बालभारतीपुरस्कृत अभिनव मराठी संख्यावाचनपद्धतीबद्दल काही शंका (ले० सलील कुळकर्णी)

“लोकांच्या मनातील सर्व शंकांना बालभारतीकडे समाधानकारक उत्तरे नसल्यास त्याचा अर्थ असा होईल की बालभारतीने त्यांच्या निर्णयापूर्वी पुरेशी तयारी न करता घाईने निर्णय घेतला आहे. बालभारतीने लक्षात घ्यायला हवे की भाषेतील संख्यानामवाचक शब्द बदलणे हा मुद्दा केवळ बालभारतीच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील गणिताचे धडे आणि शालेय गणिताची परीक्षा एवढ्याशीच संबंधित नाही. तो मुद्दा मराठी समाजाच्या पुढील सर्व पिढ्यांच्या भाषेशी आणि जीवनव्यवहाराशी संबंधित आहे. त्यामुळे मुख्यतः भाषेशी संबंधित असलेला हा निर्णय बालभारतीने पुरेशा भाषाशास्त्रीय पुराव्याशिवाय आणि प्रयोगाधारित पाहणीशिवाय, केवळ काही गणिततज्ज्ञांच्या सल्ल्यावरून घेणे चुकीचे आहे. तेव्हा बालभारतीने सध्या हा निर्णय रद्द करून त्याविषयी पुन्हा विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत, तसेच व्यवस्थित संशोधन, प्रयोग व पाहणी करावी आणि त्या संबंधातील सर्व माहिती जनतेपुढे सादर करून त्याबद्दलच्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात आणि जनतेच्या शंकांचे समाधान करावे. त्यानंतर जनतेचे मत अनुकूल असल्यास बालभारतीने शासनाची अनुमती घेऊन मग संख्यानामांत बदल करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही.”

Read More »

इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)

प्रास्ताविक: विज्ञानाच्या परिभाषेकरता इंग्रजी शब्द घ्यायला हरकत नसावी, असं पुष्कळ विद्वानांना वाटतं. एके काळी मलाही तसं वाटत असे. पण, जपानची अफाट प्रगती पाहिली आणि त्यामागचं विश्लेषण कळलं, तेव्हा वाटलं, “आपल्या विचारांत काही तरी घोटाळा आहे.” आणि पुनर्विचार सुरू केला. वरील मत व्यक्त करणारे वर असं सांगतात, “इंग्रजीनं नाही का अन्य भाषांतले शब्द स्वीकारले? मग आपल्याला काय हरकत? असे शब्द घेऊन इंग्रजी भाषा टणक झाली, तशी मराठी का होऊ नये?” हे प्रतिपादन मराठी भाषकांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणारं असल्यानं त्याचा परामर्श घेणं अत्यावश्यक आहे. 

Read More »

हिंदीच्या एकाधिकारशाहीचा वाढता धोका (ले. शरद गोखले)

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदीय राजभाषा समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी स्वीकाल्यानंतर हिंदी भाषा लादली जाण्याच्या भीतीने आपल्या मातृभाषेविषयी कमालीच्या संवेदनशील असलेल्या अनेक अहिंदी राज्यांतील, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतील जनतेत अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेची दखल तेथील राज्य सरकारांनी न घेतल्यास १९६५ नंतर पुन्हा एकदा भारतात हिंदी विरोधी लाट निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोचण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील जनता तेवढी जागरुक नसल्यामुळे व सध्याच्या राजकर्त्यांच्या हिंदी-शरण वृत्तीमुळे या शिफारसींचे सर्वाधिक विपरित परिणाम महाराष्ट्रालाच भोगावे लागतील.

Read More »

‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय?

दरवर्षी मराठी-भाषा-दिन ह्या एकाच दिवशी अचानक मराठी माणसाचा मायबोलीबद्दलचा अभिमान उफाळून येतो...

पण माझ्याच राज्यात, माझ्याच गावात, मी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये साधे दैनंदिन व्यवहारही करू शकत नाही, घराबाहेर मला माझी भाषा फारशी ऐकूच येत नाही, फारशी कुठे वाचायला मिळत नाही, उलट कुठे मराठीमध्ये बोलल्यास बाहेरील फालतू उपरे टॅक्सी-रिक्षावाले किंवा फेरीवाले- दुकानदारसुद्धा माझ्याकडे तुच्छतेने पाहून “मराठी नही समझता. हिंदीमे बोलो !!” असे फर्मावतात, ह्याबद्दल मराठी माणसाला कसलीच खंत वाटत नाही.

Read More »

टाहो (ले० सई परांजपे, लोकसत्ता, दि० २६ फेब्रुवारी २०१७)

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. उद्याच्या ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त विशेष लेख.

Read More »

दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ ! (ले० विद्युल्लेखा अकलूजकर)

आई आपल्याला जन्म देते, बालपणी लालन-पालन करते. पण लवकरच आपल्याला स्वतःच्या पायांवर उभे राहावे लागते आणि स्वकर्तृत्वावरच आपले सर्व जीवनव्यवहार करावे लागतात. जन्मल्याबरोबर आईच्या तोंडून जी भाषा ऐकली, ज्या भाषेनेच पुढे आपल्यावर संस्कार केले आणि आपले विचार-स्वभाव-सदसद्विवेक-व्यक्तिमत्व घडवले, ज्या भाषेतून आपण आपल्या सुख-दुःखाच्या, आनंद-पश्चात्तापाच्या भावना स्वतःशी आणि जिवलगांशी व्यक्त करतो, अशी आपली मायबोली जन्मभर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मागे आईसारखीच उभी असते आणि आपल्याला वेळोवेळी धीर देत असते, मार्गदर्शन करीत असते. अशा ह्या मायबोलीबद्दल आपल्या आईप्रमाणेच प्रेम, अभिमान, कृतज्ञता, वाटणे आणि तिची काळजी घेणे, जपणूक करणे, रक्षण करणे, हे आपले स्वाभाविक कर्तव्य नाही काय?

Read More »

राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणार्‍या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही.

Read More »

आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख)

“आपल्या भाषेद्वारे धन, मान व ज्ञान मिळू लागले तर या परिस्थितीत निश्चितच फरक पडू शकेल. हे सर्व बदल ओघाने, टप्प्या-टप्प्यानेच होतील; पण त्यासाठी योग्य अशी वातावरणनिर्मिती प्रथम घडवून आणली पाहिजे.” 

Read More »

महेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण

सिंगापूरमधील तिसर्‍या विश्व-मराठी-साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्‍या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे भाषण बर्‍यापैकी विस्ताराने प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. इतर काही दैनिकांनी ते बरीच काटछाट करून प्रसिद्ध केले तर काहींनी स्वतःस अडचणीचे ठरतील असे भाषाशुद्धीचे मुद्दे वगळून ते भाषण प्रसिद्ध केले

Read More »

गुगलला मराठीचे वावडे का? (ले० भरत गोठोसकर)

श्री० भरत गोठोसकर यांचा एक अभ्यासपूर्ण, कळकळीने लिहिलेला लेख पुनर्प्रसिद्ध करीत आहोत. त्यांनी मांडलेले मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे सर्व मुद्दे योग्य आणि सत्यच आहेत. त्यानुसार मराठी भाषेला या जगात कितीतरी अधिक मान व आदर प्राप्त व्हायला हवा. पण वस्तुस्थिती तशी नाही. याची कारणेही आपण शोधायला हवीत व त्यावरील तोडगा कृतीत आणण्यासाठी आवश्यक तो स्वाभिमान, निश्चय, खंबीरपणा आपण दाखवायला हवा. गोठोसकरांनी गुगलला लिहिलेल्या पत्रावर सही करून आपण मराठी स्वाभिमानाच्या  मोहिमेची सुरुवात करूया.   

Read More »

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी)

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, फ्रान्स यांसारखे युरोपातील सर्वच इंग्लंडेतर देशांचा एव्हाना गेली साठ वर्षे इंग्रजीची घट्ट कास धरलेल्या भारताच्या मानाने खूपच अपकर्ष व्हायला हवा होता.

Read More »

मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यापुढे फक्त मराठीतून! (वृत्त)

या आधीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यभाषेच्या ऐवजी परराज्याच्या व परदेशाच्या भाषेतूनच चर्चा, निवेदने, पत्रकार परिषदा वगैरे घेत असत. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रीय लोकांनाच स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान नाही हे वारंवार अधोरेखित होत असे. इतर ’तथाकथित’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना व वाहिन्यांना करुणानिधींचे तमिळ  वक्तव्य समजते, बुद्धदेबांचे बंगाली निवेदन समजते, तसेच इतर मलयाळम्‌, कानडी, ओडिस्सी, पंजाबी नेत्यांची त्यांच्यात्यांच्या राज्यभाषेतील भाषणे नीट समजतात. एवढेच काय पण अमेरिकी माध्यमांना फ्रेंच, रशियन, जपानी, हिब्रू, स्वाहिली, स्पॅनिश भाषा देखील समजतात. त्याबद्दल जगात कुठेही, कधीही, काहीही वावगे समजले जात नाही. पण केवळ महाराष्ट्रातच माध्यमांना, विशेषतः भारतीय माध्यमांना मराठी समजून घेण्यात कमीपणा वाटतो. आणि याला कारण म्हणजे आपले नेते व त्यांना पाठिंबा देणारे आपण सर्वच जण इतरांची तशी समजूत करून देतो.

Read More »

Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System

“We must, at present, do our best to form a class, who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect.” – Said Lord Macaulay 175 years ago. Unfortunately, Macaulay’s Legacy in India still continues.

Read More »

मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)

“मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. तमिळ लोकांमध्ये असलेला स्वभाषेबद्दलचा अभिमान मराठी लोकांमध्ये का नाही ह्याचे कारणच मला समजत नाही.” मराठी चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त करताना हल्लीच कमल हासन ह्या लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेत्याने वरीलप्रमाणे उद्गार काढले.

Read More »

स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे….

वरील विषयावर आम्हा मराठीप्रेमी मित्रांच्या रिंगणात चर्चा चालली असताना खालील मते मांडली गेली. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? जरूर लिहा.

श्री० सलील कुळकर्णी म्हणाले:

१. स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा, विशेषतः भय्या मंडळींपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. पण मराठी आणि परप्रांतीयांशी तुलना करताना फक्त एवढीच गोष्ट लक्षात न घेता या भोवतीची इतर संबंधित वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

Read More »