निद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)

संस्कृत भाषेची महती आणि भविष्यासाठी तिची उपयुक्तता सांगणारा विशेष लेख.

भाषा, वाङ्‍मय आणि संस्कृती या तीन घटकांना मिळून संस्कृत हे नाव आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवे. संस्कृतचे आगळेपण या तिन्ही रूपांत आहे. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये ह्या तीन घटकांच्या अनुषंगाने उलगडून दाखवीत तिचे कालातीत महत्व सांगताहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्कृत विदुषी सरोजा भाटे.

Read More »

A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell

Since the Renaissance there has been no event of such world-wide significance in the history of culture as the discovery of Sanskrit literature in the latter part of the eighteenth century.

In various branches of scientific literature, in phonetics, grammar, mathematics, astronomy, medicine, and law, the Indians also achieved notable results. In some of these subjects their attainments are, indeed, far in advance of what was accomplished by the Greeks.

We Europeans, on the other hand, 2500 years later, and in a scientific age, still employ an alphabet which is not only inadequate to represent all the sounds of our languages, but even preserves the random order in which vowels and consonants are jumbled up as they were in the Greek adaptation of the primitive Semitic arrangement of 3000 years ago.

The above are a few quotations from the book ‘A history of Sanskrit Literature’ by Arthur Anthony Macdonell. Some parts of the first introductory chapter, which explains the historical and cultural background of the ancient Indian civilisation, are produced at the link below.

Read More »

Why does my child do Sanskrit in the school? (by Rutger Kortenhorst)

Rutger Kortenhorst, a Sanskrit teacher in John Scottus School in Dublin, Ireland, speaks on the value of teaching Sanskrit to children, based on his own experience with the language. 

The educationists, linguists, policymakers and politicians in India too need to go through his speech carefully. 

Read More »

गांधीहत्या की गांधीवध? (संस्कृत व्याकरणदृष्ट्या विश्लेषण)

एकेकाळी महात्मा गांधींच्या खुनाच्या बाबतीत ‘गांधीवध’ हा शब्द वापरावा की ‘गांधीहत्या’, यावर मोठा वाद झाला होत्या. विसाव्या शतकातील सत्तरीच्या दशकाच्या उत्तरभागात ’गांधीहत्या आणि मी’ हे श्री० गोपाळ गोडसेंचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आणि विशेषतः पुढे नव्वदीच्या दशकाच्या उत्तरभागात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी आणि तथाकथित गांधीवादी मंडळी यांच्यामध्ये या विषयावर त्वेषपूर्ण चर्चा झाल्या. परन्तु आजही हा प्रश्न विद्वानांनी निकालात काढलेला दिसत नाही….

Read More »

श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत पद्यानुवाद

कुठल्याही एका भाषेतून दुसर्‍या भाषेत अनुवाद करायचा म्हणजे केवळ शब्दकोशाप्रमाणे शब्दाला शब्द योजून उपयोगी नाही. अर्थानुवाद, किंवा त्याही पुढे जाऊन भावानुवाद, उत्तम रीतिने जमण्यासाठी दोन्ही भाषांतील शब्दांच्या विविध अर्थच्छटा व त्यांच्या खाचाखोचा यांची चांगली जाण पाहिजे आणि त्या दोन्ही  भाषांवर प्रभुत्व तर असायलाच पाहिजे परंतु दोन्ही भाषांमागील संस्कृती व परंपरांचेही उत्तम ज्ञान असायला हवे.

अशा या सर्वगुणांनी संपन्न अशा मराठीतील महाकवी ग० दि० माडगुळकर उर्फ गदिमा यांनी केलेला संस्कृतमधील श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा सविस्तर मराठी भावानुवाद आणि तो देखिल पद्यात, खालील दुव्यावर सापडेल.

अमृतमंथन- श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत अनुवाद_111209

.

कृपया आपले प्रतिमत लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. आभारी आहोत.

– अमृतयात्री

’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)

गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्‍यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्‍या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्‍या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते.

Read More »