संगणकावर मराठी (ले० विनय मावळणकर)

आपण ठरवू या की, मराठी माणूस म्हणून, माझ्या भाषेच्या भविष्यासाठी व संस्कृतीच्या अभिमानासाठी, संगणकावर हुकूमत मिळवण्यासाठी आणि एक सहज स्वाभाविकता म्हणून, ‘माझ्या संगणकावर मी मराठी भाषाच वापरीन. माझे संगणकीय व्यवहार (अत्यावश्यक अपवाद वगळता) मी मराठीतूनच करीन!’

Read More »

मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर)

मुख्य म्हणजे मराठी भाषेचा प्रसार ह्या संगणकीय युगातही वेगाने होऊ शकेल. तसेच इंग्रजीची भीती असल्याने संगणकाला ‘परग्रहावरचा पदार्थ’ समजणारे विद्यार्थी संगणकावर हुकूमत गाजवतील. मराठीतील प्रचंड माहितीचे, ज्ञानाचे चलनवलन-वहन सहजतेने होईल. शासकीय व खाजगी क्षेत्रात संगणकीय मराठी भाषेशी संबंधित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषेची सुवर्णझळाळी उठून दिसेल.

Read More »

संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती

आपले मराठीप्रेमी मित्र श्री० सुशांत देवळेकर व श्री० आशिष आल्मेडा ह्यांनी युनिकोडानुकूल मराठी टंकातून संगणकावर लिहिण्याविषयी दिलेली पुढील अत्यंत उपयुक्त माहिती सर्व नवशिक्यांना उपयोगी ठरावी.

Read More »

संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर)

फेसबुक, ऑरकुट, महाजालावरील विविध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात.  वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keyboard) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलब्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत.  मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. ही सर्व माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.

Read More »

संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल

१. प्रास्ताविक:
आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला थोडी भीतीच वाटते. पण काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण आपल्यालाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणींशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते.
संगणकाने आज सामाजिक आणि व्यक्तिगत अशा सर्वच क्षेत्रात शिरकाव केला आहे. त्यामुळे वेळोवेळी अद्यतन माहिती मिळवणे, मित्र-बांधवांशी संपर्कात राहणे इत्यादी अनेक कारणांसाठी आपल्याला संगणकाच्या वापराचे म्हणजेच संगणकावरून शोधणे, वाचणे आणि लिहिणे इत्यादी कृतींचे प्राथमिक तरी ज्ञान हवेच.  तशी जबरदस्ती नसली तरीही ते स्वतःहून शिकणे हे नक्कीच सोईस्कर. एकदा का संगणकावर काम सुरू केले की मग त्यावर मातृभाषेतील व्यवहारही शिकून ग्यावेत. आपल्या देशातील आणि परदेशातील मित्र आणि नातेवाईकांशी पत्रव्यवहार करताना, शासकीय कार्यालये, सहनिवास (सोसायटी), महापालिका, वीजमंडळ, इत्यादींना पत्रे लिहिताना मायबोलीचा वापर करणे कधीही श्रेयस्कर ठरते. मातृभाषेत लिहिण्याची मजा काही औरच असते. कार्यालयीन कामासाठी परगावी/परदेशी भटकत असताना दिवसरात्र कितीही बाहेरील खाणं हाणलं तरी घरी आल्यावर साध जेवणंही स्वर्गीय वाटतं. तीच गोष्ट मातृभाषेची. शिवाय वैयक्तिक, तरल, सूक्ष्म भावना मातृभाषेत जितक्या सहजपणे आणि चपखलपणे व्यक्त करू शकतो तेवढ्या इतर कुठल्याही भाषेत करणे शक्य होत नाही. त्यामुळे एकदा मनाचा हिय्या करूया आणि संगणकावर मराठीत लिहिणे सुरू करूया. त्यात कठीण काहीच नाही.
आज युनिकोड हे जागतिक पातळीवरील प्रमाणित टंक उपलब्ध असल्याने युनिकोडचा वापर करून संगणकावर केलेले टंकलेखन (टायपिंग) हे विंडोज, लिनक्स सारख्या संगणक कार्यकारी प्रणाली (computer oerating systems) तसेच मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोरर, गूगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स इत्यादी ब्राऊझर्स (?), हॉटमेल, गूगल, याहू इत्यादी विरोप सेवा प्रदाते (email service providers) आणि गूगल, याहू, यासारखी शोधयंत्रे (search engines) ह्या सर्वांच्या सॉफ्टवेयरची यंत्रणा ही युनिकोड पद्धतीच्या टंकांना अनुकूलच असते. आणु दिवसेंदिवस युनिकोडचा प्रसार अधिकाधिक वाढतच जाणार आहे. भारतातही केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांमधील सर्व शासकीय संकेतस्थळे आणि इतर सॉफ्टवेयर प्रणाली ह्या युनिकोडानुकूलच असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही संगणकावर मराठीमध्ये लिहिण्यासाठी युनिकोडानुकूल अशा पद्धतींचाच विचार करूया.
२. मराठी टंकलेखनाच्या पद्धती:
मराठीत लिहिण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धतींपैकी आपण दोन प्रकारच्या पद्धतींची खाली चर्चा केली आहे. त्या दोन पद्धती खालीलप्रमाणे:
क) इनस्क्रिप्ट कळपाट (keyboard) वापरून: ज्याप्रकारे मराठीमध्ये आपण हाती लेखन करतो त्याचप्रमाणे अक्षरे आणि त्यांच्या काना-मात्रा-वेलांट्या-रफार इत्यादी लिहित जाणे. ह्या पद्धतीत इनस्क्रिप्ट कळपाटाची माहिती करून त्यावर थोडा सराव करावा लागतो. काही तासांच्या वापरानंतर कळपाटावरील कळांच्या जागा लक्षात राहतात आणि सरावाने वेग वाढतो.
ख) ’बराहा’ सारख्या ध्वन्याधारित (ध्वनीवर आधारित – phonetic) टंकलेखन पद्धतीचा अवलंब करून: ही पद्धत विशेषतः मायक्रोसॉफ्ट विंडोज ह्या प्रणालीसाठी उपयुक्त आहे. ह्यात मराठी शब्दांचे कानाला ऐकू येते त्याप्रमाणे प्रत्येक अक्षराचे सरळसोपे इंग्रजी स्पेलिंग लिहित जाणे. ह्या पद्धतीत नेहमीच्या इंग्रजी कळपाटाचाच उपयोग होत असल्याकारणाने नवीन कळपाटपद्धतीच्या सरावाची आवश्यकता नसते. थोडी जुजबी माहिती करून घेऊन लगेच लिहिणे सुरू करता येते. पण आपल्याला लिहिण्याचे बरेच काम करावे लागणार असेल तर इनस्क्रिप्ट पद्धत शिकून घ्यावी.
ह्या दोन पद्धतींसाठी निरनिराळ्या पद्धतीची सॉफ्टवेयरे उपलब्ध आहेत. इन्स्क्रिप्ट पद्धत ही कधीही आदर्श आणि योग्य. त्या प्रकारात मराठीतील टंकन हे इंग्रजी कळपाटावर अवलंबून नसते. म्हणून शक्यतो सुरुवातीसच ही पद्धत शिकून घेणे कधीही उत्तम. मराठी टंकलेखनाचा तोच राजमार्ग आहे. पण ज्यांना मराठीत फार लेखन करण्याची आवश्यकता असणार नाही असे वाटते त्यांनी केवळ एक तात्पुरती आडवाट (शॉर्टकट) म्हणून बराहा किंवा तत्सम दुसर्या ध्वन्याधारित  सॉफ्टवेअरचा वापर करून लिहिणे सुरू करावे.
कुठलीही पद्धत वापरली तरी चालेल परंतु लवकरात लवकर मातृभाषेत लिहिणे सुरू करणे हे महत्वाचे.
३. इन्स्क्रिप्ट कळपाट पद्धत:
वर लिहिल्याप्रमाणे ह्या पद्धतीत कागदावर ज्याप्रमाणे मराठीमधून आपण अक्षरामागून अक्षरे लिहित जातो त्याच प्रमाणे कळफलकावरील कळा दाबून लिहित जायचे.  मराठी वर्णमालेतील सर्व मूळाक्षरे (अ ते अः पर्यंतचे स्वर आणि क ते ज्ञ पर्यंतची व्यंजने) तसेच त्यांना लावायचे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, अर्धचंद्र इत्यादी सर्वांसाठी ठराविक कळा निश्चित केल्या आहेत. त्या कळांचा उपयोग करून मराठी लिखाणासारखेच टंकलेखन करायचे. उदा० भारत हा शब्द इन्स्क्रिप्ट पद्धतीने भ + !आ!कार + र + त अशा क्रमाने लिहावा लागेल.
अधिक माहितीसाठी खालील दुव्यावरील पीडीएफ धारिणी पहा.
या शिवाय आवश्यकता भासलीच तर, या विषयी सरावासाठी एक शिकवणी खालील दुव्यावरही मिळू शकेल.
ह्या संकेतस्थळावर नोंदणी करून इन्स्क्रिप्टच्या कळपाटाची शिकवणीची धारिणी उतरवून घेऊन वापरावी.
४. बराहासारखी ध्वन्याधारित टंकलेखनपद्धत (केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी) पद्धत:
आधी लिहिल्याप्रमाणे जो शब्द लिहायचा त्याचे सरळसोट इंग्रजी स्पेलिंग जसे होईल त्याप्रमाणे नेहमीचा इंग्रजी कळपाट वापरून शब्द लिहित जायचे.  उदा० भारत हा शब्द bh + aa + ra + ta असा लिहावा लागेल. aa च्या ऐवजी A हे इंग्रजी अक्षर वापरता येते. म्हणजे भारत हा शब्द bhArata असाही लिहिता येतो.
अधिक माहिती साठी खालील दुव्यावरील पीडीएफ धारिणी पहा.

१. प्रास्ताविक: 

आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला थोडी भीतीच वाटते. पण काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण स्वतःलाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणी आणि इतर संबंधितांशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच अशा आधुनिक मेघदूताशी आपण लवकरात लवकर संधान बांधायला हवे.

संगणकावर मराठीत बरेच लेखन करू इच्छिणार्‍यांसाठी इनस्क्रिप्ट पद्धत आणि थोडके लेखन करण्याच्या उद्देशाने झटपट मराठीत लेखन शिकू इच्छिणार्‍यांसाठी बराहा पद्धत, अशा दोन्हीही पद्धतींबद्दल माहिती इथे दिली आहे. प्रथम बराहा पद्धत शिकून घेऊन कालांतराने मराठी लेखन वाढल्यावर आपण इनस्क्रिप्ट पद्धतीचा विचार करू शकता.

Read More »