आर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)

संपूर्ण भारताचे राज्य मिळवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी आणि त्यावरील आपली मांड बळकट करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी  भारतात नेहमीच  “फोडा आणि झोडा” ह्या रणनीतीचा अवलंब केला. त्याचाच एक भाग म्हणून भारतीयांना आपली समृद्ध संस्कृती, प्राचीन ज्ञानपरंपरा, उत्कृष्ट शिक्षणपरंपरा विसरायला लावणे, भारतीयांच्या मनात  स्वतः न्यूनगंड उत्पन्न करणे तसेच भारतीयांत जात, धर्म, आर्य-द्रविड इत्यादी विविध बाबींच्या आधारे दुही माजवणे आणि त्यायोगे भारतीयांना एकमेकांचा द्वेष करायला लावणे, अशा क्लृप्त्या त्यांनी केल्या. अन्यथा मूठभर इंग्रजांना विशाल, बलाढ्य आणि सुसंस्कृत अशा भारत देशावर दीडदोन शतके अधिराज्य गाजवणे शक्यच झाले नसते.

अशा षड्‍यंत्राचा एक भाग म्हणूनच आर्यांच्या भारतावरील आक्रमणाच्या उपपत्तीचा (Aryan Invasion Theory) खोडसाळ प्रसार करून भारतातील विद्वानांचादेखील बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. (आणि तो बर्‍याच प्रमाणात यशस्वीही झाला.) मात्र आज जगभरच्या विविध क्षेत्रांतील अनेक विद्वानांनी आपापल्या क्षेत्रांत नवनवीन संशोधन करून वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे ह्या उपपत्तीचा फोलपणा उघड करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण तरीही पाश्चात्य बनावटीचा चष्मा लावून भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करणारे भारतातील भारत-अभ्यासक (Indologists) आजही मूठभर भारतद्वेष्ट्या पाश्चात्य संशोधकांची शेपूट धरून कळतनकळत भारताला कमीपणा आणण्यार्‍या ह्या सिद्धान्ताचाच प्रसार करण्याचाच प्रयत्न करीत आहेत. तसेच आज स्वतंत्र भारतामध्ये स्वतःला निधर्मी (सेक्यूलर), समाजवादी किंवा साम्यवादी म्हणवणारे राजकीय नेतेसुद्धा आपल्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्यांचे पाठीराखे आपल्या अज्ञानामुळे ह्या पोकळ उपपत्तीचे समर्थन करताना दिसून येतात.

Read More »