदुषी सरोजा भाटे.
हिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.
क्वांटम मेकॅनिक्स आणि अद्वैत तत्त्वज्ञान (ले० आशिष कुलकर्णी)
विश्वरचनेच्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञान आणि अध्यात्म आपल्या परीने लाखो वर्षे करीत आहेत. विज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञानात गेल्या दोन शतकात झालेल्या विस्मयकारक प्रगतीने साऱ्यांना केवळ थक्क करून सोडले आहे, असे नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याचा तो एकमेव मार्ग असल्याचा भ्रमदेखील निर्माण केला आहे. प्रयोगसिद्धता, सातत्य आणि सार्वकालिकता ही विज्ञानाची बलस्थाने होती. व्यक्तिगत अनुभूति आणि अनुभव ह्यांना त्यात स्थानच नव्हते. कारण त्यातून येणारे निष्कर्ष अवैज्ञानिक ठरवून ते नाकारण्याकडेच वैज्ञानिक जगताचा कल होता. पण, आता आपल्याच चाचण्या, कसोट्या, प्रयोग हे अंतिम सत्यापर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत याची जाणीव वैज्ञानिक जगतास झाली आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान तत्त्वज्ञानातून याचे किमान सूत्र तरी सापडेल अशा आशेने वैज्ञानिक जगत भारतीय ज्ञानमार्गाच्या अभ्यासाकडे वळले आहे. भारतीय असेल ते त्याज्य आणि पाश्चात्त्य असेल ते शुद्ध वैज्ञानिक अशा भ्रमातून बाहेर येऊन आपणदेखील भारतीय विचारदर्शन नव्यावैज्ञानिक प्रगतीस मार्गदर्शक कसे ठरेल ह्याचा विचार करायलाच हवा. भारतीय संशोधनासमोरचे हे खरे आव्हान आहे. ब्रह्म आणि जगत यांतील अद्वैताचा आता वैज्ञानिक अंगाने शोध घेतला जाणार आहे. जागतिक वैज्ञानिक संशोधनाच्या केंद्रस्थानी परतण्याची भारतीय संशोधकांना ही फार मोठी संधी आहे.
Heisenberg, Quantum Physics and Indian Philosophy
न्यूटनने (Newton) मांडलेल्या आधुनिक वैज्ञानिक तत्त्वज्ञानाची चौकट आईनष्टाईनच्या सापेक्षतावादाच्या उपपत्तीने (Theory of Relativity) मोडून टाकली. न्यूटनचे जडवादी, द्वैतवादी (ऊर्जा आणि द्रव्य ह्यांचे शाश्वत संधारण – conservation of energy and mass अशा) विचारांवर आधारित असणारे सर्व मूलभूत सिद्धान्त सापेक्षवादामुळे कोलमडून पडले आणि आईनष्टाईनने पूर्णतः आगळ्यावेगळ्या प्रकारच्या, सामान्य माणसांना अशक्य आणि काल्पनिक वाटेल अशा वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा पाया घातला. आणि त्यावरच पुढील (श्रॉडिन्जर, बोहर, हायझेनबर्ग इत्यादी) श्रेष्ठ पदार्थवैज्ञानिकांनी पुंजकणवादाची उपपत्ती (Quantum Theory) अधिकाधिक विकसित केली. ही उपपत्ती भारतीय तत्त्वज्ञानाच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या (सर्वं खलु इदं ब्रह्म) आणि विश्वाच्या पूर्णत्वाच्या सिद्धान्ताच्या (पूर्णमदः पूर्णमिदं…) अगदी जवळ जाते.
The English Medium Myth – Talk at IIT Kanpur by Sankrant Sanu
इंग्रजांच्या अधिकाराखालील गुलामगिरीत दीर्घ काळ घालवल्यामुळे आणि मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीत पुरेसा बुद्धिभेद केला गेल्यामुळे, भारतीयांना आपल्या भाषा ह्या गावंढळ आणि खालच्या दर्जाच्या व इंग्रजी भाषा ही मात्र अत्यंत उच्च दर्जाची भाषा असे वाटते. जगातील सर्व भाषांमध्ये इंग्रजी हीच एकमेव ज्ञानभाषा आहे आणि इंग्रजीशिवाय ज्ञानप्राप्ती शक्यच नाही असे भारतीयांना वाटते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजीवर अनावश्यक भर न देता स्वतःच्या भाषेतच शिक्षण घेणार्या देशांनीच भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात शिक्षणाचा प्रसार, संशोधन, नोबेल पारितोषिके इत्यादी गोष्टी आणि एकंदरीत सामाजिक प्रगती साधलेली दिसून येते. ह्यासाठी जपान, इस्रायल, कोरिया, चीन, सर्व युरोपीय देश इत्यादींची उदाहरणे पाहता येतील.
Difficulties of learning to read and write English (by Masha Bell)
The author says : “Because of the many irregularities, English-speaking children take roughly 10 times longer to learn to read and write than in Finland, Estonia or Korea which have completely regular spelling systems.” |
‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय?
दरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो...
पण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो !!” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.
टाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)
मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.
आर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)
संपूर्ण भारताचे राज्य मिळवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी आणि त्यावरील आपली मांड बळकट करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतात नेहमीच “फोडा आणि झोडा” ह्या रणनीतीचा अवलंब केला. त्याचाच एक भाग म्हणून भारतीयांना आपली समृद्ध संस्कृती, प्राचीन ज्ञानपरंपरा, उत्कृष्ट शिक्षणपरंपरा विसरायला लावणे, भारतीयांच्या मनात स्वतः न्यूनगंड उत्पन्न करणे तसेच भारतीयांत जात, धर्म, आर्य-द्रविड इत्यादी विविध बाबींच्या आधारे दुही माजवणे आणि त्यायोगे भारतीयांना एकमेकांचा द्वेष करायला लावणे, अशा क्लृप्त्या त्यांनी केल्या. अन्यथा मूठभर इंग्रजांना विशाल, बलाढ्य आणि सुसंस्कृत अशा भारत देशावर दीडदोन शतके अधिराज्य गाजवणे शक्यच झाले नसते.
अशा षड्यंत्राचा एक भाग म्हणूनच आर्यांच्या भारतावरील आक्रमणाच्या उपपत्तीचा (Aryan Invasion Theory) खोडसाळ प्रसार करून भारतातील विद्वानांचादेखील बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. (आणि तो बर्याच प्रमाणात यशस्वीही झाला.) मात्र आज जगभरच्या विविध क्षेत्रांतील अनेक विद्वानांनी आपापल्या क्षेत्रांत नवनवीन संशोधन करून वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे ह्या उपपत्तीचा फोलपणा उघड करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण तरीही पाश्चात्य बनावटीचा चष्मा लावून भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करणारे भारतातील भारत-अभ्यासक (Indologists) आजही मूठभर भारतद्वेष्ट्या पाश्चात्य संशोधकांची शेपूट धरून कळतनकळत भारताला कमीपणा आणण्यार्या ह्या सिद्धान्ताचाच प्रसार करण्याचाच प्रयत्न करीत आहेत. तसेच आज स्वतंत्र भारतामध्ये स्वतःला निधर्मी (सेक्यूलर), समाजवादी किंवा साम्यवादी म्हणवणारे राजकीय नेतेसुद्धा आपल्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्यांचे पाठीराखे आपल्या अज्ञानामुळे ह्या पोकळ उपपत्तीचे समर्थन करताना दिसून येतात.
मराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)
शिक्षणव्यवस्थेत मराठीचं भलं व्हावं यासाठी शासनानं काय करावं असं तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विचारल्यावर मी तत्काळ म्हटलं : एक, मराठी माध्यमाच्या शाळांमधलं इंग्रजीचं अध्ययन सुधारावं; दोन, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधलं मराठीचं अध्यापन सुधारावं, किंबहुना त्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करावं; आणि तीन, दीर्घकालीन उपायांसाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना करावी.
भाषेचा विकास आणि ती ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या मंडळींचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास हातात हात घालून होत असतो. मराठीचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास यांना वेगळं काढता येणार नाही.
गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?
पुष्कळांना गोहत्याबंदीच्या मागणीमागं काही तरी भाबडेपणा असला पाहिजे असं वाटत असतं. आणि ती मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून आल्यानं स्वतःला प्रतिष्ठित मानणारे काही डुड्ढाचार्य/र्या तिची टिंगलटवाळी करीतही असतात. त्यामागं काही तरी राजकीय हेतू असणार, अशीही शंका काहींना असते. काहींना हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला वाटतो. गोमांस निर्यातीतून मिळणारा पैसा घटेल, याचीही चिंता कित्येकजण, व्यक्त करीत असतात. काहींना ती हिंदूंची अंधश्रद्धा वाटते. त्याकरता त्यांना स्वा. सावरकरांच्या मतांचा आसरा घेण्यालाही लाज वाटत नाही. प्रस्तुत प्रश्नाचा विचार धार्मिक दृष्टीनं न करता आर्थिक दृष्टीनं केला पाहिज, असाही कैक जणांचा आग्रह असतो. मुसलमानांचा पुळका येणारे हिंदू तर आपल्या देशात पोत्यानं आहेत. समाजवादी, कम्यूनिस्ट, काँग्रेस, पुरोगामी. म्हणून तर आता ह्या दाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालेली आर्थिक बाजूच आपण पाहू म्हणजे झालं.
राष्ट्रभाषा आणि अंधश्रद्धा (ले० प्रा० अनिल गोरे)
जिनांनी पाकिस्तानच्या राष्ट्रभाषेसाठी उर्दूची शिफारस केली आणि भावनेच्या भरात ती तेव्हा स्वीकारली गेली. हा निर्णय झाल्यापासून पूर्व पाकिस्तान, सिंध, बलुचिस्तान, वायव्य-सरहद्द-प्रांत या भागात जो भाषिक संघर्ष पेटला, तो अजूनही चालूच आहे. याच संघर्षातून स्वातंत्र्यानंतर केवळ २४ वर्षात पाकिस्तानची भाषिक तत्वावर फाळणी झाली. या फाळणीच्या मुळाशी केवळ बांगला भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता असल्याने नव्या देशाचे नाव पूर्व पाकिस्तान न ठेवता देशाला बांगला हे भाषेचे/संस्कृतीचे नाव दिले गेले.
एकच राष्ट्रभाषा असावी असा हट्ट धरून भारताचे विभाजनाची बीजे रोवण्याऐवजी सर्व भारतीय भाषांचा परस्पर-समन्वय वाढवून एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
राष्ट्रभाषेचे खूळ देशाच्या विभाजनाचे कारण ठरेल म्हणून ते खूळ सोडून आपला देश बहुभाषिक असल्याचे वास्तव मोकळेपणाने स्वीकारणे भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे.
दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ ! (ले० विद्युल्लेखा अकलूजकर)
आई आपल्याला जन्म देते, बालपणी लालन-पालन करते. पण लवकरच आपल्याला स्वतःच्या पायांवर उभे राहावे लागते आणि स्वकर्तृत्वावरच आपले सर्व जीवनव्यवहार करावे लागतात. जन्मल्याबरोबर आईच्या तोंडून जी भाषा ऐकली, ज्या भाषेनेच पुढे आपल्यावर संस्कार केले आणि आपले विचार-स्वभाव-सदसद्विवेक-व्यक्तिमत्व घडवले, ज्या भाषेतून आपण आपल्या सुख-दुःखाच्या, आनंद-पश्चात्तापाच्या भावना स्वतःशी आणि जिवलगांशी व्यक्त करतो, अशी आपली मायबोली जन्मभर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मागे आईसारखीच उभी असते आणि आपल्याला वेळोवेळी धीर देत असते, मार्गदर्शन करीत असते. अशा ह्या मायबोलीबद्दल आपल्या आईप्रमाणेच प्रेम, अभिमान, कृतज्ञता, वाटणे आणि तिची काळजी घेणे, जपणूक करणे, रक्षण करणे, हे आपले स्वाभाविक कर्तव्य नाही काय?
आर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)
आर्यांनी भारतावर आक्रमण करून तो पादाक्रांत केला, असा जावईशोध ब्रिटिशांनी स्वतःच्या आक्रमणाच्या समर्थनार्थ लावला. त्या काल्पनिक उपपत्तीच्या (theory) द्वारे पाश्चात्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्या खोडसाळ उपपत्तीचे सांगोपांग खंडन करण्याकरता डॉ० डेव्हिड फ्रॉली ह्यांनी १९९४ साली एक पुस्तक लिहिले. नाव “The Myth of the Aryan Invasion of India”. प्रकाशक “Voice of India, N. Delhi” जेमतेम ५६ पानांची ही पुस्तिका संशोधनानं भरलेली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाला अभिमानास्पद वाटेल, असे आहे. प्रस्तुत पुस्तकातील शेवटच्या, म्हणजे समारोप-रूप छेदिकेचा हा स्वैर मराठी अनुवाद.
गर्भाशयातील बाळांचा संवाद (आस्तिकांचे नास्तिकांना उत्तर?) (अनुवाद : प्रा० मनोहर राईलकर)
आस्तिक आणि नास्तिक मंडळींमध्ये वादविवाद, झगडे होत असतातच. आस्तिक नास्तिकांना अश्रद्ध, असंस्कृत, पापी, भ्रष्ट इत्यादी विशेषणे लावतात तर नास्तिक आस्तिकांना अंधश्रद्ध, अडाणी, मूर्ख, अकलेचे कांदे, विश्वविघातक, बुद्धिशत्रू इत्यादी विशेषणांनी संबोधतात. Read More »
राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणार्या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही.
गोव्यात शाळांमध्ये मराठी किंवा कोकणी सक्तीची, महाराष्ट्राचे काय?
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ह्यांच्या नेतृत्वाखालील राज्यशासनाने तेथील सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी किंवा कोकणी सक्तीची केल्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल गोवे सरकारचे अभिनंदन! बिल्डर, उद्योजक आणि दिल्लीश्वर यांच्याकडे स्वाभिमान गहाण ठेवणार्या महाराष्ट्र सरकारला हे धाडस जमणारच नाही काय?
दैनिक सकाळ, दिनांक २३ जानेवारी २०१४ च्या अंकातील बातमी पाहा.
A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell
Since the Renaissance there has been no event of such world-wide significance in the history of culture as the discovery of Sanskrit literature in the latter part of the eighteenth century.
In various branches of scientific literature, in phonetics, grammar, mathematics, astronomy, medicine, and law, the Indians also achieved notable results. In some of these subjects their attainments are, indeed, far in advance of what was accomplished by the Greeks.
We Europeans, on the other hand, 2500 years later, and in a scientific age, still employ an alphabet which is not only inadequate to represent all the sounds of our languages, but even preserves the random order in which vowels and consonants are jumbled up as they were in the Greek adaptation of the primitive Semitic arrangement of 3000 years ago.
The above are a few quotations from the book ‘A history of Sanskrit Literature’ by Arthur Anthony Macdonell. Some parts of the first introductory chapter, which explains the historical and cultural background of the ancient Indian civilisation, are produced at the link below.
मराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर
मराठीमधील पहिला ज्ञानकोश (विश्वकोश) डॉ० श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुमारे ८५ वर्षांपूर्वी जिद्दीने १२-१३ वर्षे झटून एकहाती तयार केला. त्यातील माहिती आजही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशीच आहे. मराठीमध्ये जागतिक दर्जाचा ज्ञानकोश आणण्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींची पर्वा न करता ह्या उपक्रमासाठी आपले सर्वस्व पणाला लावून शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. अशा अलौकिक पुरुषाचे मराठी माणसावर मोठे ऋण आहेत. मराठी माणसाला त्यांचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (http://ketkardnyankosh.com/) सर्वांना मुक्तपणे पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी ’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने नुकताच महाजालावर उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अशी संकेतस्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पुनःपुन्हा भेट द्यावी अशी तीर्थस्थळेच होत. त्यानिमित्ताने खालील माहितीपर लेख प्रसिद्ध करीत आहोत.
पश्चिम-घाट ले० अमित नारकर
पश्चिम-घाट-तज्ज्ञ-समितीने दिलेल्या अहवालाची सामान्य माणसांना माहिती करून देण्यासाठी श्री० अमित नारकर यांनी लिहिलेला लेख खालील दुव्यावर प्रसिद्ध करीत आहोत.
PASHCHIMGHAT_Article_Amit Narkar
श्री० अमित नारकर यांचा विपत्ता – “amit narkar” <narkaram@gmail.com>
.