आत्महत्या आणि आत्मार्पण (ले० स्वातंत्र्यवीर वि० दा० सावरकर)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी आत्मार्पण केले. त्याआधी त्यामागची भूमिका विशद करणारा लेख त्यांनी लिहिला होता. स्वा० सावरकरांच्या लेखातील अंश लोकसत्तेने प्रसिद्ध केला आहे.

सावरकरांची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक केलेली आणि तर्काधिष्ठित असे. कधीकधी त्यांच्या कृती व विचारांमागील त्यांची भूमिका व त्यांची योग्यता सामान्य माणसाला लगेच लक्षातही येत नसे. म्हणूनच त्यांचा आत्मार्पण करण्याचा बेत निश्चित झाल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याआधी त्यांनी हा लेख प्रसिद्ध केला असावा. त्यावेळी हा लेख वाचून सावरकरांच्या मनातील ह्या योजनेची किती जणांना चाहूल लागली होती, कोण जाणे.

Read More »

बेळगावात मराठी भाषिकांना वाकुल्या, भाजपचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्रात स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अभिमान म्हणजे संकुचित वृत्ती असा अपप्रचार करणारे कॉंग्रेस, कम्युनिस्ट, भाजप इत्यादी पक्ष महाराष्ट्रातील स्थानिकांच्या स्वाभिमानाच्या आणि अस्मितेच्या बाबतीत नेहमीच कचखाऊ धोरण स्वीकारतात मात्र त्याच मंडळींची इतर राज्यांत मात्र स्थानिक भाषा व संस्कृती यांच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात  अहमहमिका लागलेली असते. इतर राज्यांत कितीही वेळा सत्तांतर झाले आणि कोणाचीही सत्ता आली तरी त्यांच्या स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृतीविषयक धोरणात बदल घडत नाही. बंगालात कॉंग्रेस-कम्युनिस्ट-तृणमूल-फॉर्वर्डब्लॉक, तमिळनाडूमध्ये द्रमुक-अद्रमुक, केरळात कॉंग्रेस-कम्युनिस्ट, कर्नाटकात कॉंग्रेस-भाजप, आंध्र प्रदेशात कॉंग्रेस-तेलुगूदेशम्‌ असे सर्वच पक्ष सातत्याने आणि अखंडपणे स्वजनधार्जिण्या धोरणाचा पाठपुरावा करतात; तर महाराष्ट्रात अगदी त्याउलट परिस्थिती असते. या सर्वास, स्वतःच्या राज्यात अशी विपरित परिस्थिती गपगुमान खपवून घेणारी महाराष्ट्रीय जनता स्वतःच नाही, तर इतर कोण कारणीभूत असू शकते?

Read More »