प्रास्ताविक: विज्ञानाच्या परिभाषेकरता इंग्रजी शब्द घ्यायला हरकत नसावी, असं पुष्कळ विद्वानांना वाटतं. एके काळी मलाही तसं वाटत असे. पण, जपानची अफाट प्रगती पाहिली आणि त्यामागचं विश्लेषण कळलं, तेव्हा वाटलं, “आपल्या विचारांत काही तरी घोटाळा आहे.” आणि पुनर्विचार सुरू केला. वरील मत व्यक्त करणारे वर असं सांगतात, “इंग्रजीनं नाही का अन्य भाषांतले शब्द स्वीकारले? मग आपल्याला काय हरकत? असे शब्द घेऊन इंग्रजी भाषा टणक झाली, तशी मराठी का होऊ नये?” हे प्रतिपादन मराठी भाषकांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणारं असल्यानं त्याचा परामर्श घेणं अत्यावश्यक आहे.
Tag: Prof. Manohar Railkar
गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?
पुष्कळांना गोहत्याबंदीच्या मागणीमागं काही तरी भाबडेपणा असला पाहिजे असं वाटत असतं. आणि ती मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून आल्यानं स्वतःला प्रतिष्ठित मानणारे काही डुड्ढाचार्य/र्या तिची टिंगलटवाळी करीतही असतात. त्यामागं काही तरी राजकीय हेतू असणार, अशीही शंका काहींना असते. काहींना हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला वाटतो. गोमांस निर्यातीतून मिळणारा पैसा घटेल, याचीही चिंता कित्येकजण, व्यक्त करीत असतात. काहींना ती हिंदूंची अंधश्रद्धा वाटते. त्याकरता त्यांना स्वा. सावरकरांच्या मतांचा आसरा घेण्यालाही लाज वाटत नाही. प्रस्तुत प्रश्नाचा विचार धार्मिक दृष्टीनं न करता आर्थिक दृष्टीनं केला पाहिज, असाही कैक जणांचा आग्रह असतो. मुसलमानांचा पुळका येणारे हिंदू तर आपल्या देशात पोत्यानं आहेत. समाजवादी, कम्यूनिस्ट, काँग्रेस, पुरोगामी. म्हणून तर आता ह्या दाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालेली आर्थिक बाजूच आपण पाहू म्हणजे झालं.
आर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली)
आर्यांनी भारतावर आक्रमण करून तो पादाक्रांत केला, असा जावईशोध ब्रिटिशांनी स्वतःच्या आक्रमणाच्या समर्थनार्थ लावला. त्या काल्पनिक उपपत्तीच्या (theory) द्वारे पाश्चात्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. त्या खोडसाळ उपपत्तीचे सांगोपांग खंडन करण्याकरता डॉ० डेव्हिड फ्रॉली ह्यांनी १९९४ साली एक पुस्तक लिहिले. नाव “The Myth of the Aryan Invasion of India”. प्रकाशक “Voice of India, N. Delhi” जेमतेम ५६ पानांची ही पुस्तिका संशोधनानं भरलेली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर भारतातील प्रत्येक देशभक्त नागरिकाला अभिमानास्पद वाटेल, असे आहे. प्रस्तुत पुस्तकातील शेवटच्या, म्हणजे समारोप-रूप छेदिकेचा हा स्वैर मराठी अनुवाद.
गर्भाशयातील बाळांचा संवाद (आस्तिकांचे नास्तिकांना उत्तर?) (अनुवाद : प्रा० मनोहर राईलकर)
आस्तिक आणि नास्तिक मंडळींमध्ये वादविवाद, झगडे होत असतातच. आस्तिक नास्तिकांना अश्रद्ध, असंस्कृत, पापी, भ्रष्ट इत्यादी विशेषणे लावतात तर नास्तिक आस्तिकांना अंधश्रद्ध, अडाणी, मूर्ख, अकलेचे कांदे, विश्वविघातक, बुद्धिशत्रू इत्यादी विशेषणांनी संबोधतात. Read More »
हे शिक्षण आपलं आहे? (ले० प्रा० मनोहर राईलकर, दै० लोकसत्ता)
जगभरातल्या २०० अव्वल विद्यापीठांच्या यादीत एकही भारतीय विद्यापीठ नाही. कुणाला ही ‘भारताची शैक्षणिक पडझड’ वाटेल (‘लोकसत्ता’ने या शीर्षकाचा ‘अन्वयार्थ’ही १४ सप्टेंबरला छापला होता); परंतु ‘पडझड’ होण्यासाठी मुळात वास्तूची उभारणी व्हावी लागते.. ती आपल्याकडे झाली होती का?
आपल्या महान देशाच्या तुलनेत चिल्लर अशा देशांच्या विद्यापीठांचीही नावंही यादीत आहेत, पण भारताच्या एकाही नाही! याची काही खंत वाटते का?
जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)
निरनिराळया क्षेत्रांत संशोधन करणार्या वैज्ञानिकांकरता जागतिक संशोधनाची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी याकरता जपाननं एक अफाट यंत्रणा उभारली आहे. जगात कोणत्याही देशात, कोणत्याही भाषेत कोणत्याही विज्ञानशाखेत काहीही संशोधनात्मक माहिती आली की ती अगदी अल्प काळात जपानी संशोधकांना स्वभाषेत उपलब्ध करून देण्याची अगदी साधी सोपी यंत्रणा जपाननं उभारली आहे.
विश्वासघाताचे विस्मरण (ले० प्रा० मनोहर राईलकर)
“देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा”, “Vivisect me before you vivisect India” असं निग्रहपूर्वक म्हणणार्या गांधीजींनी हा विश्वासघात जड मनानं स्वीकारला. पण हा विश्वासघात कुणी केला? ह्या प्रश्नाचं उत्तरही कॉंग्रेसचे मुख्य सचिव दिग्विजयसिंग यांनी शोधावं.
हिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट्रिब्यून)
“ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही, आपलं वाङ्मय, आपल्या परंपरा यांच्याबद्दल अभिमान नाही, तो समाज आपलं स्वत्व, आपली अस्मिताच हरवून बसतो. मराठीच्या रक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्रातील जनतेनं काही प्रभावी कृती केली नाही तर मराठीला अशी भीषण अवस्था लवकरच येईल, अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत…”
“तेव्हा आज मराठी जनतेपुढं दोनच पर्याय आहेत. मराठी टिकवून धरण्यासाठी काही निश्चित कृतियोजना आखायची अन्यथा महाराष्ट्रात मराठीचा र्हास आणि नाश पत्करायचा !!”
मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)
“आध्यात्मिक काय किंवा विज्ञानातली काय मूळ तत्त्वं भाषातीत असतात. त्यांना भाषेचं बंधन नसतं.
कॅल्क्युलसचा शोध थोडा मागंपुढं पण एकाच काळात इंग्रज न्यूटनला आणि जर्मन लाइब्निट्झला लागला. युक्लिडेतर (non-Euclidean) भूमितीचा शोध साशेरी (इटालीय), लांबेर (फ्रेंच), गाउस (जर्मन), लोबाशेव्स्की (रशियन) आणि योहान बोल्याए (हंगेरीय) ह्या पाच वेगवेळया भाषांतील गणित्यांना सामान्यतः एकाच काळात पण, टप्प्याटप्प्यानं लागत गेला. विशेष म्हणजे ह्या भूमितीच्या शोधात इंग्रजांचा कसलाच हातभार लागला नाही. मग मुळातून वाचता आलं पाहिजे ह्याचा अर्थ, ह्या सर्व भाषाही प्रत्येकानं बालपणीच शिकायच्या का?”
खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
स्वातंत्र्यापूर्वी जेवढा तीव्र स्वाभिमान आपल्यात होता, त्याच्या शतांशानंही तो आज उरला नाही, हे कारण आहे का? इंग्रजी बोलण्यात, घरांची नावं इंग्रजी ठेवण्यात, हवामान प्रतिकूल असूनही इंग्रजांसारखी वेषभूषा करण्यात, निमंत्रणं इंग्रजीतून काढण्यात, अंतर्गत पत्रव्यवहार इंग्रजीतून करण्यात, समिति-वृत्तांत इंग्रजीत देण्यात, नाना प्रकारांनी दास्यवृत्ती टिकवण्याचा, वाढवण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, संक्रामित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचं पाहणं, आमच्यासारख्या वृद्धांना खंतावून जातं.
शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)
दि० ११-३-१०च्या लोकसत्तेच्या पुणे वृत्तांतामध्ये आलेली माहिती वाचून मी थक्क झालो. आणि खिन्नही झालो. तुम्हीही व्हाल. पण का ते सांगण्याआधी आपल्याकडे मुरलेल्या काही पक्क्या पण निराधार आणि आंधळया किंवा मेषसिद्धांतांची हजेरी घेऊ.
मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
“अपत्यानं जगात झेंडा लावला की त्याचे आईवडील आपोआपच मोठे होतात. तसंच आपण मराठीचीं अपत्यं. आपल्या प्रयत्नांनीच आपली मायबोलीही मोठी होईल, अशी माझी भावना आहे. आणि ‘हिला बैसवू वैभवाच्या शिरी,’ ही माधव ज्यूलियनांची आसही सफळ होईल.”
पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)
१८६८ मध्ये जपाननं विज्ञानात झेप घ्यायचं ठरवलं. एकदा त्यांनी हे ठरवल्यावर त्यांना कुणीच रोखू शकलं नाही. जपाननं आपली मुलं युरोप आणि अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली. तिथलं शिक्षण संपल्यावर त्यांना त्यांनी परत बोलावलं आणि ‘जे काय शिकला असाल ते सारं सुदैवाने तथाकथित ‘बोजड’ शब्दांचीसुद्धा आपल्यासारखी तिथं कुणी टिंगलटवाळी केली नाही. कुठलेही शब्द तसे मूलत: निर्थकच असतात; वापरण्यानंच त्यांना अर्थ चिकटतो. त्यांच्या सुदैवानं ‘जपानी भाषा विज्ञानासाठी सक्षम नाही,’ असं म्हणणारा कुणी पंडित जपानमध्ये नव्हता. आणि असता, तरी त्यांनी त्याला जुमानलं नसतं, किंवा कदाचित तोच असले उद्गार काढायला धजावला नसावा.
प्रा० राईलकरांचा हा पूर्ण लेख पुढील दुव्यावर उपलब्ध आहे, तो पहा.
संगणित: संगीतातील स्वरांचे गणित (ले० प्रा० मनोहर राईलकर)
संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती आज सापडणे कठीण. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील अनेक गूढ, तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. ‘सा’ म्हणजे काय? संवादिनीच्या (बाजाच्या पेटीच्या) कुठल्याही पट्टीला ‘सा’ म्हणता येईल असं म्हणतात, ते कसं? वरचा सा, खालचा ‘सा’ म्हणजे काय? एखादा गायक ‘काळी एक’ या पट्टीमध्ये गातो तर एखादी गायिका ‘काळी तीन’ या पट्टीत गाते; असे कधीकधी ऐकू येते, त्याचा अर्थ काय? पाश्चात्य स्वर व भारतीय स्वर यांमध्ये साम्य व भेद कोणते? असे अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्याला पडत असतात, पण आपल्याला ते समजण्यातले नाही असा विचार करून आपण ते कुतूहल तसंच दडपून टाकतो. पण संगीतशास्त्रातील स्वरांच्या गणिताबद्दलच्या खालील लेखामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.