पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

१८६८ मध्ये जपाननं विज्ञानात झेप घ्यायचं ठरवलं. एकदा त्यांनी हे ठरवल्यावर त्यांना कुणीच रोखू शकलं नाही. जपाननं आपली मुलं युरोप आणि अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली. तिथलं शिक्षण संपल्यावर त्यांना त्यांनी परत बोलावलं आणि ‘जे काय शिकला असाल ते सारं सुदैवाने तथाकथित ‘बोजड’ शब्दांचीसुद्धा आपल्यासारखी तिथं कुणी टिंगलटवाळी केली नाही. कुठलेही शब्द तसे मूलत: निर्थकच असतात; वापरण्यानंच त्यांना अर्थ चिकटतो. त्यांच्या सुदैवानं ‘जपानी भाषा विज्ञानासाठी सक्षम नाही,’ असं म्हणणारा कुणी पंडित जपानमध्ये नव्हता. आणि असता, तरी त्यांनी त्याला जुमानलं नसतं, किंवा कदाचित तोच असले उद्गार काढायला धजावला नसावा.

प्रा० राईलकरांचा हा पूर्ण लेख पुढील दुव्यावर उपलब्ध आहे, तो पहा.

अमृतमंथन-पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद_ले० प्रा० राईलकर_071109

लोकसत्तेत प्रकाशित झालेला मूळ लेख खालील दुव्यावर पहायला मिळेल.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=21354:2009-11-06-13-34-33&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

.

Tags: ,,

.

20 thoughts on “पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

 1. अप्रतिम लेख आहे. डॊळ्यात झणझणीत अंजन घालणारा. जपानचं अनुकरण करणं हेच खरं उत्तर आहे या प्रश्नाला. इंग्लिशचा उगिच बडेजाव नष्ट केल्याशिवाय , लोकं मराठी शाळांत शिक्षण घेणार नाहीत.
  तसेच उच्च शिक्षण मराठीमधे उपलब्ध करुन दिले तर अवश्य फायदा होईल त्याचा..

  • प्रिय महेंद्र,

   आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. बहुजनसमाजाला त्यांच्या गावा-घरापर्यंत जाऊन त्यांना त्यांच्या स्थानिक (म्हणजे महाराष्ट्रात मराठी) भाषेत ज्ञान सहजगत्या उपलब्ध करून दिले तरच त्याचा प्रसार लवकर होईल. नाहीतर शहरातील व महागडे शिक्षण घेण्याची ऐपत असणार्‍या व इंग्रजीशिक्षित मुठभर मंडळींपर्यंतच उच्च स्तरीय ज्ञान सीमित राहील. ह्यासाठीच महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांनी व इतर अनेक तज्ज्ञांच्या समितीने मातृभाषेतील शिक्षणाचे भक्कमपणे समर्थन केले आहे. पण या सर्व थोर मंडळींची केवळ निवडणुकीच्या वेळी आठवण काढणार्‍या कॉंग्रेसने (व इतर स्वार्थी राजकारण्यांनीही) त्यांच्या म्हणण्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले व अगदी त्याविरुद्ध आचरण केले. महाराष्ट्रातही पुरके, विखे असले राजकीयदृष्ट्या गौण, तसेच प्रामाणिक इच्छाशक्ती, अभ्यासूवृत्ती, जिद्द, कर्तृत्व व कुवत ह्यांचा अभाव असणारे लिंबूटिंबू मंत्रीच शिक्षण खात्याला नेमले गेले. ते स्वतः शिक्षण सम्राट (शिक्षण क्षेत्रातील दादा लोक) असल्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या कल्याणाचे विचारी व दूरदृष्टीचे धोरण राबवले जाईल अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे.

   इंग्रजीच्या बडेजावाचा प्रश्न सर्वच राज्यांत आहे. पण महाराष्ट्राएवढा स्वतःच्या भाषेबद्दल न्यूनगंड असणारे लोक मात्र इतरत्र शोधून सापडणार नाहीत.

   अभिप्रायाबद्दल आभार. असे विचारमंथन चालू ठेऊ. त्यातून आपल्या इतर मित्रांनाही माहिती मिळेल.

 2. atishay sunder lekh aahe ha. pan dole band karun baslelyanchya dolyat anjan ghalanaar kon aani kas?
  aadhi andhanukaran aani aata aparihaaryata hya chakrat saapadalaay samaj. changlya darjachya marathi shala raajkiy sanganmatane janu nestnaabut kelya gelya aahet. tyat yahi kshetrat reservations chya dharti war shikshakancha bharana chalu aslyane uralya surlya shaletun aadhi shikshkanchi gunwatta tapasun paahnyachi wel aali aahe. mala mjhya mulila marathi shalet ghalayachi khup iccha aahe pan mala optionsch disat nahit. jay kahi urlya surlya shala aahet tya itakya lamb aahet ki tithparyant mulila paagwataayach he tar tya chimukalila shiksha kelyasaarakh hoil!

  • प्रिय सौ० सोनाली वायकूळ,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र वाचून खूप बरं वाटलं. आपल्याला हा लेख आवडला एवढेच नव्हे तर तो चिंतनीय वाटला यात तो प्रकाशित करण्याचा मूळ हेतु बर्‍याच अंशी सफल झाला असे म्हणावे लागेल.

   आपले पत्रसुद्धा अतिशय मनापासून लिहिलेले, प्रामाणिक आणि एक वैयक्तिक समस्या मांडण्याच्या उद्देशाने लिहिलेले वाटले. आपण मराठीसुद्धा बरेच चांगले लिहिता. (देवनागरीत लिहिले असते तर अधिक आनंद मिळाला असता.) मी (अमृतयात्री गटापैकी एक) आपल्याला विरोप (ई-मेल) पाठवीन. आपण या प्रश्नावर मोकळेपणाने चर्चा करू शकतो. आवश्यक असल्यास स्वतः राईलकर सरांशीसुद्धा चर्चा करू. मी तरूण असताना जेव्हा माझ्यावर असाच प्रसंग आला (वीस वर्षांपूर्वी) तेव्हा मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. आपण आपल्या सर्व शंकाबद्दल सविस्तर चर्चा करा आणि मग स्वतःचा निर्णय स्वतः घ्या.

   आपली अनुदिनीसुद्धा पाहिली. तशीच मोकळेपणाने लिहिलेली, थोडीशी स्वगत, स्वतःशीच पुटपुटणारी, थोडीशी गुजगोष्टींची अशी वाटली. वाचून बरे वाटले.

   अमृतमंथनावरील इतर लेख वाचले का? आपले अभिप्राय अवश्य कळवा.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   अमृतयात्री

 3. नमस्कार
  मला खरोखर मनापासून या विषयावर चर्चा करायला आवडेल. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेली आहे. पण आज माझ्या मुलीला शाळेत घालताना मात्र माझ्यासमोर इंग्रजी शिवाय पर्याय दिसत नाही. अशावेळी समांतर उपक्रम घरापासुनाच सुरु करण्याचा विचार मनात प्रखर पणे येवू लागलाय. यावर सुद्धा तुमचे आणि राईलकर सरांचे मार्गदर्शन घ्यायला आवडेल.
  अनुदिनी म्हणाल, तर ती म्हणजे मनातल्या विचारांचा निचरा करण्याची एक जागा आहे. या प्रश्नावर काहीस सुचलेल माझ्या दुसर्या ब्लॉग मधून काही महिन्यांपूर्वी मांडल होत. ते इथे देत आहे.
  http://mi-sonal.blogspot.com/2009/02/blog-post_17.html

  धन्यवाद्
  सोनल

  • प्रिय सौ० सोनल वायकूळ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. इतर नेहमीच्या कामांच्या व्यापातून ह्या अनुदिनीची हौस पूर्ण करायची म्हणजे तसे थोडे कठीणच जाते. पण लष्करच्या भाकर्‍या भाजायचे व्यसन लागले की मग अशी ओढाताण सहन करायला पाहिजेच. आपणही घरच्या पोळ्या भाजून मग वर ह्या बाहेरच्या भाकर्‍या भाजण्याचे काम करीत आहात; तेव्हा आपल्याला कल्पना असेलच.

   मी आपल्या विरोपपत्त्यावर काही माहिती पाठवीन. त्यावर आपण चर्चा करू. मला शक्य तेवढी मदत करायला नक्कीच आवडेल. राईलकर सरांचाही सल्ला घेऊ.

   आपण दिलेल्या दुव्यावरील अनुदिनीमधील लेख वाचला. आपण नक्कीच चांगले लिहू शकता. थेट विरोपाच्या चर्चेमध्ये माझे अभिप्राय/सूचना पाठवीन. उत्स्फूर्त लेखन म्हणजे मनातील भावनांचा निचराच तर असतो. जे आपल्याला उत्कटपणे मनात वाटत असतं ते इतरांसमोर मांडणे म्हणजेच तर खरे स्वयंभू, मनातून थेट कागदावर उमटलेले विचार. त्यात कृत्रिमपणा नसतो. ठरवून लिहिलेले व्यावसायिक लेखन तसे नैसर्गिक होऊ शकणार नाही. पूर्वीच्या जुन्या भावगीतांचे काव्य आणि संगीत आणि आज धंदा म्हणून पाडलेल्या गाण्यांचे शब्द आणि संगीत यात तोच तर फरक असतो.

   आभार.

   क०लो०अ०

   अमृतयात्री

 4. नमस्कार
  पुन्हा एकदा तुम्ही म्हणालात तशी देवनागरी मधे कमेन्ट लिहिते आहे.
  माझी मागची कमेन्ट बहुतेक तुम्ही वाचली असेल व नंतर प्रर्दशित करण्याचा निर्णय रद्द केला असेल असे वाटते.

  म्हणुन पुन्हा एकदा माझे म्हणने मांडायचा प्रयत्न करत आहे.

  माला मनापासून या विषयावर चर्चा करायला आवडेल. तुमच्या सारख्या आणि राईलकर सरांसारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यायला आवडेल. या ब्लॉग वरचे इतर लेख ही मी वाचले. इंग्रजी भाषेच्या गमावलेल्या अस्मिते बद्दलच्या लेखाचे इथे विशेष कौतुक करत आहे. कारण त्यातून बरेच घेण्यासारखे आहे.
  मराठी भाषेच्या विकासासाठी समांतर उपक्रम घरापासुनच सुरु करण्याचा विचार अलीकडे माझ्या मनात मुळ धरु लागला आहे. या बद्दल देखिल विस्त्रूत चर्चा करायला मला आवडेल.
  किती उपयोग होइल ते माहित नाही पण या संदर्भात एक पत्र मी म.न.से. च्या संकेत स्थळावरुन त्यांना पाठवले आहे.

  कळावे, लोभ असावा.
  आपली विश्वासु
  सौ. सोनल वायकुळ

  • प्रिय सौ० सोनल वायकुळ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहे.

   {माझी मागची कमेन्ट बहुतेक तुम्ही वाचली असेल व नंतर प्रदर्शित करण्याचा निर्णय रद्द केला असेल असे वाटते.}
   कृपया गैरसमज करून घेऊ नये. आपल्या आधीच्या भाष्याला (कॉमेण्टला) उत्तर देताना लिहिल्याप्रमाणे मला कदाचित पटापट उत्तरे देता येणार नाहीत पण मी आपल्या प्रत्येक पत्राला उत्तर देईन हे नक्की.

   {माला मनापासून या विषयावर चर्चा करायला आवडेल. तुमच्या सारख्या आणि राईलकर सरांसारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यायला आवडेल.}
   कुठल्याही मराठी व्यक्तीला कुठल्याही प्रकारची आणि विशेषत: मराठी संबंधित कामासाठी मदत करायला आम्हाला अत्यंत आनंद वाटेल.

   {इंग्रजी भाषेच्या गमावलेल्या अस्मिते बद्दलच्या लेखाचे इथे विशेष कौतुक करत आहे. कारण त्यातून बरेच घेण्यासारखे आहे.}
   आपण म्हणता ते अगदी योग्यच आहे. मलाही तसेच वाटले म्हणून विविध स्रोतामधून माहिती मिळवून तो लेख तयार केला. त्याबद्दल वाचकांकडून आलेल्या निवडक प्रतिक्रियासुद्धा प्रसिद्ध केल्या आहेत. वाचून पहा. चित्र आशादायी वाटते. अशातून आपल्या मायबोलीच्या दृष्टिने काहीतरी भले व्हावे एवढीच एक इच्छा.

   {मराठी भाषेच्या विकासासाठी समांतर उपक्रम घरापासुनच सुरु करण्याचा विचार अलीकडे माझ्या मनात मुळ धरु लागला आहे. या बद्दल देखिल विस्तृत चर्चा करायला मला आवडेल.}
   अति उत्तम. आमची काहीही मदत लागल्यास सांगा. खरं म्हणजे त्याआधी प्रकल्पाचे स्वरूप व प्राथमिक उद्देश आणि स्वरूप सांगावे. पुढे आपण अधिकाधिक चर्चा करू. लहान प्रमाणात सुरुवात करून आत्मविश्वास वाढेल तसे त्याचे स्वरूप विस्तारत जावे. (मी आपल्या विरोपपत्त्यावर (ई-मेल पत्यावर) पत्र पाठवीन. म्हणजे थेट चर्चा करता येईल. या अनुदिनीवर लेखाशी प्रत्यक्ष संबंध असलेली चर्चाच करू.)

   अमृतमंथ अनुदिनीवर वेळोवेळी लेख प्रकाशित झाल्याबरोबर तो आपल्याला समजावा यासाठी आपण RSS Feedचा उपयोग करून घेऊ शकता. लेख आवडला (किंवा खटकला तरी) आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी अनुदिनीवरच संबंधित लेखाखाली आपण आपले प्रतिमत (Feedback) देऊ शकता. त्यामुळे आपल्या संवादाचा लाभ आपल्या इतर मित्रांनाही होऊ शकतो.

   आवडलेले लेख आपल्या गोतावळ्यातील इतर मराठीप्रेमी मित्रांना अवश्य अग्रेषित करा. मराठी माणसांत स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांच्या बद्दलच्या स्वाभिमानाचा वणवा जास्तीतजास्त पसरवायला हवा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री

 5. जपानने जे धोरण अवलंबला ते चांगलं आहे. पण ते जपान हा देश भोगोलिक दृष्ट्या लहान आहे. भारत देश हा जपानच्या कितीतरी पटीने मोठा आहे. त्याच बरोबर भारता मध्ये फक्त एकाच भाषा आहे. भारतामध्ये कमीत कमी १४ भाषा आहेत. बोली भाषा वगळून. भारताची लोकसंख्या सुद्धा जपानच्या तुलनेत प्रचंड आहे. भारतातल्या भारतात आपल्या देशवासियांना जर कामधंद्या साठी आणि शिक्षणा साठी जायचा असेल तर त्यांना हिंदी किंवा इंग्रजी भाषा पण यावयास हवी. सध्याच्या युगात मराठी माणसांनी फक्त मराठी शिकून महाराष्ट्रातच काम करावे बाहेर जाऊ नये असं म्हणाना पण चुकीचं आहे. सध्या वैश्विकते मुळे, तसेच आपल्या देशातील आरक्षणा सारख्या राजकारणामुळे त्याचप्रमाणे लोकसंख्येतील वाढीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर लोकांना शिक्षण आणि नोकरी साठी जावे लागणे अपरिहार्य आहे. जपानने त्या काळात जे केले ते त्यांना शक्य होते. भारतामध्ये शक्य होणार नाही. त्यामुळेच मराठी भाषा ही वैश्विक होणार नाही हे सत्य सुद्धा मान्य करावे लागेल. पण इंग्रजी भाषा शिकली म्हणजे मातृभाषेचा विसर पडायला नको. मातृभाषा हि तितकीच महत्वाची आहे. महाराष्ट्रा मध्ये मराठी बोलले आणि वापरले गेलेच पाहिजे यात दुमत नाही. मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी म्हणजेच मातृभाषेतूनच व्हावयास हवे.

  सध्याचं चित्र जर पाहिलं तर मराठीच काय पण कोणतीच भाषा धड पाने शिकवली जात नाही. लोक इंग्रजी माध्यमांकडे वळण्यामागे मुख्य कारण म्हणजे मराठी सलाम मधील शिक्षणाचा दर्जा. सगळ्या सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये जातीवर आधारित आरक्षणा मुळे गुणवत्ता नसलेल्या आणि गुणवत्ता प्रयत्नपूर्वक सुधारण्याची इच्छा नसलेल्या शिक्षकांचाच जास्त भरणा आहे. मग सरकार त्यांच्या कडून इतर वेठबिगारीची कामे करून घेते…..निवडणुकीच्या काळात, ओळखपत्र तयार करणे, लोकसंख्या गणनेचे काम……या मधुन शिक्षकांना तर प्रेरणा मिळत नाहीच पण शाळेतील मुलांचे पण नुकसान होते. सुजाण पालकांनी कोणत्याही माध्यमात मुळे घातली तरी आपल्या मुलांना कमीत कमी तीन भाषा तरी व्यवस्थित येतील आणि भाषा शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण मिळवणे हे नसून भाषा हे विज्ञान-गणित तसेच इतिहास-भूगोल हे मूलभूत विषय शिकण्याचे आणि सार्वत्रिक संभाषणाचे प्रमुख माध्यम आहे हे समजावले पाहिजे. आणि त्या प्रमाणे त्यांना तयार केले पाहिजे.

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या शंकांना प्रस्तुत लेखाचे लेखक प्रा० मनोहर राईलकर यांनी दिलेले उत्तर खाली उद्धृत करीत आहोत. कृपया पहावे.

   —————-
   स.न.वि.वि.

   मातृभाषेतून शिकवलं पाहिजे असं म्हणणारे लोक इंग्रजी  किंवा हिंदी शिकू नका असं म्हणत नाहीत. पण (मातृभाषा नसलेल्या) इंग्रजीतून शिकणं मुलांच्या दृष्टीनं त्रासदायक आहे, असं म्हणतात. आणि फक्त तेच म्हणतात, असं नाही. तर जगातल्या शिक्षणतज्ज्ञांचंही मत तसंच आहे.

   जपान लहान असला तरी लोकसंख्येची घनता जवळ जवळ आपल्याइतकीच असून त्यांच्या भूमीपैकी ८० टक्के भूमी वसाहतीस योग्य नाही. केवळ डोंगराळ भागच ७३ टक्के असून शेतीलायक जमीनही ११ टक्केच आहे. जपानची लोकसंख्या आणि मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या जवळ जवळ सारखीच आहे. २००८ चा अंदाज जपान १२.७७ कोटी. आणि मराठी बोलणारे तेवढेच. जर जपान सर्व भाषांतली सर्व विषयावरची पुस्तकं केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत जपानीत आणू शकतो, तर मराठीला का शक्य नाही? शिवाय परदेशात किती टक्के लोकांना जावं लागतं, हा प्रश्न आहेच. जेव्हा जावं लागतं, तेव्हा आपण त्या त्या देशाची भाषा शिकणार नाही का?

   मी केवळ सहा महिन्यांत फ्रेंच भाषा शिकलो. आणि मला गणिताची पुस्तकं वाचता येऊ लागली. सर्वच विषय फ्रेंचमधून वाचण्याची मला काय गरज?

   खरं तर मी ह्या विषयावर एक पुस्तकच लिहिलं आहे. ते प्रसिद्ध झालं की तुम्ही वाचा. तुमच्या ख-याखोट्या शंकांची उत्तरं तुम्हाला मिळतील.

   खरं तर इंग्रजीवाल्यांनी आपल्या डोळ्यांसमोर जी काल्पनिक भीती उत्पन्न केली आही, तिनं आपण घाबरून गेलो आहोत.

   इस्राएवची लोकसंख्या तर केवळ ७४.११ लक्षच आहे. पण तिथलेही सर्व व्यवहार आता हिब्रू भाषेतच होतात. ती भाषा एकेकाली मृत समजली जात होती. त्यांना स्वातंत्र्य आपल्यानंतर केवळ नऊ महिन्यातच मिळालं.

   प्रश्न स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा आहे. तो आपण गमावून बसलो आहोत.

   मनोहर

 6. धन्यवाद प्राध्यापक राईलकर!!
  तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. माझा मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास विरोध नाहीच आहे. माझे स्वतःचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले आहे. आणि मराठीतून पूर्णपणे व्यवहार हे सुद्धा बरोबरच आहे. मी स्वतः गणिताशी संबंधीत आहे. आपली पुस्तकेही वाचलेली आहेत. आणि गणित या सारखा विषय पक्का होण्यासाठी मातृभाषेतून मूलभूत संकल्पना समजणे अतिशय महत्वाचे आहे. हे सुद्धा खरे आहे. पण मी अश्या व्यक्ती पण पाहिल्या आहेत कि केवळ इंग्रजी भाषेत कमी पडत असल्याने पुढे जाऊ शकत नाहीत.

  दुर्दैवाने महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांची स्थिती सर्वच विषय (अगदी मराठी सकट) शिकवण्याच्या बाबतीत अत्यंत कमी दर्जाची झाली आहे. याला कारण गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती न होता जातीवर आधारित होते. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालक पाठ फिरवत आहेत. अगदी महाराष्ट्रात सुद्धा शिकलेली मुला नोकर्या शोधायला गेली तर इंग्रजी यावे लागते. आपल्या शाळां मध्ये कोणतीच भाषा आणि कोणताच विषय अभ्यास साठी शिकवला जात नाही. फक्त गुण मिळवण्यासाठी शिकवला जातो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे हा.

  जपान तसेच ईसरैल हे देश छोटे त्याच प्रमाणे बहुभाषिक नाहीत. एकट्या महाराष्ट्र मध्येच चार पेक्षा जास्त प्रकारे मराठी भाषा बोलली जाते. कोणत्या मराठीत सगळी पुस्तके (वैद्यकीय, उच्चशिक्षण) काढणार? जर पुण्याच्या मराठीत काढली तर जळगाव-धुळे, विदर्भ, मराठवाडा या भागातील लोकांना ते जड जाईल असे वाटत नाही? सध्या आपल्याकडे पदवी पर्यंतच्या कला आणि वाणिज्य शाखेची मराठीतून पुस्तके आहेत, तसेच मराठीतून अभ्यासक्रमही आहेत. जर वैद्यकीय आणि ईतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमांना शिकवणारे प्राध्यापक मराठी भाषक नसतील (आपण केवळ मराठी भाषक असं निकष प्राध्यापक निवडीसाठी लावला तर काय घोळ होतील हे शालेय उदाहरणावरून स्पष्ट आहेच) तर सगळी पुस्तके मराठीत कशी छापणार? त्याच प्रमाणे मराठी भाषेतील कला आणि वाणिज्य शाखेतील पुस्तकांचा दर्जा देखील चांगला नसतो हे विद्यार्थ्याना समजते. जपान मध्ये हे धोरण खूप पूर्वीपासून राबवले आहे. त्यामुळे त्यांचे उच्चशिक्षण सुद्धा मातृभाषेतून चांगल्या दर्जाचे झाले आहे.

  माझे प्रश्न हे केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही आहेत. आपण ज्या देशांची उदाहरणे दिलेली आहेत ते छोटे देश आहेत. महाराष्ट्र हा भारत देशाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्राबाहेर जेंव्हा नोकरीस जातो तेंव्हा त्यांना इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मला फक्त एवढाच म्हणायचं आहे कि मातृभाषेतून उत्तम शिक्षण देण्याबरोबरच इंग्रजी भाषेचे सुद्धा व्यवस्थित शिक्षण द्यावे. दुर्देवाने सध्या तरी तीच आंतरराष्ट्रीय भाषा आहे (भारतीय लोकां साठी).

  लहान मुलांना मराठीतूनच प्राथमिक शिक्षण द्यावे व इतर भाषांची म्हणजे इंग्रजी आणि हिंदी भाषांची नुसती ओळख करून द्यावी. सातवी आठवी पासून हळू हळू इंग्रजी भाषेचा स्तर वाढवत न्यावा (ज्यांना उच्चशिक्षण घ्यायचे आहे त्यांना). कोणतीच भाषा शिकवण्यात कसूर ठेवू नये. कारण भाषा हे गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यवहाराचे आणि इतर विषय शिकण्याचे मध्यम आहे हे पक्के बिंबवावे. म्हणजे कोणतेच प्रोब्लेम्स येणार नाहीत. पालकांनाच लहान मुलांच्या तोंडी मराठी बडबड गीतं ऐवजी इंग्रजी कविता लागतात. पालकांचे प्रबोधन आणि मराठी-इंग्रजी विषय शिक्षकांचे प्रशिक्षण ह्याने हा प्रश्न सुटू शकतो.

  मला तुमचे आगामी पुस्तक वाचायला आवडेल. आपल्या सारख्यांचे प्रयत्न या संदर्भात मोलाची भूमिका बजावतील यात शंका नाही.

  अपर्णा

 7. […] राईलकरांचा पूर्वी प्रसिद्ध झालेला  पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. … हा लेख देखील अवश्य वाचून […]

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s