मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर)

मुख्य म्हणजे मराठी भाषेचा प्रसार ह्या संगणकीय युगातही वेगाने होऊ शकेल. तसेच इंग्रजीची भीती असल्याने संगणकाला ‘परग्रहावरचा पदार्थ’ समजणारे विद्यार्थी संगणकावर हुकूमत गाजवतील. मराठीतील प्रचंड माहितीचे, ज्ञानाचे चलनवलन-वहन सहजतेने होईल. शासकीय व खाजगी क्षेत्रात संगणकीय मराठी भाषेशी संबंधित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषेची सुवर्णझळाळी उठून दिसेल.

Read More »

Don’t miss the corruption in our everyday life (Francois Gautier, DNA Analysis, Feb. 18, 2011)

DO READ the analysis of the present Indian Society and its psyche made by a foreigner. Most of us would agree (at least in theory, if not in practice) with his analysis of the ’Modern Indian Society’. It talks about the corruption in our actions as well as thoughts and principles and how it has pervaded all the spheres of our life including cricket, sports, advertisements, Bollywood, industry, taxation and many other matters of our day to day life. Just read on…

Read More »

पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय (डीएनए, १३ फेब्रुवारी २०११)

पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्‍या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का?

महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे महत्त्व कमी करणे तसेच महाराष्ट्रात पूर्वीपासून राहणार्‍या मराठी मुसलमानांच्या मनात मराठीबद्दल दुजाभाव निर्माण करणे असा हा मराठीद्वेष्ट्यांचा दुहेरी डाव आपण सर्वांनी एकत्रितपणे हाणून पाडायला हवा.

Read More »

सचिवालय, मंत्र्यालय की मंत्रालय? (प्रश्नकर्ता: यशवंत कर्णिक)

कधी ना कधी तरी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल. पण कालांतराने तो मागे पडला असेल. आज आपले एक अत्यंत ज्येष्ठ असे मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० यशवंत कर्णिक यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे, त्यावर चर्चा करू.

Read More »

पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’)

श्री० ’जय महाराष्ट्र’ या आपल्या अमृतमंथन-परिवारातील सदस्याने विचारलेल्या शंकेला थोडे वेगळा आकार देऊन अमृतमंथनाच्या विचारी वाचकांसमोर ठेवीत आहोत.

————-

’जय महाराष्ट्र’ यांची शंका अमृतमंथनावर हल्लीच प्रकाशित केल्या गेलेल्या ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकासंबंधात आहे. ते म्हणतात:

“मला एक मुद्दा आपल्यापुढे विचारार्थ मांडायचा आहे. ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्‍याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम्‌ प्रमाणम्‌ ! (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये? फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे?”

————

अमृतमंथनच्या सुविद्य वाचकांनो,

श्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या या शंकेबद्दल आपल्याला काय वाटते? अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत? त्यांचे फायदे-तोटे काय? ती चिन्हे एकसारखीच असावीत की वेगवेगळी? या प्रश्नांचा उहापोह व संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीची चर्चा या विचारमंथन चर्चापीठावर करूया. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य पाहिजेच.

या विषयासंबंधित माहिती, आपले मत, कारणमीमांसा या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क० वर उल्लेख केलेल्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे आहे.

हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

.

‘काव्य’ आणि ‘कविता’ हे एकच की भिन्न? (प्रश्नकर्ता: श्री० कल्पेश कोठाळे)

प्रिय अमृतयात्री गट,

सप्रेम नमस्कार.

आपल्या अमृतमंथनावरील विचारमंथन चर्चापीठापुढे एक विषय चर्चेसाठी ठेवत आहे.

“काव्य आणि कविता या दोन शब्दांचे अर्थ एकच की भिन्न?”

शाळेत असताना आम्ही दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे समजत आलो.

पण आपण रामायण, महाभारत यांचा उल्लेख महाकाव्ये असा करतो, महाकविता असा नाही. (अजूनतरी तसे ऐकण्यात आलेले नाही). म्हणजे त्यांत काहीतरी अंतर असावे असे आता वाटते आहे.

अमृतमंथन परिवारातील सुबुद्ध बांधवांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.

कलावे, लोभ असावा.

आपलाच,

कल्पेश कोठाळे

.

आपले मित्र श्री० कल्पेश कोठाळे ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे? आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.

– अमृतयात्री गट

.

Conformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)

अमृतमंथन परिवारातील एक सदस्य श्री० मंगेश नाबर यांनी conformity या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला आहे. भाषाप्रेमी अमृतयात्रींनी मंगेशरावांना योग्य शब्द सुचवावेत असे आवाहन.

Read More »