The English Medium Myth – Talk at IIT Kanpur by Sankrant Sanu

इंग्रजांच्या अधिकाराखालील गुलामगिरीत दीर्घ काळ घालवल्यामुळे आणि मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीत पुरेसा बुद्धिभेद केला गेल्यामुळे, भारतीयांना आपल्या भाषा ह्या गावंढळ आणि खालच्या दर्जाच्या व इंग्रजी भाषा ही मात्र अत्यंत उच्च दर्जाची भाषा असे वाटते. जगातील सर्व भाषांमध्ये इंग्रजी हीच एकमेव ज्ञानभाषा आहे आणि इंग्रजीशिवाय ज्ञानप्राप्ती शक्यच नाही असे भारतीयांना वाटते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजीवर अनावश्यक भर न देता स्वतःच्या भाषेतच शिक्षण घेणार्‍या देशांनीच भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात शिक्षणाचा प्रसार, संशोधन, नोबेल पारितोषिके इत्यादी गोष्टी आणि एकंदरीत सामाजिक प्रगती साधलेली दिसून येते. ह्यासाठी जपान, इस्रायल, कोरिया, चीन, सर्व युरोपीय देश इत्यादींची उदाहरणे पाहता येतील.

स्वतंत्र भारताचे शिक्षणाचे धोरण ठरवण्यासाठी नेहरू सरकारने कोठारी आयोगाची नेमणूक केली. त्या आयोगाने संशोधनपूर्वक एक उत्तम अहवाल सादर केला. उत्तरोत्तर इंग्रजीचे महत्त्व कमी करून भारतीय भाषांना त्यांचे अधिकार देण्याच्या आणि त्यांचा विकास करण्याविषयीच्या शिफारशी त्यात होत्या. (महाजालावर कोठारी आयोगाची प्रत उपलब्ध आहे.) भारत सरकारने तो अहवाल स्वीकारला देखील. परंतु गेल्या पन्नास वर्षांत एकाही सरकारने त्यातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले नाही.

The English Medium Myth – Talk at IIT Kanpur

by Sankrant Sanu

एक अत्यंत महत्त्वाचे भाषण. भाषण मुख्यतः हिंदी भाषेत आहे. अवश्य अवश्य ऐका. संपूर्ण भाषण ऐका. लांबलचक असले तरीही वेळ काढून ऐका. तुकड्यातुकड्यात ऐका पण निश्चित ऐका. त्यातील विचार पटले तर समधर्मी मित्रांना अवश्य पाठवून द्या.

The English Medium Myth – Talk at IIT Kanpur

खरे तर ह्या भाषणाचा दुवा अवश्य जपून ठेवा. अधून मधून ऐकत जा.

.

You may also like to read :

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर) –}  http://wp.me/pzBjo-fZ

Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)  –}}  https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

Why does my child do Sanskrit in the school? (by Rutger Kortenhorst) –}  http://wp.me/pzBjo-NV

Difficulties of learning to read and write English –}} http://wp.me/pzBjo-T6

.

Please do write your comments in the space provided at the bottom of the article.

– Amrutyatri Group

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s