मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

“अपत्यानं जगात झेंडा लावला की त्याचे आईवडील आपोआपच मोठे होतात. तसंच आपण मराठीचीं अपत्यं. आपल्या प्रयत्नांनीच आपली मायबोलीही मोठी होईल, अशी माझी भावना आहे. आणि ‘हिला बैसवू वैभवाच्या शिरी,’ ही माधव ज्यूलियनांची आसही सफळ होईल.”

Read More »

Hindi, the National Language – Misinformation or Disinformation?

All the legal rights, respect and importance, granted by the statute to other official languages in their respective states must also be conferred upon Marathi in Maharashtra. “We do not ask for anything more, but we shall not settle for anything less too”. Can such a demand be termed as improper, illegal or immoral by any standards?

Read More »

मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण (संगीतकार कौशल इनामदार)

मराठी+एकजुटीच्या सर्व बांधवांना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार याच्या तर्फे मराठीच्या अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण.

Read More »

गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे! (वृत्त: दै० लोकमत, १४ जाने० २०१०)

हिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.

Read More »

पन्नास वर्षानंतरही राज्यात शिक्षणविषयक धोरणाचा खो-खो चालूच !! (विविध वृत्ते)

पुढील तीन वृत्ते वाचा.

१. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी शाळांसाठीचा मास्टर प्लॅन सहा महिन्यांत (दै० सकाळ – प्रेषक: श्री० विजय पाध्ये)

(अमृतमंथन-मराठी शाळांचा मास्टर प्लॅन_Sakal_120110)

२. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी माध्यमाच्या शाळांसाठी राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी –  रामनाथ मोते (दै० सकाळ)

(अमृतमंथन-राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी_Sakal_120110)

३. वृत्त दि० ०८ जुलै २००६: उच्च न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार मास्टर प्लॅन अजुनही तयार नाही (दै० लोकसत्ता – प्रेषक श्री० विजय पाध्ये)

(अमृतमंथन-शाळामंजुरीचा निर्णय रद्द_Loksatta_080706)

.

तीनही वृत्ते नीट वाचा. त्यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.

Read More »

“मराठी शाळा म्हणजे सरकारवर ओझे” आणि “शासकीय व्यवहारात १००% मराठी” (वृत्त: दै० सामना, ६ जाने० २०१०)

५ जानेवारी २०१० या दिवशी महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन विधाने केली – एक कडू, दुसरे गोड. अर्थात सत्य सहसा कटु असण्याचीच शक्यता अधिक असल्यामुळे या दोन विधानांपैकी कडू विधान सत्य ठरण्याची व गोड विधान केवळ नावापुरते निघण्याची शक्यता अधिक वाटते.
Read More »

मर्द मराठ्यांची ऑनलाईन लढाई (ले० कीर्तिकुमार शिंदे, लोकप्रभा, ८ जाने० २०१०)

प्रचंड मोठय़ा संख्येने पण मुख्यत: तलवार आणि भाले घेऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यांना बंदुका व तोफांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर मूठभर इंग्रजांनी सहज हरवलं होतं, हा आपला इतिहास आहे. आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगभरात संगणक व माहितीजालाचा उपयोग माहिती आणि संज्ञापनासाठी वाढत असताना मराठी नागरिक व ग्राहक म्हणून स्वत:चे अधिकार मिळवण्यासाठी आपणही संगणक व महाजालाचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. पत्रव्यवहार व दूरध्वनी या जुन्या साधनांवरच जर आपण अवलंबून राहिलो तर आधुनिक जगात मागे राहू.

Read More »

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.”
Read More »