राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत (दैनिक लोकसत्ता)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी तत्कालीन विचारवंत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, तेलंग आदी मराठीऐवजी इंग्रजीत लेखन करीत असल्याबद्दल सडकून टीका केली. त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा इंग्रजीतून लेखन करण्याचा सल्ला धुडकावत कटाक्षाने ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ असा रांगडा सवाल करत आपले लेखन मराठीतून केले. हयातभर मायमराठीसाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या पण त्यांच्याच नावाने चालणार्‍या मंडळाचे संकेतस्थळ मराठीमध्ये नाही.

Read More »

समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार)

‘शिक्षणाचे माध्यम’ या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक ’देशांतर्गत देश’ तयार झाला आहे. ’राष्ट्रभावना’ ही कुचेष्टा-टवाळी करण्याची गोष्ट बनली आहे. ’गुलामगिरी’ भूषणावह मानली जात आहे. या देशाबद्दलची निष्ठा, प्रेम, बंधुत्व यांची तसेच इथल्या समृद्ध परंपरांशी इमान राखण्याची प्रतिज्ञा इथली बालके एका परभाषेतून घेतात. व ही गोष्ट कोणालाही हास्यास्पद व लाजिरवाणी न वाटणे हे राष्ट्रीय अस्मितेचा सार्वत्रिक लोप झाल्याचे अत्यंत दुर्दैवी ठळक लक्षण आहे.

Read More »

एस०टी० महामंडळाची तिकिटे इंग्रजीतच? (वाचकमित्रांच्या सूचना)

महाराष्ट्रातच स्वभाषेबद्दल विशेष अनास्था दिसून येते. येते. राज्यात गावोगावी, खेड्यापाड्यात जाणार्‍या परिवहन महामंडळाच्या तिकिटांवर मराठीमध्ये तपशील का नाही? कर्नाटक एस०टी०ची तिकिटे जर कन्नड व इंग्रजी भाषेत आहेत तर महाराष्ट्रात ती फक्त इंग्रजीतच का? इंग्रजी ही महाराष्ट्राची राज्यभाषा केव्हापासून झाली?

Read More »

रेल्वे आणि मराठी (ले० वाचकमित्र बिंदुमाधव अंबिके)

“प्रत्येक गावाला, शहराला एक नाव असतं आणि ते नाव त्या ठिकाणाचे व्यक्तिमत्व असतं. त्या नावामागे काही इतिहास असतो, काही आठवणी असतात, काही भावना असतात. पूर्वी साम्राज्यविस्ताराच्या काळात जेत्यांनी पराजितांच्या देशातील ठिकाणांची नावे बदलण्यामागे तेथील संस्कृतीच्या खुणा आणि भावना जागृत करू शकतील अशा आठवणी नष्ट करणे हाच हेतू असे. हल्ली रेल्वे आणि महाराष्ट्राचे नातेही असेच जेते व पराजिताचे झाले आहे. नितीश कुमार, रामविलास पासवान व लालूप्रसाद यांनी रेल्वे मंत्रीपदाचा वापर पुरेपूर करून घेतला व महाराष्ट्राची रेल्वे उत्तर भारताच्या दावणीला नेऊन बांधली.” 

Read More »

घरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण (ले० अपर्णा लळिंगकर)

दि. १२ जूनच्या चतुरंग मध्ये “घरीच शिक्षण किंवा होम स्कुलिंग” या संकल्पनेवर आधारीत घरात शाळा हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची पायवाट हा वंदना अत्रे यांचा आणि शिकतं घर हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहीती सांगणारा असे तिनही लेख वाचनात आले. सर्वशिक्षा अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरूवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या प्रतिसादा मध्ये करत आहे.

Read More »

’स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक: अनय जोगळेकर)

जगभरात स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ आपले शासन आपण निवडणे एवढा संकुचित नसून आपल्या देशात सर्वत्र आपले शासनव्यवहार, समाजव्यवहार, न्यायसंस्था, संसदव्यवस्था, ज्ञान, विज्ञान, संज्ञापन, साहित्य, कला, छंद, व्यवसाय, उद्योग, रोजगार अशा मानवीजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ’स्व’-तंत्र प्रस्थापित करणे म्हणजेच प्रामुख्याने आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा, आपले विचार (तत्त्वज्ञान), आपल्या रूढी ह्यांचे जतन, प्रस्थापन, संवर्धन व प्रसार करणे इतका विस्तृत असतो.

Read More »

’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)

सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. नुकतीच श्रीनिवास नार्वेकर या आपल्या रसिक मित्राने पाठवली. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्‍यात वळचणीला पडलेल्या जुन्या सुखद आठवणींच्या वरची धूळ झटकली जाऊन त्या आठवणींच्या उबेने मन काही क्षणापुरते का होईना पण पुन्हा टवटवीत होते व आयुष्याचे काही क्षण अत्यंत स्वर्गीय आनंदात जातात.

असा आनंद वाटत फिरणार्‍या मित्राचे आभार कसे मानायचे?

कविता खालील दुव्यावर वाचा. भविष्यकाळातही जेव्हा मनाचा तो नाजुक कोपरा उघडून पहावासा वाटेल तेव्हा पुन्हा वाचा. त्यामुळे जाग्या होणार्‍या आठवणींमुळे स्वतःचे सांत्वन करता येईल की – “देवाने आपल्यावर केवळ अन्यायच नाही केला.”

अमृतमंथन_मनातल्या मनात मी_कवि सुरेश भट

.

आपल्या प्रतिक्रिया, भावना, रसग्रहणे, निरूपणे, अभिप्राय, लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. सर्वच रसिकमित्रांबरोबर तो आनंद वाटून घेऊ.

– अमृतयात्री गट

.

पोलिसांची ‘भाषा’ (दै० सकाळ, मुक्तपीठ, १५ फेब्रु० २०१०)

वाटले, यात बिचार्‍या कानडी पोलिसांची काय चूक, त्यांना हिंदी येत नसेल तर ते काय करणार? पण आम्हीच वेडे ठरलो. त्यातील एक हवालदार चौकीबाहेर आल्यावर आमच्याशी हिंदीतून बोलला आणि त्याने सांगितले, “इथे सर्वांना हिंदी येते, पण कोणीही बोलणार नाही. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान आहे.”

Read More »

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर)

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय – मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

Read More »

मायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)

आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वाभिमानाचा बळी देण्याबद्दलची उदाहरणे आज आपण महाराष्ट्रात सतत पाहत असतो. राजकीय स्वार्थापुढे परक्याचे जोडेही शिरसावंद्य मानण्याची काही तथाकथित नेत्यांची हुजुरेगिरीची संस्कृतीही आपल्याला आता फार नवीन राहिलेली नाही. पण स्वभाषाभिमानापुढे व्यावसायिक फायद्यालाही दुय्यम स्थान देणे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडतील काय आणि घडलीच तर त्याचे इतर मराठी माणसे कौतुक करतील की संकुचितपणा म्हणून हेटाळणी करतील?

Read More »

अशोक ‘सिंग’ चौहानांना उत्तरेकडील सदिच्छांची गरज (ले० डॉ० श्रीपाद पांडे)

आपले मराठी-अभिमानी मित्र (ऍक्सिस बॅंकेला नमवून मराठी बोलायला लावणारे) डॉ० श्रीपाद पांडे यांनी महाराष्ट्राच्य़ा सध्याचे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडमध्ये राज्यभाषेची उपेक्षा करून कसा धडधडीत अपमान केला जात आहे या बद्दल एक टिपण व सोबत पुराव्यादाखल नांदेड रेलवे स्टेशनावरील काही छायाचित्रे पाठवली आहेत, ती पहावीत.

Read More »