शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

दि० ११-३-१०च्या लोकसत्तेच्या पुणे वृत्तांतामध्ये आलेली माहिती वाचून मी थक्क झालो. आणि खिन्नही झालो. तुम्हीही व्हाल. पण का ते सांगण्याआधी आपल्याकडे मुरलेल्या काही पक्क्या पण निराधार आणि आंधळया किंवा मेषसिद्धांतांची हजेरी घेऊ.

प्रा० राईलकरांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_शहाणा भारत आणि वेडा जपान_ले० प्रा० राईलकर

प्रा० राईलकरांचा पूर्वी प्रसिद्ध झालेला  पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर) हा लेख देखील अवश्य वाचून पहा.

.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात लिहा.

– अमृतयात्री गट

.

Tags : 

.

35 thoughts on “शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

 1. धन्यवाद प्रा. राईलकर,
  एका डोळे उघडविणर्‍या लेखा बध्दल.
  जेंव्हा अनेक वर्षांपूर्वी जपान मध्ये परकिय आक्रमण झालं आणि ख्रिस्ती मिशनरी लोक आपले पाय पसरू लागले तेव्हा जपानच्या त्यावेळच्या राजाने वेळीच जागे होऊन जपानच्या सीमा बंद करून टाकल्या. अनेक ख्रिस्ती मिशनरी लोकांना यमसदनी पाठवले. त्यामुळे ख्रिस्ती मिशनरी एक तर दुसरीकडे पळून गेले किंवा त्यांनी ख्रिस्ती धर्म सोडून दिला. जे काहि ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती लोक जपान मध्ये उरले ते डोंगरांमध्ये लपून बसले. या सगळ्या घडामोडींनंतर कित्येक वर्षे (१०० पेक्शा जास्त) जपानच्या सीमा इतर देशीयांसाठी बंद होत्या. अगदी व्यापार सुध्दा ते कोणाशी करत नव्हते. याच दरम्यान जपानी भाषेची प्रगती आणि शुध्द जपानी भाषेचा सर्वत्र वापर वढला असण्याची शक्यता आहे. दुसर्‍या महायुध्दाच्या वेळी अणुबॉम्बचा हल्ला होऊनही आणि नंतरच्या राष्ट्र उभारणीसाठी अमेरिके सारख्या इंग्रजी भाषा प्राबल्य असलेल्या देशाची मदत घेवून सुध्दा जपान ची प्रगती ही जपानी भाषेचे अस्तित्व अबाधीत राहून झाली. त्या सगळ्याचाच परिणाम म्हणजे तिकडे असलेली साक्षरता आणि संशोधन संस्थांचे प्रमाण.

  आपल्या देशातील एकूणच शिक्षण व स्थानिक भाषांचा शिक्षण समृध्द करण्या मधील सहभाग आणि जपान मधील वर नमूद केलेली परिस्थिती याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर राबवली गेलेली धोरणं जबाबदार आहेत. दुसर्‍या महायुध्दा नंतर जपानची पुर्नउभारणी होत असताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच जपानी भाषेतून दिल्या जाणार्‍या प्राथमिक शिक्षणाला दिलेगेलेले महत्व हे जपानच्या प्रगतीचे कारण आहे. या उलट नेहरूंनी स्वत:च्या ब्रिटीश शिक्षणातून आलेल्या जाणीवांचा वापर धोरणं ठरवतांना केला. प्राथमिक शिक्षण, कुटिरोद्योग, खेडेगावांचा विकास यांकडे लक्ष न पुरवता कारखाने उभारणे (ते सुध्दा शहरी भागात), उच्च शिक्षणाच्या संस्था काढणे (त्या सुध्दा इंग्रजी माध्यमाच्या आणि शहरी भागात). त्यामुळे जे शहरात रहात होते ते लोक इंग्रजी शिक्षण म्हणजे पर्यायाने उच्चशिक्षण घेवून अधिकच फायद्यात गेले. प्राथमिक शिक्षणावर केले दुर्लक्ष, स्थानिक भाषांची उच्चशिक्षणात गळचेपी, खेडेगावातील कुटिरोद्योगां कडे पूर्ण्पणे दुर्लक्ष या सगळ्याचा परिणाम म्हणजे कारखान्यांच्या शहरी भागातील वाढीमुळे खेडेगावातील अल्पशिक्षित तरूण शहरी भागात कामगार म्हणून स्थलांतरित झाला. गरीब-श्रीमंत, उच्चशिक्षित-अल्पशिक्षित यांमधील दरी वाढतच राहिली. त्यामुळे इंग्रजी शिकल्यानेच मुले पुढे जातात, त्यांना उच्चशिक्षणाचे दरवाजे खुले होतात या असल्या खुळचट कल्पनांनी देश व्यापून टाकलेला आहे. म्हणूनच आता तर अशी अवस्था आहे की धड मातृभाषा पण येत नाही आणि इंग्रजीचा पण आनंदच. त्यामुळे एकूणच शिक्षणाचा आनंदी आनंद आहे. त्यातच राजकारण…….म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!!

  आता डोळे अश्यांचेच उघडू शकतात ज्यांना ते उघडायचे आहेत. विज्ञान- गणित या विषयातील इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द खूप चांगले आहेत. पण ……..

  एक उदाहरण: भूमिती मध्ये (द्विमिती मध्ये) समलंब चौकोन अशी एक संकल्पना आहे. त्या चौकोनाच्या नावातच त्याचा मुख्य गुणधर्म दिसून येतो. पण त्याचाच इंग्रजी शब्द “ट्रॅपेझियम” असा आहे. आता ह शब्द त्या चौकोनाचे गुणधर्म सांगत नाही. त्यामुळे शब्द पाठकरणे याला पर्याय नाही. पण हेच मी मातृभाषेतून शिकल्यामुळे मला ते अवघड गेले नाही. केंब्रिजमध्ये अध्ययन करत असताना एकदा मी हे आमच्या वर्गात स्पष्टकेले तेंव्हा माझे ब्रिटीश प्राध्यापक सुध्दा म्हणाले की मला या व्याख्येचा हा दृष्टिकोन पहिल्यांदाच समजतो आहे.
  जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमांची मुले भूमिती या विषयात कच्ची असतात. बीजगणितात सूत्रं पाठ करून पास होतात. आणि हे जगाच्या पाठीवर सगळीकडे असलेले सत्य आहे.

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र / टिपण खरोखरच अत्यंत माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण आहे. आपले पत्र राईलकर सरांकडे सुपूर्द करूच; पण ते आपल्या सर्वच वाचकांच्या सामान्यज्ञानासाठी (जे सहसा फार सामान्यपणे आढळत नाही) इथेही प्रकाशित केलेच पाहिजे.

   {{एक उदाहरण: भूमिती मध्ये (द्विमिती मध्ये) समलंब चौकोन …………. जगाच्या पाठीवर सगळीकडे असलेले सत्य आहे.}}

   आपण नमूद केलेले उदाहरण व त्यापासूनचा निष्कर्ष अचूक आहे. ज्याबाबतीत इंग्रज व इतर पाश्चात्य विद्वान भारतीय भाषा व विशेषतः संस्कृतचे कौतुक करतात किंबहुना काही बाबींमध्ये हारही मान्य करतात व संस्कृतचे अध्यन करण्यास उद्युक्त होतात अशा सर्व बाबतीत आपण इंग्रजीची त्यांच्याही पेक्षा अधिक प्रामाणिकपणे व निष्ठेने (खरं म्हणजे पारतंत्र्यात असतानाही आपण स्वदेशी मीठच खात होतो असे आम्हाला वाटते) इंग्रजीची भलामण करतो. इंग्रजीमधील सर्वच पारिभाषिक संज्ञा ह्या मुख्यतः लॅटिन व काही प्रमाणात ग्रीक, फ्रेंच अशा भाषांमधून घेतल्या असल्यामुळे इंग्रज मुलांनाही त्या परभाषिकच असतात व म्हणून त्यांना त्या केवळ न समजताच, डोळे (आणि बुद्धी) झाकून घोकंपट्टी करून पाठ करण्याशिवाय गत्यंतर नसते. त्याउलट मूळ संस्कृतमधील अनेक पारिभाषिक संज्ञांचा अर्थ आपल्याला केवळ वाचूनच समजतो. प्राचीन काळी संस्कृतात गणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, शरीरशास्त्र, तसेच थोडेफार कॅल्क्यूलस, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी विषयांत काम झाले असल्यामुळे त्याविषयांत भरपूर प्रमाणात अर्थपूर्ण संज्ञा अस्तित्वात आहेत व नसल्या तर तशा अर्थपूर्ण संज्ञा निर्माण करणे (अनाकलनीय परभाषेवर अवलंबून न राहता) हे सहजच शक्य आहे.

   उदा०
   गणित: eigenfunction = उचितफल, isometric = समायामिक, isosceles triangle = समद्विभुज त्रिकोण.
   शरीरशास्त्र: trachea = श्वासनलिका, oesophagus = अन्ननलिका.

   इंग्रजी अशा सर्वच दृष्टींनी लुळीपांगळी, परावलंबी असली तरीही श्रीमंत व सत्ता मड्डम असल्यामुळे तिच्या श्रीमंतीपुढे झुकून व दीपून जाऊन आपण तिचा एकही दुर्गुण मान्य करण्यास तयार नसतो उलट ओढून ताणून प्रत्येकच बाबतीत तिच्या आरत्या गात असतो. अशा परिस्थितीत शहाणे कोण व वेडे कोण हेच समजेनासे होते.

   आपण वर सांगितलेल्या किश्शांप्रमाणे इतरही काही किस्से संकलित करून आमच्या शहाण्या अंध देशबांधवांच्या माहितीसाठी एखादे (वेडेपणाचे) टिपण सादर करू शकाल काय?

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • तुमचे पाश्चात्य संस्कृत विद्वानांसंदर्भातील निरिक्षण अत्यंत खरे आहे. माझे पतिच एक पाश्चात्य संस्कृत विद्वान आहेत. त्यामुळे मी हे रोज अनुभवते.

    तुम्ही सुचवल्या प्रमाणे एखादे टीपण नक्कीच तयार करेन आणि आपल्याला पाठवून देईन.

    धन्यवाद

    अपर्णा लळिंगकर

    • प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     पाश्चात्य संस्कृत विद्वान म्हणजे काय? पाश्चात्य संस्कृती या विषयातील विद्वान की संस्कृतचे विद्वान जे जन्माने पाश्चात्य आहेत?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

     • ते जन्माने पाश्चात्य आहेत आणि संस्कृतचे विद्वान आहेत. तसे त्यांना इतर देशांतील संस्कृती, भाषा यांविषयी बरीच माहीती आहे. त्यांना मराठी सुध्दा येतं.

      • प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर यांसी,

       सप्रेम नमस्कार.

       ऐकून आनंद झाला. पुण्यात आलात तर आपल्याला (सहकुटुंब) भेटण्यास फार आवडेल. तोपर्यंत अशीच पत्रभेट चालू ठेवू. यजमानांनाही लिहिण्यास सांगावे. मराठीत लिहिले तर उत्तमच किंवा संस्कृतही चालेल. संस्कृत समजेल पण उत्तर मात्र प्राकृत मराठीमध्ये देऊ.

       क०लो०अ०

       – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रीमती अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राला प्रा० राईलकर सरांचं उत्तर खालीलप्रमाणे. (गणित आणि मातृभाषाप्रेम हे दोन्ही त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. म्हणूनच आपण उल्लेख केलेला मराठीतील गणिताची परिभाषा हा मुद्दा तर त्यांना फारच भावला असावा. आपल्याला फार गहिवरून उत्तर लिहिलेलं दिसतंय.)

   ———-

   सुंदर, अभ्यासपूर्ण, तळमळीनं युक्त, राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेली अशी ही प्रतिक्रिया वाचून मन आनंदानं ओसंडून गेलं. तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तोवर तुम्हा प्रस्तुत लेख जितक्या मंडळींपर्यंत पोहोचवता येईल तितक्यांपर्यंत पोहोचवा. हीसुद्धा एक मोहीम व्हावी. तुम्ही वयानं माझ्याहून खूपच लहान असाल, असं वाटतं. मला चार महिन्यांनी 81 वर्षं पूर्ण होतील. तसं माझं कार्यक्षम आयुष्य संपत आलं आहे. उमेद आटली आहे. पण तुम्हाला अजून पुष्कळ काळ उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करा आणि हे कार्य वाढवा.

   तुम्ही अभ्यासू आहात. ह्या दृष्टीनं अभ्यास वाढवा, वाङ्मय गोळा करा, टिपणं काढा. कात्रणं जमवा, ती व्यवस्थित विषयवार लावून ठेवीत जा. शक्य असेल तर त्यांची छानणी (स्कॅनिंग) करून संगणकावर संग्रह करून ठेवा, म्हणजे कमी जागेत भरपूर माहिती तर राहीलच. पण कोणतीही माहिती चटकन हाती लागेल. आणि नेहमी लिहीत जा. लिहिण्यानं माहिती स्मृतीत ताजी राहते.

   असो. फार उपदेश केला असेल तर सोडून द्या. पण तुमची प्रतिक्रिया वाचून राहावलं नाही. म्हणून हा इतका मोठा लेखनप्रपंच केला गेला.

   तुमच्या समलंब चौकोनाच्या उदाहरणाप्रमाणंच हीही पाहा. इसॉफेगस म्हणजे काय ते कळणं कठिण. पण अन्ननलिका म्हणजे काय ते न सांगताही कळतं. आणि अन्ननलिकादाह हेही कळतं. हा संस्कृतच्या आधाराचा मोठ्ठा लाभ आहे. आपण मराठी शिकता शिकताच किती तरी संस्कृत शिकलेलो असतो. याचं उदाहरण अद् हा धातू माहीत नसला तर अन्न शब्द माहीत असतो. क्रुध् माहीत नसलं तरी क्रोध माहीत आहे. कुप् माहीत नसलं तरी कोप माहीत आहे. हन् माहीत नसला तरी हत्त्या, हनन माहीत आहेत. असे कितीतरी. डॉ. रघुवीरांनी अशा पाचशेच्यावर धातूंची यादीच आपल्या कोशात दिली आहे. (The Comprehensive English-Hindi Dictionary of Scientific Terms) दुर्दैवानं आपल्या तथाकथित शिक्षणतज्ज्ञांनी त्यांचं काम वाया घालवलं. परिणामी देश आहे तिथंच राहिला.

   मनोहर राईलकर

   ———–

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • ही प्रतिक्रिया मी प्रा. राईलकरांना त्यांच्या इ-मेल पत्त्यावर पाठवली होती आणि त्यांची मला पोच पण मिळाली.

    धन्यवाद प्रा. राईलकर,
    तुमच्या अतिशय भावपूर्ण प्रतिक्रिये बद्द्ल. मी तुमच्या पेक्षा वयाने आणि ज्ञानाने खूपच लहान आहे. तुम्ही केलेले मार्गदर्शन पाळण्याचा आणि अमलात आणण्याचा प्रयत्न करेन. मी स प चीच विद्यार्थीनी आहे आणि गणित विभागात शिकलेली. पण तुम्ही निवृत्त झाल्यावर स प मध्ये आले. त्यामुळे आपली भेट कधी झाली नाही. पण मी आपले नाव ऐकून आहे. सध्या मी बंगलोर येथे आहे. पुण्याला आले की नक्की भेटेन. आपल्या आधिच्या एका पत्रांत आपला पत्ता आणि दूरभाष दिलेला आहेच. फोन करून येईन.

    आपला लेख शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.

    क. लो. अ.

    अपर्णा लळिंगकर

 2. इथं चाललेल्या उत्तर-प्रतिउत्तरां मध्ये मी काही भाष्य करण्याइतपत माझी योग्यता आहे कि नाही हे मला माहित नाही. पण इंग्रजीला दोष देणारे व संस्कृतचा उदो-उदो करणारे विचार पाहिले, म्हणून मी हा चोंबडेपणा करीत आहे.

  कॅलिडोस्कोप च्या भिंगातून आपण जेंव्हा पाहतो तेंव्हा आपल्याला एक ‘विशिष्ट आकृती’ दिसते. त्या आकृतिचे ही आतमधल्या तीनही बाजूच्या आरश्यातील प्रतिबिंबामुळे अजून एक मोठी व वेगळी आकृती दिसते. हे आपण पहात असतानाच जर आपण तो कॅलिडोस्कोप थोडासा जरी फिरवला तर आतापर्यंत जी आकृती आपण पहात होतो, ती नाहीशी होत, एक नवी आकृती आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. लहानग्यांसाठी ही अशी दृष्ये व दृष्यबदल पाहणं खूप आनंददायी असतं.

  भाषा ही एक ‘प्रतीक-व्यवस्था’ आहे. भाषेत जे बदल घडतात ते परिवर्तन नसते; तर ते असते प्रतियोजन! हे प्रतियोजन कशामुळे होते?, तर स्थित्यंतरामुळे होतं. स्थित्यंतर म्हणजे स्थितीतील बदल. इथं स्थिती म्हणजे ‘एका स्तरावरील अवस्था’. याच अनुशंगाने प्रतीक-व्यवस्थेचे स्थित्यंतर म्हणजे ‘एका स्तरातील अवस्थे’ मधून ‘दुसर्‍या स्तरातील अवस्थेत’ प्रवेश!
  उदाहरणादाखल खालील बदल हे सुक्ष्म स्तरावरील आहेत..
  ग्रीक…..संस्कृत….अर्थ
  esti…..asti……..आहे

  उत्क्रांति अवस्थेत पोहचण्यासाठी ‘सुधारणा’ व ‘बदल’ हे दोन नियम आहेत. या नियमांनीच हे जग विकसित होत असते.

  एका मराठी चित्रपटात, ‘सनई चौघडे’ मध्ये एक गाणं आहे, “आयुष्य म्हणजे चूलीवरल्या कढईतले कांदेपोहे!!’ गाणं अगदी रॉकींग आहे!, नाही का? ह्या गाण्याच्या ओळीमध्येच जे आहे ते मला इथं सांगायचे ते आहे. काळ हा कधीही सरळ रेषेत चालत नाही. तो नेहमी सर्पिल्या चालीने, नागमोडी वळणे घेत वरच्या दिशेने पूढे सरकत असतो. कधी वरच्या स्तरावर, तर कधी खालच्या स्तरावर. आयुष्यातील ह्या चढ-उताराने, वर-खाली होण्याने मानवी जीवन अगदी चूलीवरच्या कढईतल्या कांदेपोह्यासारखे ढवळून निघते, पक्के शिजते, तयार होते.

  संस्कृतही ज्या इंडोयुरोपीअन भाषा कुलातील सदस्य आहे त्याच कुलातील इंग्रजी सुद्धा तीचीच दूरची नातेवाईक आहे. इंग्रजी संस्कृतची नातेवाईक आहे म्हणून मराठी भाषेची ही नातेवाईक आहे. आणि म्हणून इंग्रजीला दोष देणं, संस्कृतला डोक्यावर बसवणं वा अगदी उलट वागणं ह्या दोनही चूकिच्या गोष्टी आहेत.
  हे झालं वरवरचं बोलणं. बृहद प्रतलावर (ब्रॉड स्केल) पाहिले तर असे कळेल की,
  सध्याचे युग शुद्रांचे, कष्टकर्‍यांचे आहे. या आधीचे वैश्य युग संपले, प्रतिकात्मक पद्धतीने म्हणायचं झालं तर जगाच्या अर्थिक राजधानीतील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ पडला/पाडला तेव्हांपासून पैश्याची ताकद, इथं मक्तेदारी, लोप पावत आहे. त्या आधि तलवारधारींचे क्षत्रिययुग होते, वैश्य इंग्रज भारतात व्यापाराच्या उद्देशाने येईपर्यंत क्षत्रिययुग होते. व त्या आधि आध्यात्मिक जगताचे ब्राह्मणयुग होते. प्रत्येक युगात त्या-त्या वृतीचे वर्चस्व असते. आता शुद्रयुग आलेच आहे. तर मग ह्या युगात ‘आपले मन आपल्या ‘कामात’ गुंतवून जीवन शांततेने व्यतित करणे’, हाच साधा सोपा मार्ग आहे.

  ‘द्न्यान हे नवनिर्मितीतून प्रकट होवून पैसे कमावण्याचे माध्यम व्ह्यायला हवे!’हा इंग्रजी भाषेचा चा मंत्र होता.
  या उलट
  ‘द्न्यान हे अध्यात्मिक उन्नतीने प्रकट होवून त्यायोगे संसारी आयुष्याबाबत विरक्ती यायला हवी!’हा मंत्र संस्कृत ने दिला.
  ‘द्न्यान हे नवनिर्मितीतून प्रकट होत बहुजनांच्या उपयोगास यायला हवे!’ हा मंत्र जी भाषा ह्या शुद्रयुगात अमलात आणेल तो भाषक समाज येत्या काळात सुखाने नांदेल!

  ‘स्वर व व्यंजन ह्यांच्या जुळण्याने ‘अक्षर’तयार होतं.’, हे विचार भारतीय तत्वद्न्यानातील ‘शिव’ व ‘शक्ती’ यांच्या मिलनातून विश्व उत्पन्न होत जाते’ ह्या विचाराशी समरस होणारे आहेत. जणूकाही ‘अक्षर’हि संकल्पना म्हणजे ‘अर्धनरनारी’च रूपच जणू!
  ‘ब्राह्मी लिपी’ देखील आजपावेतो तशाच पद्धतीने विकसित होत तिच्या सध्याच्या ‘बाळबोध पद्धतीच्या’ स्तरापर्यंत उदाहरणार्थ ‘देवनागरी लिपी’पर्यंत पोहचलेली आहे.

  • प्रिय श्री० सतीश रावले यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   ह्याला एखादा तज्ज्ञ व अनुभवी भाषावैज्ञानिकच उत्तर देऊ शकेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • मी काही भाषा तज्ज्ञ नाही. पण मला काही गोष्टी इथे स्पष्ट कराव्याशा वाटतात.
   १) सर्वप्रथम सतीश रावते भाषा आणि संस्कृती यांच्या विषयी जे काही म्हणताआहेत त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण हे मुद्दे किंबहुना यापेक्षाही अधिक मुद्दे मी माझ्या पतिराजांकडून ऐकले आहेत.
   २) पण सतीश रावते यांनी या प्रति उत्तराच्या सुरूवातीला त्यांचे एकूण चर्चे विषयीचे नोंदवलेले आकलन न पटणारे आहे. कारण या चर्चे चा विषय हा शिक्षण मातृभाषेतून देणे कसे योग्य आणि मुलांच्या एकूणच बौध्दिक वाढीसाठी आवश्यक कसे आहे या विषयी आहे. ना की मराठी, संस्कृतचा उदो उदो व इंग्रजीचा दुस्वास.
   वरील चर्चे मध्ये इंग्रजीभाषेतून सुध्दा अनेक संकल्पना आपल्याला कश्या नीट समजत नाहीत पण हेच जर आपण मातृभाषेतील शब्द वापरल्यास त्याच संकल्पना समजणे किती सोपे जाते याची उदाहरणे दिली आहेत.
   थोडक्यात इंग्रजी ला किंवा इंग्रजी शिकायला कोणिही विरोध करत नाही आहे.
   ३) मातृभाषेतून शिकणे म्हणजे आपल्या स्वत:च्या हाताने जेवणे. आपल्याला स्वत:च्या हाताने जेवल्यावर जे समाधान लाभते ते चमच्याने किंवा दुसर्‍याच्या हाताने जेवल्यावर लाभत नाही. तसेच आपले पोटही त्याने भरत नाही. इंग्रजी भाषेतून शिकणे, वाचणे, लिहीणे हे तसेच आहे आपल्यासाठी. (हे विधान अश्या लोकांसाठी नाही की जे जन्माला येतानाच इंग्रजी शब्द बोलत बाहेर येतात.) अगदि लहान मुलाला सुध्दा जर आईने भरवलं किंवा ते स्वत:च्या हाताने खायला लगलं तरच अंग धरते. हेच जर कोणी दुसरं खायला घालत असेल तर अंगी लागत नाही.
   मला असं वाटतं की सतीश रावते यांनी याच साईट वर प्रसिध्द झालेले प्रा. राईलकर सरांचे मातृभाषेतून शिक्षणा संबंधीचे लेख वाचलेले नाहीत. नाहीतर ते असं म्हणाले नसते.
   श्री सतीश रावते, प्रा. राईलकर सरांचे लेख वाचावेत. म्हणजे आपला वरील गैरसमज दूर होईल.
   अजुन काही सांगण्याची गरजच नाही.

   • प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    आम्ही सर्वही भाषाविज्ञानाच्या बाबतीत शून्य असल्यामुळे फार काही वादविवाद करू शकत नाही, पण आपले मुद्दे विशेषतः २ व ३ योग्य वाटतात.

    ही अनुदिनी ’मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस’ ह्याच विषयास मुख्यतः वाहिलेली असल्यामुळे वाचकांनी पूर्वप्रकाशित लेखांवरूनही दृष्टी टाकली तर पुन्हापुन्हा तेच मुद्दे मांडावे लागणार नाहीत. राईलकर सरांचे लेख तर प्रत्येक वाचकाने अवश्य वाचावेत.

    जुने ते सोने हे नेहमीच नव्हे तसेच प्रत्येक बदल हा योग्यच असतो असे देखील नव्हे. भारताने आपल्या अनेक चांगल्या गोष्टी टाकून दिल्या व पाश्चात्यांच्या काही गोष्टींचे अनुकरण करणे उगाचच सुरू केले. नंतर पाश्चात्यांनीच आपल्या अनेक (उदा० योग-योगा?, आयुर्वेद, शाकाहार, अध्यात्म, वैदिक गणित, मानसशास्त्र, इत्यादी) गोष्टींची वाखाणणी करणे सुरू केल्यावर मग आपल्याला भारतीय संस्कृती, परंपरा अगदीच टाकाऊ नव्हत्या असे थोडेफार वाटू लागले.

    आणखी एक मुद्दा म्हणजे आज सर्व पाश्चात्य तज्ज्ञ मातृभाषेचे महत्त्व पुन्हापुन्हा अधोरेखित करीत असले तरीही आपण मात्र आमच्यापेक्षा तुमचीच भाषा थोर असे त्यांनाच सागतो.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

   • अपर्णा ताई यांना नमस्कार!

    माझं नाव आहे ‘सतीश रावले’. ‘ले’.. ‘लै भारी मधला!’
    हे जग नियतीच्या नियमांच्या चौकटीतच चालते. जेंव्हा नियती सांगते कि, ‘तुम्ही ह्यांच्याच ढेंगाखालून जायचं’, तेंव्हा तसच करायचं असतं.
    अमेरीकेने जपान वर बॉंब टाकला अन जपान्यांनी आपली पायरी ओळखली. छडी लागे छम छम विद्या येई घम घम.
    इंग्रजांनीच या देशात सामान्य जनतेसाठी शिक्षणाचा प्रसार केला तेंव्हा कुठे भारतीय समाज सद्न्यानी झाला. मराठीचे व्याकरण देखील त्यांच्या देखरेखीखाली आकारले गेले.

    तोवर मराठी ही एक बोलीभाषाच होती. द्न्यान देणार्‍याच्याच डोक्यावरती हात ठेवण्याचा आगाऊपणा करणार्‍यांना नियतीने चांगलच फटकावून काढले. टिळक असो की

    सावरकर इंग्रजांना अद्दल घडविणार्‍यांना आयुष्यभर (नियतीकडून ) त्रासच झाला. वैश्य इंग्रजांशी ‘अंहिसेचा’ मार्ग स्विकारत सत्याचा पाठपुरावा करणारे वैश्य मोहनदास करमचंद

    गांधी म्हणूनच ह्या भारत देशाचे ‘महात्मा’ म्हणून गौरविले गेले.

    मी प्रतिसाद देतानाच म्हटले होते कि मी ‘चोंबडेपणा करीत आहे’. प्रा. राईलकरांच्या लेखांबद्दल मी काही म्हटले नव्हते. ” तुम्ही वयानं माझ्याहून खूपच लहान असाल, असं वाटतं.
    मला चार महिन्यांनी 81 वर्षं पूर्ण होतील. तसं माझं कार्यक्षम आयुष्य संपत आलं आहे. उमेद आटली आहे.” हे लिहीलेलं वाचलं अन मला रहावलं नाही म्हणून मी चोंबडेपणा केला.

    ‘एका गोष्टीचे महत्व विशद करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतयं.’, हे दाखवण्याचाच माझा प्रयत्न होता, आहे आणि असणार!!!

    “अजुन काही ऐकण्याची/ वाचण्याची गरज नाही”, असे मी देखील समजतो.

    क.लो.अ.

    • प्रिय श्री० सतीश रावले यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     {{इंग्रजांनीच या देशात सामान्य जनतेसाठी शिक्षणाचा प्रसार केला तेंव्हा कुठे भारतीय समाज सद्न्यानी झाला. मराठीचे व्याकरण देखील त्यांच्या देखरेखीखाली आकारले गेले. तोवर मराठी ही एक बोलीभाषाच होती.}}

     कृपया खालील लेख वाचा.

     https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

     त्यातील अटल बिहारी वाजपेयींनी संदर्भिलेल्या पुस्तकातील उतारे वाचा. महाजालावरूनही माहिती मिळेल. मराठीत उत्तमोत्तम तत्त्वज्ञानावरील ग्रंथ (शिवाय संस्कृतमधील ज्ञानाची जोड) होती त्या नंतर काही-शे वर्षे देखील इंग्रजी भाषा ही बायबलसारख्या ग्रंथाचे साधे भाषांतर उपलब्ध करून देण्याच्याही लायकीची समजली जात नव्हती. स्वतः इंग्रजही तिला हिणकस, गव्हार, असंस्कृत, बोजड, व्हर्नाक्यूलर भाषा असेच म्हणत असत. अर्थात त्यातून त्यांनी स्वाभिमानाने स्वतःच्या भाषेची प्रगती करून व निश्चयाने आणि कायद्याच्या जोरावर फ्रेंच भाषेचे महत्त्व कमी करून स्वतःचा व स्वतःच्या भाषेचा उत्कर्ष साधला. अन्यथा प्रथम इंग्लंडने व नंतर अमेरिकेने जगावर सत्ता (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) गाजवली तरी त्यांनी जगभरात फ्रेंच भाषेचा प्रसार केला असता, इंग्रजी नव्हे. आणि आज इंग्रजीच्या जागेवर त्याहून अधिक जोमाने फ्रेंच भाषा प्रस्थापित झालेली असती.

     न्यूनगंड बाळगणार्‍या माणसांना प्रगती करणे शक्यच नसते. एकेकाळी शिवाजी महाराजांनी जे दूरदृष्टीने साध्य केले ते तेव्हाच्या पूर्णपणे विपरीत व प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातीलच काय पण देशातील इतर कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळणे ही गोष्ट देखील बहुसंख्य भारतीयांना अशक्यच बाब वाटत होती. संयुक्त महाराष्ट्रही सहज मिळालाच नाही. अशी कुठलीही दुष्प्राप्य गोष्ट प्राप्त करणे स्वाभिमान, आत्मविश्वास गमावून बसलेल्या व्यक्तींना शक्यच नाही. दुर्दैवाने आज तरी मराठी माणसाची परिस्थिती तशीच दिसते आहे. आपल्यासारख्या अनुभवी, ज्येष्ठ, ज्ञानवृद्ध मंडळींनीच समाजाला मार्ग दाखवला पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे.

     समाजकारणी म्हणून गांधीजींच्या श्रेष्ठ्त्वाबद्दल संशय नाही. पण इतिहासतज्ज्ञांना विचारता ते सांगतील की गांधींना इंग्रजांनी मुद्दाम अधिक मोठे केले ते इतरांचे महत्त्व कमी करण्यासाठी, किंबहुना इतर जहालांचा त्रास त्यांना अधिक होत होता म्हणून. शिवाय शेवटी शेवटी आर्थिक दृष्ट्यादेखील भारताला पिळूनपिळून चिपाडच राहिली होती व राज्यकारभार करणे अधिकाधिक तोट्याचे व धोक्याचे होऊ लागले होते. म्हणून भारताची शकले पाडून, त्याला कमकुवत करून, त्यातल्या त्यात गांधी व नेहरूंना मोठे करून, त्यांच्या कडे सत्ता देऊन, इंग्रजांनी सत्ता सोडली.

     आता सद्य परिस्थितीत लोकांमध्ये पुन्हा स्वाभिमान व आशावाद जागृत करण्यासाठी काय करावे असे आपल्याला वाटते?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 3. हे संकेतस्थळ व्यक्त केलेल्या विचारांप्रमाणे खरचं चाललंय का?
  सुस्वागतम्‌ मध्ये लिहलंय – “कधी आपल्या मराठमोळ्या दृष्टीची क्षितिजे अधिक फैलावून ती जागतिकच नव्हे तर विश्वात्मक पातळीवर जाऊन विचार करू.” हे अगदी भारदस्त आहे. पण पुणं, पुण्याची मानसिकता ह्याच्या बाहेर ते अजून आलचं नाही असं दिसतंय. वरच्या प्रतिसादात -“संस्कृत समजेल पण उत्तर मात्र प्राकृत मराठीमध्ये देऊ.” हि काय भानगड करून ठेवलीय. मराठी भाषा राजभाषा, द्न्यान भाषा व्हावी अशी महाराष्ट्रातील मराठी जनांची ईच्छा असताना संस्कृत साठी तीला ‘प्राकृत’ ठरवण्याची मानसिकता का?

  खरी समस्या मानसिकतेत आहे, दृष्टी’कोना’ त आहे.

  पुराणातील कथांच्या वाचनानुसार ‘सागरमंथन’ म्हणजे सागराचे मंथन करून देवांनी ‘अमृत’ प्राप्त केले होते. ह्या संकेत स्थळावर ‘अमृतमंथन’ म्हणजे चक्क अमृताचे म्हणजे ‘जे प्राप्त करायचे आहे’ त्याचेच मंथन केले जाणार आहे. हे कसे काय बुवा? आपण पूण्याच्या मंडळींनी स्वर्गातील देवांच्याही पुढची अवस्था प्राप्त केली आहे का?
  बरं दे जावू दे. ‘अमृता’चे म्हणजे ‘जे प्राप्त करायचे आहे’ त्याचेच मंथन करण्याइतपत ‘अमृत’ तुमच्याकडे असेल तर कृपया एक पेला मला ही द्या. अशी आपणास विनंती.

  • प्रिय श्री० सतीश रावले यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   १. आपण म्हणता:
   {{ मराठी भाषा राजभाषा, द्न्यान भाषा व्हावी अशी महाराष्ट्रातील मराठी जनांची ईच्छा असताना संस्कृत साठी तीला ‘प्राकृत’ ठरवण्याची मानसिकता का?}}

   मराठीला प्राकृत हे कुठल्याही प्रकारे हिणकस, असंस्कृत म्हणण्यासाठी म्हटले नाही. संस्कृतेतर भाषा म्हणून प्राकृत असे म्हटले. आपल्या मराठी मातृभाषेबद्दलच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. पूर्वी संस्कृत भाषेला फार महत्त्व होते तेव्हा इतर भाषांना न्यून दर्जाच्या या अर्थाने प्राकृत असे म्हटले जात असेल. पण आज स्वतः संस्कृतला कोण महत्त्व देतो? संस्कृत सोडा, मराठी सोडा, आज इंग्रजांच्यापेक्षाही आपल्याला इंग्रजी थोर वाटते. पाश्चात्य मंडळी संस्कृतचे गुणगान करीत असतात, मातृभाषेचे महत्त्व सांगत असतात पण तरीही आम्ही आमच्या गुलामगिरीबद्दलच्या अभिमानापासून यत्किंचितही न ढळता तुमची इंग्रजीच सर्वोत्कृष्ट आहे असे बाणेदार उत्तर त्यांच्या तोंडावर फेकून त्यांनाच थक्क करून टाकतो.

   २. {{‘अमृता’चे म्हणजे ‘जे प्राप्त करायचे आहे’ त्याचेच मंथन करण्याइतपत ‘अमृत’ तुमच्याकडे असेल तर कृपया एक पेला मला ही द्या. अशी आपणास विनंती.}}

   क. आपल्या लेखनावरून अमृतमंथन हा तर्कदुष्ट शब्द वापरून आम्ही मोठाच मूर्खपणा केलेला दिसतोय. म्हणून महाजालावर शोधावे तर अमृतमंथन, amrutmanthan, amrit manthan, amrut manthan, Amrita Manthan, amrita manthana, अशा विविध नावांचे लाखाहून अधिक परिणाम सापडले. म्हणजे आम्ही अगदीच एकटे मूर्ख नाही तर ’लाखांपैकी एक’ मूर्ख आहोत.

   ख. अमृतमंथन ह्या नावाचा व्ही० शांताराम ह्यांचा चित्रपटही १९३४ वर्षी येऊन गेला. अर्थात व्ही० शांतारामांनी फार अभ्यासपूर्वक ते नाव शोधले असेल असे वाटत नाही. १९६१ साली देखील एक हिंदी चित्रपट त्याच नावाने आला होता. अर्थात ही सर्व चुकांची परंपरा !!

   ग. मोदींच्या गुजराथेत मोठ्या प्रमाणात वायु सापडला त्या प्रकल्पास अमृतमंथन असेच नाव दिले आहे. अर्थात मोदींचे संस्कृतचे व भारतीय संस्कृतीचे ज्ञान ते केवढे असणार? त्यांना सल्ला घ्यायला योग्य विद्वान सापडला नसावा.

   घ. बॅंकॉक येथील नवीन सुवर्णभूमी विमानतळावर अमृतमंथन ह्या नावाचे एक प्रचंड मोठे चित्रशिल्प उभारले आहे. अर्थात ते चित्र व कथानक समुद्रमंथनावरच आधारित आहे. पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे की – “अमृतमंथन नावाची योग्यता तरी सिद्ध करा किंवा एक पेला अमृत द्या”.

   च. आणखी काही आठवले. अनुदिनीला नाव ठरवण्याच्या वेळी आम्ही आपटेंचा संस्कृत शब्दकोश पाहिला होता. त्यात त्यांनीही तशीच घोडचूक करून अमृतमंथनाचा अर्थ चक्क ’churning (of the ocean) for nectar’ असाच ठोकून दिला आहे. ही गोष्ट मात्र धक्कादायक आहे. आपटेंचा संस्कृतचा शब्दकोश हा आत्तापर्यंत प्रमाण मानला जायचा. पण आज त्याचे पितळ उघडे पडले. अमृतमंथन हा षष्ठी तत्पुरुषा ऐवजी चतुर्थी तत्पुरूष असा चुकीचा समास सोडवला असेल का?

   छ. आपल्या स्पष्टीकरणामुळे हे सर्व चूकच असल्याची पूर्ण खात्री पटल्यामुळे आम्ही Cologne Sanskrit Dictionary पाहिली. तर तिथेही वेड्यांचा बाजार पसरलेला !! ते म्हणतात, “the churning for the Amrita”. घ्या !!

   कमालच झाली. आता कोणा-कोणाकडे अमृताचा पेला मागायचा? एकंदरीत काय तर जगात पढतमूर्खांचाच भरणा अधिक. खरे विद्वान अगदीच विरळा.

   ३. {{हे संकेतस्थळ व्यक्त केलेल्या विचारांप्रमाणे खरचं चाललंय का? सुस्वागतम्‌ मध्ये लिहलंय – “कधी आपल्या मराठमोळ्या दृष्टीची क्षितिजे अधिक फैलावून ती जागतिकच नव्हे तर विश्वात्मक पातळीवर जाऊन विचार करू.” हे अगदी भारदस्त आहे. पण पुणं, पुण्याची मानसिकता ह्याच्या बाहेर ते अजून आलचं नाही असं दिसतंय.}}

   जेव्हा शक्य तेव्हा (कधी कधी असे म्हटलेच आहे) आम्ही जागतिक स्तरावरील जपान, इस्रायल, व इतर देशांची उदाहरणे देऊन व जगभरातील भाषातज्ज्ञांची मते उद्धृत करून वगैरे मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावणे, न्यूनगंड कमी करणे यासाठी प्रयत्न करतो. प्रा० राईलकरांसारख्या व इतर ज्येष्ठ व कळकळीच्या व्यक्तींचे लेख प्रकाशित करतो. अर्थात कदाचित हा वेडेपणा असेल. आपल्याला ही पुणेरी मानसिकता वाटत असावी. आज मराठीच्या बाबतीत कशालाही पुणेरी म्हणणे ही एक अत्यंत जहाल शिवीच होते असे वाटते. आणखी काही म्हणायलाच नको.

   ४. {{“अजुन काही ऐकण्याची/ वाचण्याची गरज नाही”, असे मी देखील समजतो.}}

   – हे आपले म्हणणे पटले.

   थोडक्यात काय तर आपटे, कलोनच्या शब्दकोशांचेही प्रमाद त्यांच्या पदरात घालण्याची योग्यता असलेली आपली विद्वत्ता आपण आमच्यासारख्या यःकश्चित, मूर्ख व क्षूद्र माणसांना सुधारण्यासाठी खर्ची घालणे हा एक मोठाच राष्ट्रीय अपव्यव आहे असे आम्हाला सादर व अतिनम्रपणे नमूद करावेसे वाटते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • श्री सतीश रावले यांस,

   ८१ वर्षे वयाच्या घोळातील गैरसमज उशीरा लक्षात आला. आपण कोणता मजकूर कुठुन कॉपी आणि पेस्ट केलेला आहे ते लक्षात येणं कठीणच. असो.

   १) वयाच्या घोळामुळे सगळेच संदर्भ बदलतात. म्हणजे आमच्या कडे तशी रीत आणि संस्कार आहेत की वयस्कर व्यक्तीचे विचार जरी पटले नाहीत तरी कोणत्याही प्रकारच्या असभ्य भाषेत उत्तर द्यायचे नाही. त्यागैरसमजातून वरील प्रतिक्रीया होती. तुमची पहिली प्रतिक्रीया वाचून मला वाटले की तुम्ही एक भाषा तज्ज्ञ असाल पण वयामुळे सगळंच व्यवस्थित वाचायला जमलं नसेल म्हणून पूर्णपणे विषयांतर करणारी प्रतिक्रीया लिहिलीत. तसे मी माझ्या तुम्हाला लिहिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत नमूद केलेच आहे. पण तुमची दुसरी प्रतिक्रीया त्या गैरसमजात अजुनच भर टाकणारी निघाली. त्यामुळे मी मला पहिल्या प्रतिक्रियेतील काही न पटलेल्या समाचार घेतला नाही. तसे तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषया कडे चर्चा भरकटवण्यात कमालीचे यशस्वी झालात त्याबध्दल तुम्हाला मानलंच पाहीजे. अश्या प्रकारे विषयांतर लोक करतात त्यालाच आम्ही मराठीत सुतावरून स्वर्ग गाठणे असेही म्हणतो. असो.
   २) तुमच्याच दुसर्‍या प्रतिक्रीयेत तुम्ही असे म्हणालात,
   {{मी प्रतिसाद देतानाच म्हटले होते कि मी ‘चोंबडेपणा करीत आहे’. प्रा. राईलकरांच्या लेखांबद्दल मी काही म्हटले नव्हते. }}
   पण सगळ्या प्रतिक्रीया या प्रा. राईलकरांच्या लेखावर आधारीत चालू होत्या. त्यामुळे आलेली प्रतिक्रीया ही त्यांच्याच लेखासंदर्भात असणार हे गृहीत आहे. आता आम्हाला तुमचा छूपा हेतू माहीत नव्हता (विषयांतर करण्याचा) नाहीतर मी ती प्रतिक्रीया लिहिण्याची सुध्दा तसदी घेतली नसती. आता वरील वाक्यांमध्ये आपणच आपले खरे मुल्यमापन केले आहेत ते मात्र बरे झाले म्हणजे आम्ही फक्त त्यावर बोट ठेवणार आणि बोलणार.
   ३) बाकी तुमच्या एकूण लिखाणा वरून असे भासते की प्रा. राईलकरांनी जी भावपूर्ण प्रतिक्रीया दिली त्याला आपला विरोध असावा. म्हणजे तुम्ही असे म्हणालात की {{” तुम्ही वयानं माझ्याहून खूपच लहान असाल, असं वाटतं. मला चार महिन्यांनी 81 वर्षं पूर्ण होतील. तसं माझं कार्यक्षम आयुष्य संपत आलं आहे. उमेद आटली आहे.” हे लिहीलेलं वाचलं अन मला रहावलं नाही म्हणून मी चोंबडेपणा केला.}} हे वाचून आपल्याला का रहावलं नाही ते समजत नाही. बहुधा तुम्हाला माझ्या “मी पुण्याचीच स प महाविद्यालयातील……” या प्रतिक्रीयेची खूपच जबरदस्त अ‍ॅलर्जी आलेली दिसते. पण या प्रतिक्रीयेमुळे आपलं काय घोडं मारलं गेलं हे समजलं नाही. कारण तुम्ही एका सामान्य अपर्णा लळिंगकर वरून एकदम लो. टिळक, स्वा. सावरकर यांसारख्या महान व्यक्तीमत्वांवर घसरलात. त्यातच मो. क. गांधींना (म्हणजे महात्मा गांधींना हो) वैश्य म्हणून घुसडलेत. ज्या गांधींनी “वैष्णव जन तो……..” या भजनाचा गजर आयुष्यभर केला त्यांना आवडणार नाही हो ते. पण हे सगळे लोक त्यांची बाजू मांडायला नाहीत म्हणून मला दुसरी प्रतिक्रीया लिहावी लागली. लो. टिळक, स्वा. सावरकर यांसारख्या महान व्यक्तीमत्वांचा इतका टोकाचा तिरस्कार करण्यासाठी तुमची बौध्द्दिक आणि वैचारिक बैठक काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही.
   तसेच नेहरूंबध्दलची वस्तुस्थीती आहे की त्यांच्या सुरूवातीच्याच अनेक चुका आपण आजही भोगत आहोत. अगदी सियाचीनचे उदाहरण घ्या की. नेहरू मोठ्या आविर्भावात संसदेत म्हणाले, ’जिथे गवताचं पातं सुध्दा उगवत नाही त्याचा आपल्याला काय उपयोग? तो भूप्रदेश चीनला दिला तरी हरकत नाही”. आपल्या काही जागरूक संसद्पटूंमुळे सियाचीन वाचला. त्यांनी नेहरूंना असे विचारून गप्प केले की “तुमच्या डोक्यावर एक सुध्द्दा केस उगवत नाही मग त्याचा काय उपयोग? मग ते सुध्द्दा असेच देउन टाका कोणाला तरी.” आज सुध्द्दा चीन लडाख, अरूणाचल प्रदेश यांसारख्या प्रदेशांतून घुसखोरी करतोच आहे. कारण घुसखोरी करणे हे चीनच्या रक्तातच आहे. विकीपीडीया या संकेतस्थळावर जरी आपण चीनचा इतिहास वाचला तरी आपल्या माहीतीमध्ये मोलाची भर पडेल.
   आपले जपान च्या संदर्भातील वक्तव्य {{अमेरीकेने जपान वर बॉंब टाकला अन जपान्यांनी आपली पायरी ओळखली. छडी लागे छम छम विद्या येई घम घम.}} हे आपल्या अगाध ज्ञानाची ओळख पटवून देते. संदर्भासाठी हे संकेतस्थळ वाचले तर आपल्या अगाध ज्ञानात भरच पडेल. http://en.wikipedia.org/wiki/History_of_Japan
   ४) {{वैश्य इंग्रजांशी ‘अंहिसेचा’ मार्ग स्विकारत सत्याचा पाठपुरावा करणारे वैश्य मोहनदास करमचंद गांधी म्हणूनच ह्या भारत देशाचे ‘महात्मा’ म्हणून गौरविले गेले.}} तुमचे हे विधान तर अगदी आपल्या अगाध ज्ञानाचा कडेलोटच आहे. १५० वर्षे इंग्रजांनी भारतीय उपखंडावर राज्य करून सर्व प्रकारचे शोषण करून काहीच उरले नव्हते. अगदी चिपाड झाले होते. त्यातच दुसर्‍या महायुध्द्दामध्ये इंग्रजांच्या सत्तेला चपराक बसलेली होती. येवढं मोठं साम्राज्य चालवण्या साठी तितके मनुष्यबळ नव्हते त्याच प्रमाणे आर्थीक फटका, तेलाच्या राजकारणामुळे निर्माण झालेला मिंधेपणा यामुळे विस्कळीत झालेलं साम्राज्य (कृपया श्री गिरीश कुबेर यांची तेलाच्या राजकारणावर आधारित तीनही पुस्तके वाचावीत संदर्भासाठी नावे: अ) हा तेल नावाचा इतिहास आहे ब) एका तेलियाने क) अधर्म युध्द ), नव्याने निर्माण झालेली स्वातंत्र्याची जागृती (यात मो. क. गांधींचा हात नाही) भारता मधून तयार केलेल्या सैन्यात झालेला उठाव (सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेने मुळे) या सगळ्या कारणांमुळे इंग्रजांना भारतीय उपखंड सोडून जावेच लागणार होते. त्यात मो.क.गांधींच्या अहिंसेचा खूप वाटा नाही. हो पण स्वातंत्र्य घेते वेळी जी फाळणी झाली (त्याचे परिणाम आपण आजतागायत भोगत आहोत) त्यात मात्र या अहिंसेचाच हात आहे. (कृपया श्री प्रतिभा रानडे यांचे फाळणी ते फाळणी हे पुस्तक वाचावे).
   ५) स्वातंत्र्यपूर्व काळात (लो. टिळकांच्या) कॉंग्रेस मध्ये मवाळ गटात पोषाखी लोकांचाच भरणा होता. त्या पोषाखी लोकांनी जी राजकारणाची पध्दत घालून दिली आहे त्यावरच अजुनही सध्याची कॉंग्रस चालते. कालमानानुसार गुंड प्रवृत्तीच्या लोकांची संख्या जास्त झाली आहे येवढाच काय तो फरक. अश्या लोकांमध्ये फिरोजशहा मेहता, मोतीलाल नेहरू यांसारखे श्रीमंत लोक होते. शेवटी शेवटी इंग्रजांचे राज्य यांसारख्यांच्याच जीवावर (पाठींब्यावर) चालले होते. श्री गंगाधर गाडगीळ लिीत लो. टिळकांच्या जीवनावर आधारित “दुर्दम्य” वाचावे म्हणजे सध्याच्या कॉंग्रेसचा पाया आणि मूळ काय आहे हे लक्षात येइल. जवाहरलाल नेहरू यांनी फरसे असे काय काम केले होते की त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडावी (एडविना बॅटन ला कंपनी देण्यापलीकडे) आणि स्वा. सावरकर, सुभाषबाबूं सारख्या देशभक्त सैनिकांना एखाद्या निर्वासीतासारखे जीवन जगावे लागले? गांधी आणि नेहरूंच्या कार्यपध्दतीवरील राग म्हणूनच जीनांनी वेगळ्या पाकीस्तानला मूक संमती दिली.
   ६) माझ्या अगदि पहिल्या प्रतिक्रियेत मी नेहरूंच्या सुरूवातीच्या धोरणांविषयी जे म्हंटले आहे त्याचे पुरावे जर एकूणच भारतीय समाज शास्त्राची, राजकारणाची जाण असलेल्या व चालू घडामोडींच्या विषयी विश्लेशण करण्याची ताकद असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सापडतील. प्राथमिक शिक्षणाची अजुनही लक्तरेच आहेत. पूर्वी शालेय शिकषण तरी बरे होते. आता तर त्याचाही आनंदच आहे. (मातृभाषेतून नसल्याने). मुळात नेहरू स्वत: मातृभाषेतून शिकलेच नाहीत. कसे शिकणार काश्मिरी भाषेत शिक्षणच उपल्ब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व कसे कळणार? त्याच बरोबर नेहरू हे लॉर्ड माउंट बॅटन नी नेमलेले इंग्रज सरकारचे प्रवक्तेच होते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य हे फक्त राज्य उपभोगण्या साठी हवे होते (त्या काळात नेहरूंचा रोजचा खर्च रू. २५००० येवढा असे. त्यांचे रोजचे कपडे सुध्दा लंडनच्या लॉन्ड्रीत धुतलेले असत). आणि भारतीय जनतेला इंग्रजी पध्द्ती, संस्कार यांचे शिक्षण देउन पारतंत्र्यातच ठेवायचे होते. म्हणून तर अजुनही आपल्या कडे पदवीदान समारंभात गाउन घालून तिरक्या टोप्या उडवण्या सारख्या निरर्थक पध्दती आहेत. खूप काही लिहिता येइल. पण थांबायलाच हवे.

   धन्यवाद.

   • प्रिय सौ० अपर्णा लळिंगकर यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    स्वाभिमानाच्या बाजूने आपण मांडलेल्या मुद्द्यांबद्दल अत्यंत आभारी आहोत.

    आपले प्रदीर्घ, अभ्यासपूर्ण पत्र वाचून आपले कौतुक करावेसे वाटते. आपल्या प्रत्येक वाचकाला आपला प्रत्येक छटा/कंगोरा कदाचित पटणारही नाही. पण आपल्या पत्रातून स्पष्ट होणार्‍या आपल्या स्वदेशाभिमानाला, सखोल व्यासंगाला व तर्कशुद्ध मांडणीला मात्र कोणालाही दाद द्यावीच लागेल.

    आम्ही श्री० शरद ह्यांना दिलेल्या उत्तरात (त्यांच्या विरोधात नव्हे) म्हटल्याप्रमाणे आपापसात मतभेद असणारच. पण स्वाभिमान व त्याची विविध रूपे म्हणजे स्वदेशाभिमान, स्वभाषाभिमान, स्वसंस्कृत्यभिमान ह्या मूलभूत भावनांबद्दलच जर कोणाला तिरस्कार असेल तर त्या तत्वांच्या प्रसारासाठी हे व्यासपीठ योग्यच नव्हे. किंबहुना त्यासाठी दुसरे कुठले व्यासपीठ आहे ह्याची आम्हाला कल्पना नाही.

    असो. आता कृपया आपण सर्व इतर विषयांकडे वळू.

    दुर्बळाने दांडगटापुढे औदार्य दाखवावे त्याप्रमाणे नेहरूंनी काढलेल्या त्या ऐतिहासिक (लोचट) विधानाला बाणेदार प्रत्युत्तर कोणी दिले होते? आचार्य कृपलानींनी का?

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

 4. नमस्कार!

  माझं वय 37 वर्षे आहे.

  आपल्या या उत्तरातील भाषा ही ‘सावरकरी’ ढंगाची जहाल प्रवृत्तींना जन्म देणारी, पोसणारी, बळ देणारी आहे. लोकांमध्ये ‘स्वाभिमान’ व ‘आशावाद जागृत’ करण्याचा विचार करीत कृती करणारी मंडळी पुढेमागे सनातनीच होत जातात. त्यांच्या हातून अघोरी कृत्येच होतात.

  ———-
  ———-
  ———
  इत्यादी, इत्यादी…

  • प्रिय श्री० सतीश रावले यांसी,

   सादर, सप्रेम नमस्कार.

   आपल्या ह्या पत्रातील थोडासाच (एक तीसांश?) अंश मासल्यासाठी वर प्रकाशित केलेला आहे. आपले सूर्यासारखे प्रखर विचार आमच्यासारख्या अतिसामान्य काजव्यांना मानवण्यासारखे नाहीत. म्हणून आम्हाला आमच्या अज्ञानाच्या अंधारातच चमचम करू द्यावी.

   – आपण ’वैश्य’ गांधीजींचे कौतुक केले त्यात आम्हाला काहीही वावगे वाटत नाही. पण टिळक, सावरकरांना ’अगाऊ’ सारखी विशेषणे वापरणे व त्यांना ’कृतघ्न’ असे सूचित करणे हे समजू शकत नाही. अशा थोर व्यक्तींबद्दल काढलेले अनुदार उद्गार मात्र आम्हाला मुळीच पटत नाहीत.

   – आमच्याबद्दल आपण असे म्हणालात:
   {{आपल्या या उत्तरातील भाषा ही ‘सावरकरी’ ढंगाची, जहाल प्रवृत्तींना जन्म देणारी, पोसणारी, बळ देणारी आहे. लोकांमध्ये ‘स्वाभिमान’ व ‘आशावाद जागृत’ करण्याचा विचार करीत कृती करणारी मंडळी पुढेमागे सनातनीच होत जातात. त्यांच्या हातून अघोरी कृत्येच होतात.}}

   म्हणजे आमचे भविष्य आपण आताच वर्तविलेत व आमच्यावर फुलीच मारून टाकलीत. असो. त्याबद्दल आम्हाला फार दुःख नाही. पण आपल्या सारख्या थोर विचारवंताचे लेखन वाचून सावरकरांसारख्यांच्या स्मृतीही उखडून टाकण्यात धन्यता मानणारे भारत सरकार आम्हाला आताच पकडून तुरुंगात टाकणार नाही ना अशी भीती मात्र वाटते.

   – शिवाय “स्वाभिमान व आशावाद जागृत करणे” अशा शब्दांचाही आपल्याला अतिशय तिटकारा व तिरस्कार आहे. याचाच अर्थ असा की भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वच स्वाभिमानाचे व आशावादाचे समर्थन करणार्‍या मंडळींना आपण सनातनी व अघोरी ठरवता. म्हणजे शिवाजी महाराज, जिजाबाई, नेताजी सुभाष, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी ह्यांच्यापासून ते जगातील सर्वच स्वदेशाभिमानी किंवा स्वभाषाभिमानी लोकांना आपण मानवताविरोधी ठरवून टाकलेत. खरं म्हणजे कुठला थोर नेता (आताचे बूट-उचलू नव्हेत) स्वाभिमान व आशावादाचा पाठिराखा नव्हता हे ठरवणे आमच्या दृष्टीने तरी कठीणच आहे. गांधीजींचे स्वदेशप्रेमच नव्हे तर स्वभाषाप्रेमही प्रसिद्धच आहे. त्यांच्या एवढे मातृभाषेला महत्त्व देणारे दूरदृष्टीचे समाजकारणी फार कमी असतील. (अशा थोर मंडळींच्या पंक्तीला जर अमृतमंथन परिवारातील लेखक-वाचकांना बसविणार असलात तर ती आमच्या दृष्टीने स्वप्नापेक्षाही अधिक आनंदाश्चर्याची गोष्ट ठरेल. त्यासाठी त्यांच्याबरोबरच आपली अघोरी वगैरे विशेषणेही आम्ही आनंदाने मान्य करू. आभारी आहोत.)

   – आपण करीत असलेले इंग्रजीचे अतिरेकी कौतुक, संस्कृतचा द्वेष व मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल तिटकारा हे विचार आधुनिक काळातील स्वतः इंग्रज भाषातज्ज्ञांनादेखील कितपत पटतील ह्याची शंका आहे. अन्यथा आज जर आपण पारतंत्र्यात असतो तर आमच्या देशभक्तांना अशी शेलकी विशेषणे दिल्याबद्दल आज आपला एखादा ’नेटिव्होचित’ किताब देऊन सत्कार तरी नक्कीच केला असता.

   – अमृतमंथन अनुदिनीच्या परिवाराबद्दलही आपले मत चांगले नाही. आपण म्हणता:
   {{पण पुणं, पुण्याची मानसिकता ह्याच्या बाहेर ते अजून आलचं नाही असं दिसतंय.}}
   {{आपण पूण्याच्या मंडळींनी स्वर्गातील देवांच्याही पुढची अवस्था प्राप्त केली आहे का?}}

   अर्थात त्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही. आमच्यापैकी काहींचे आयुष्य मुख्यतः मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरांत गेले असले तरीही “पुणे म्हणजे मुंबईपेक्षा हीन, महाराष्ट्र म्हणजे बंगाल, तामिळनाडूपेक्षा असंस्कृत, भारत म्हणजे इंग्लंड-अमेरिकेच्या मानाने अडाणी”, अशा न्यूनगंडाची बाधा आम्हाला नाही. (म्हणूनच बहुधा आम्ही स्वाभिमानी व अघोरी असू.)

   आम्ही आपल्या मानाने मूर्ख-अडाणी असूही. “सहस्रेषु च पंडितः” ही पूर्वीच्या काळची परिस्थिती. आज कदाचित लाखात एकही आपल्यासारखा विद्वान नसेल. त्यातून आपण तर संस्कृतकोशकार आपटे व cologne ह्यांनाही त्यांची (ना)लायकी दाखवून देणारे व टिळक-सावरकरांचा अगाऊपणा व कृतघ्नपणा सिद्ध करणारे. अशा आपल्यासारख्या महान व्यक्तीपुढे आम्हा क्षूद्र अमृतमंथन परिवारसदस्यांची लायकी ती काय?

   – आपण म्हटले,
   {{खरी समस्या मानसिकतेत आहे, दृष्टी’कोना’ त आहे.}}
   खरेच आहे. आपल्या व आमच्या विचारांत, तत्त्वांत, मतांत मूलभूतच विरोध आहेत. आपले विचार, ज्ञान, विद्वत्ता हे ह्या आमच्या बुद्धीला न पेलणारे आहेत. आपले वय ३७ वर्षे म्हणजे आम्हा अमृतमंथन गोतावळ्यातील बर्‍याच सदस्यांपेक्षा कमीच असले तरीही आम्ही सर्वच “आपल्या विद्वत्तेपुढे हात टेकले” असे हात जोडून म्हणतो व अत्यंत आदरपूर्वक व नम्रतापूर्वक अशी विनंती करतो की आम्हा मूर्ख व अडाणी माणसांना सुधारण्याच्या प्रयत्नात आपला बहुमोल वेळ वाया घालवू नये. आपल्या हातून जागतिक पातळीवर कितीतरी अधिक महत्त्वपूर्ण व क्रांतिकारी कार्य घडेल याची आम्हाला खात्री वाटते.

   ह्यापुढे ह्या चर्चेवर पडदा टाकू.

   कळावे, लोभ असावा, ही विनंती.

   आपला कृपाभिलाषी,

   – अमृतयात्री गट

 5. आ. श्री सतीश रावले यांस,
  सा. नमस्कार,

  आपल्या सारख्या वयोवृध्द आणि ज्ञानवृध्द व्यक्तींशी ्वाद घालणे हा हेतू नाही. पण आपल्या प्रतिमतात आपण लिहिलेले बरेच मुद्दे नपटण्या सारखे आहेत. १) {{इंग्रजांनीच या देशात सामान्य जनतेसाठी शिक्षणाचा प्रसार केला तेंव्हा कुठे भारतीय समाज सद्न्यानी झाला.}}
  इंग्रजांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्या मागे वेगळीच भूमिका होती. इतर जेत्यांप्रमाणे त्यांनाही भारतीय उपखंडावर राज्य करायचे होते. सगळीच कामे करण्या साठी त्यांना इंग्लंडहून माणसे आणणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेत शिक्षण देण्यास सुरूवात केली. श्री धर्मपाल यांनी लिहिलेल्या “ब्युटीफुल ट्री” या पुस्तकात असा उल्लेख केला आहे की लॉर्ड मेकॉले ने जेव्हा त्याच्या कचेरीतील एका कारकूनाला त्याच कचेरीतील शिपायाच्या पाया पडताना पाहिले तेव्हा त्याला लक्षात आले की जो पर्यंत आपण इथली मूळची शिक्षण पध्द्ती (गुरूकुल) नष्ट करत नाही तो पर्यंत ह्या भागावर पूर्णपणे सत्ता गाजवणे केवळ अशक्य आहे. आणि म्हणून त्याने गुरुकुलांचे अनुदान बंद केले. त्यामुळे लोकांना आपल्या मुलांना शिकवायचे असेल तर मिशनरी शाळेत घालण्यावाचून गत्यंतर उरले नाही. इंग्रजांना रक्ताने भारतीय पण मनाने इंग्रज अशी जनता निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण सूरू केले.
  २) {{ टिळक असो की सावरकर इंग्रजांना अद्दल घडविणार्‍यांना आयुष्यभर (नियतीकडून ) त्रासच झाला. वैश्य इंग्रजांशी ‘अंहिसेचा’ मार्ग स्विकारत सत्याचा पाठपुरावा करणारे वैश्य मोहनदास करमचंद}}लो. टिळक, स्वा. सावरकर यांना जरी त्रास झाला तो त्यांनी मातृभूमी साठी हसत हसत सहन केला. मो. क. गांधीं सारखे गुळमुळीत राजकारण करत बसले नाहीत. नेहरूं सारख्या पूर्ण पोषाखी माणसाला मो. क. गांधी यांनी स्वतंत्र भारताचे नेतृत्व करण्यासाठी कसे काय पुढे आणले हे एक कोडंच आहे. कदाचित त्याची पाळेमुळे लेडी एड्विना बॅटन यांच्या पर्यंत पोहोचलेली असावीत. नाहीतर वल्लभ भाई पटेल यांसारख्या समर्थ आणि नेहरूंपेक्षा सरस व्यक्तीमत्वाच्या नेते मंडळींना त्यांनी असे खड्या सारखे बाजूला ठेवले नसते. नुकतच प्रतिभा रानडे यांचं “फाळणी ते फाळणी” हे पुस्तक वाचण्यात आलं. त्यात त्यांनी स्पष्ट म्हंटलं आहे की जीनांना फाळणी नको होती पण त्यांना कॉंग्रेस मध्ये मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि डावलले जाण्याची भावना यामुळे त्यांना वेगळे व्हावे लागले. शेवटी सुध्दा त्यांनी होकार दिलाच नाही. त्यांचे मौन म्हणजेच होकार असे माउंट बॅटन यांनी गृहित धरले. जीनांना कॉंग्रेस मध्ये अशी वागणूक मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ते लो. टिळकांच्या अगदी जवळचे होते. लो. टिळक जीवंत असते तर भारतीयभूखंडाची अशी शकले झाली नसती आणि त्या सगळ्याचे परिणाम आपण अजुनही भोगत आहोत. कॉंग्रेसची तशीच कच खाऊ धोरणं. त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला. लो. टिळक नेहमी म्हणत असत (सध्या गंगाधर गाडगीळ लिखीत “दुर्दम्य” चे वाचन चालू आहे) की आपल्यातील (जहाल आणि मवाळ) मतभेदांचा इंग्रज सरकारने फायदा घ्यायला नको. म्हणून प्रसंगी अनेक वेळा त्यांनी पडती बाजू घेतली. गोपाळ कृष्ण गोखल्यांसारखी माफी मागून मोकळे झाले नाहीत तर तुरूंगवास सहन केला. नेहरू घराण्या सारखं देशाला स्वत:ची जहागीरी समजुन लोकांच्या घामाचा पैसा उधळला नाही. (मला माहीती आहे की हे विषयांतर झालं आहे पण लो. टिळक आणि स्वा. सावरकरां विषयी चुकीच्या कल्पना खपवून घेणे केवळ अशक्य आहे. म्हणून हे सगळे लिहावे लागले.) स्री रावले यांच्या प्रतिमतात वैश्य या शब्दाचा जाणूनबुजून उल्लेख आला आहे. लो. टिळक हे जरी ब्राह्मण असले तरी ते तेल्या तांबोळ्यांचे नेते होते हे आपल्याला ज्ञात असेलच. अगदी मुसलमान लोक सुध्दा त्यांना आपला नेता मानीत असत. जीनांचेच उदाहरण घ्या की. त्यांनीच एक वेळा लो. टिळकांचा खटला चलवला होता. पण ह्याच जीनांनी स्वार्थाने बरबटलेल्या नेहरूंचे नेतृत्व धुडकावुन लावण्या साठी वेगळा पकिस्तान निर्माण करण्यास मूक संमती दिली. या वर आपले काय मत आहे?

  ३) {{‘एका गोष्टीचे महत्व विशद करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतयं.’, हे दाखवण्याचाच माझा प्रयत्न होता, आहे आणि असणार!!!}}

  मराठीचे महत्व विशद करण्यासाठी कोणी इंग्रजीला दुर्लक्षित करत नाहीये. ह्या ठिकाणी चर्चेचा मुद्दाच वेगळा होता. तुम्हाला तो इंग्रजीचा द्वेश आणि मराठी आणि संस्कृतचा उदो उदो असा दिसतो आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही आहे.

  ४) {{ “अजुन काही ऐकण्याची/ वाचण्याची गरज नाही”, असे मी देखील समजतो.}} आपल्या वयोमाना प्रमाणे संगणकावर बसून टंकलेखन करणे आपल्याला जरा अवघड आहे हे समजु शकतो पण इतरांचे आपल्या प्रतिमतावर काय मत आहे हे सुध्दा ऐकण्याची/वाचण्याची गरज भासू नये हे आजुन एक कोडं आहे. निदान आपण चालू केलेल्या चर्चेला आपणच तोंड द्यायचे नाहीतर कुणी?

  क. लो. अ.

  अपर्णा लळिंगकर

 6. SHRI. SATISH RAWALE yans,

  apan vyakt keleli mate hi niwwal tokayach mhanun tokayach ani bolayach mhanun bolayach ya wicharatun aleli vatatat. apale bhasha ani sanskruti baddal dnayan(?) mahan aselhi ani zalelya chuka dakhwilyat tar anandch ahe pan chuka dakhwinyachi paddhat matra chukichi watate. apalyala jar marathi bhashechi sewa karta yet nasel tar kiman je karat ahet kinwa tasa prayatn karat ahet tyanchya watet pay tari taku naye. thodkyat chonbadepana band kelat tar bare hoil karan yatun(chonbadepanatun) kahich sadhya honar nahi.. dhanyawad.

  – amrutmanthan cha ek niymit wachak.

  • प्रिय श्री० शरद यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. रावले सरांसारख्या ३७ वर्षीय तरूण विद्वानाच्या तोफगोळ्याला तोंड देणे कठीणच होते. आपण व अपर्णाताईंनी मदतीचा हात दिल्याबद्दल आभार.

   आम्ही आपल्या परीने रावलेसरांच्या टीकेस उत्तरे दिली आहेत. अर्थात ती त्यांना पटणार नाहीत. त्यांच्या विद्वत्तेच्या पातळीच्या मानाने ती सामान्यच असतील. पण आपल्यासारखे मित्र समजून घेतील अशी आशा आहे.

   आपण ही अनुदिनीच मुख्यतः “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…” ह्यांच्या हितासाठी, संपन्नतेसाठी, प्रगतीबद्दल विचारमंथनास चालना/उत्तेजन देण्याच्यादृष्टीने स्थापन केली व ती आपल्यासारख्या मराठीप्रेमी परिवारसदस्यांच्या आधारावरच चालली आहे. कुठल्याही परिवारात मतभेद असू शकतातच. पण ते आपापसात, आपली पायरी न सोडता, संयमाने चर्चा करून सोडवावेत व योग्य तोडगा काढावा. अगदीच अशक्य असल्यास आपण एकमताने विमत मान्य करू. पण विरोधासाठी विरोध म्हणून वाद घालणे, अयोग्य विशेषणे/उदाहरणे/भाषा वापरणे, अतिरेकी विचार मांडणे, अनुचित हेतू जोडणे, नीट प्रतिवाद न करता तेच तेच मुद्दे पुन्हापुन्हा मांडणे, कापूस कोंड्याच्या गोष्टीप्रमाणे आपलीच टकळी चालवणे, अशा प्रकारामुळे चर्चेला अयोग्य स्वरूप येते.

   विशेषतः ज्या उद्दिष्टांसाठी एखादे व्यासपीठ चालते त्याबद्दल मूलभूतच हरकत असेल तर अशा व्यक्तींनी त्या व्यासपीठावरील चर्चेत भागच न घेतलेला बरा. त्यात अर्थातच कोण चूक व कोण बरोबर हा प्रश्न नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनाही भारतात निवडणूक लढवताना भारताच्या लोकशाहीवरील ठाम विश्वास प्रकट करावा लागतो. “आम्ही लोकशाहीचे विरोधक आणि साम्यवादावर विश्वास ठेवणारे; म्हणजे आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आल्यावर ही लोकशाही पद्धतच मोडीत काढणार” असे ते म्हणू शकत नाहीत. प्रत्येक संस्थेची, गटाची काही मूलभूत तत्त्वे, उद्दिष्टे असतात. त्यांनाच जर आपला विरोध असेल तर अशा संस्थांच्या, गटाच्या व्यासपीठावर चर्चा करण्यात काय अर्थ? केवळ इतर सर्वांना खोडून काढणे एवढ्यासाठी चर्चेत भाग घेणारा स्वतःवरही अन्याय करून स्वतःचा वेळ व श्रमही वाया घालवतो नाही का?

   प्रा० राईलकर सर, डॉ० दत्ता पवार, प्रा० दीपक पवार मराठी अभिमान गीत (कौशल इनामदार), सलील कुळकर्णी, मराठी एकजूट, मराठी अभ्यास केंद्र आणि इतरही अनेक मराठीप्रेमी वाचकमित्र ह्यांचे लेख, वृत्त व पत्रे आपण प्रकाशित करून त्यावर चर्चा करतो ती मराठी माणसाचा न्यूनगंड दूर करून व स्वाभिमान जागृत करून मराठी माणसाला पुन्हा सुवर्णकाळाच्या दिशेने वाटचाल करण्याची उमेद वाटावी म्हणून. ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाबाबत मूलभूतच विरोध असेल तर त्याबद्दल तडजोड कशी होणार?

   असो. आपल्या पत्राबद्दल पुन्हा मनःपूर्वक आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय रुता चित्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत. 

   आपण म्हणता आहात त्यात चूक काहीच नाही. दुर्दैवाने राईलकर सरांच्या लेखावरून सुरू झालेली चर्चा पूर्णतः वेगळ्याच मार्गाला लागली आणि मग मुद्दे व तर्क बाजूला राहून शब्दांचे व विशेषणांचे युद्ध सुरू झाले. तसे व्हायला नको होते. आपण सर्वजण आपल्या मायबोलीच्या प्रेमासाठीच इथे साधकबाधक चर्चा करीत आहोत. आपल्यातच कटुता निर्माण होऊन फूट पडायला नको.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. हा लेख वाचल्यावर असे वाटते कि, आता आपण स्वतः अंतर्मुख होऊन या गोष्टींचा विचार करायाल हवा. पाश्च्यात्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहोत. सामान्य जनतेत वैज्ञानिक दृष्टी रुजविण्यासाठी वैज्ञानिक शिक्षण हे अधिकाधिक लोकाभिमुख असायला हवे, आणि हे केवळ मातृभाषेतील शिक्षणानेच शक्य आहे. पण त्याला आवश्यक असणारी सजगता व प्रबळ इच्छाशक्ती आपल्या राज्यकर्त्यांकडे आहे का?

  • प्रिय श्री० जयेंद्र जोशी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले मत पटले. शिक्षण हे लोकाभिमुख होण्यासाठी स्थानिक भाषेतच असायला हवे आणि गावोगावी चांगल्या दर्जाचे शिक्षण सहजी उपलब्ध करून द्यायला हवे. उत्तम आरोग्यसेवा आणि उत्तम शिक्षण यावरील खर्च वाढवायला हवा. या विषयात फायद्या तोट्यांचा विचार करता कामा नये.

   पण हा दोष सरकारला देणे आम्हाला तेवढेसे पटत नाही. कारण सरकारी मंडळी ही आपल्यापैकीच. मूळ आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? तुम्हाआम्हा सारखे लोक अल्पसंख्य असलेल्या या देशातील बहुसंख्यांना पाश्चात्यांची गुलामगिरी करण्यातच भूषण वाटते. सुशिक्षित, संपन्न मंडळी तशीच शिकवण इतर अल्पभाग्यशाली लोकांपुढे ठेवतात. मग त्यांना सर्वांना संतुष्ट करायला सरकारही तेच करते. शिवाय राजकारण्यांना आपल्या इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांसाठी ग्राहकवर्ग वाढवायचा असतोच. जर लोकांनी तीव्र विरोध केला तर असे होणार नाही. पण आपण तसे करत नाही. धान्यापासून दारू गाळण्याच्या कारखान्यांना अनुदान देऊ करणार्‍या सरकाराने गेल्या सहा वर्षांत (मराठी) शाळांचे अनुदान दिलेले नाही, याविरुद्ध कुठला राजकीय पक्ष चळवळ करतो? तसे होत नाही कारण त्यांना माहित आहे की सामान्य जनता याविरुद्ध काहीही करण्याची इच्छा दाखवीत नाही.

   शेवटी जबाबदार आपणच. तुम्हीआम्ही आपल्या अजूबाजूच्यांना जागे करून काही केले तरच यात बदल घडेल, अन्यथा नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 8. तुमच्या म्हणण्याशी मी अंशतः सहमत आहे. सरकारला दोष देता येत नाही हे मान्य, पण अश्या योजना राबविण्यासाठी आवश्यक असणारी एक असणारी एक सक्षम यंत्रणा केवळ सरकारकडेच आहे. आपल्यासारखे मुठभर सुशिक्षित आणि सुजाण लोकांनी एकत्र येऊन काही केल्यास त्यातून नक्कीच काहीतरी चांगले निष्पन्न होईल पण त्याचे प्रमाण मात्र मर्यादित असेल. या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घेता ह्याचे निरसन हे मोठ्या पातळीवरच व्हायला हवे तरच त्यातून काही फायदा होईल.

  राहता राहिला प्रश्न राजकारण्यांचा, तर सर्व जनतेने किंवा त्यातील काही जागरूक समुदायाने एकत्र येऊन इतरांना प्रवृत्त केल्यास सरकारवर दबाव येऊन काहीतरी चांगले हाती येऊ शकते. उदा. नुकतेच झालेले भ्रष्टाचारविरोधी जन-आंदोलन.

  • प्रिय श्री० जयेंद्र जोशी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पुन्हा आपले म्हणणे आम्ही मान्य करतो. सरकार ही एक अत्यंत सक्षम यंत्रणा आहे हे खरेच. पण आपणच म्हटल्याप्रमाणे सर्व जनतेने किंवा त्यातील काही जागरूक समुदायाने एकत्र येऊन इतरांना प्रवृत्त केल्यास सरकारवर दबाव येऊन काहीतरी चांगले हाती येऊ शकते. उदा. नुकतेच झालेले भ्रष्टाचारविरोधी जन-आंदोलन.

   म्हणजे सरकारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे कार्य आपणच करायला पाहिजे आणि ते योग्य प्रमाणात होत नाही आहे हे सत्य आहे. उलट अनेक नेते व तथाकथित स्वार्थी सुशिक्षित उच्चभ्रू मंडळी जागतिकीकरणाची भीती दाखवून मातृभाषा नाही तर इंग्रजीचीच कास धरली तरच आपण तरू असा अपप्रचार करीत आहेत. पण स्वातंत्र्यानंतरची गेली साठ वर्षे पूर्वीच्या अधिपतींच्या, मालकांच्या भाषेचाच पाठपुरावा करून जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, जपान या मातृभाषेत शिकणार्‍या देशांच्याहून आपण पुढे गेलो की अधिकच मागे पडलो? उलट साठाहून कमी वर्षांत इस्रायल, चीन, कोरिया व इतर अनेक देश आपल्या कितीतरी पुढे गेले हे आपल्या लक्षातही येत नाही.

   या विषयावरील खालील लेख आपण वाचला नसल्यास अवश्य वाचावा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s