मराठी विश्वकोश : खंड – १ (‘अंक’ ते ‘आतुरचिकित्सा’)

मराठी ‘विश्वकोश’ (मराठी एन्सायक्‍लोपीडिया) म्हणजे मराठीतील ज्ञानाचे भांडार ! ‘अ’ ते ‘ज्ञ’, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. आपण हे ग्रंथ नुसते चाळत बसलो तरी आपल्याच भाषेतून आपल्याला देश-विदेशातील विविध विषयांबद्दल उत्तमोत्तम माहिती बसल्या जागी समजते.  

Read More »

पानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे)

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!

Read More »

शिवछत्रपतीचे चरित्र (बखरकार- कृष्णाजी अनंत सभासद)

शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ’शिवछत्रपतीचे चरित्र’ ही बखर. ह्या बखरीत केलेल्या उल्लेखानुसार हा ग्रंथ शालिवाहन शके १६१६ (इ०स० १६९४) या वर्षाच्या सुमारास (म्हणजे महाराजांच्या मृत्युनंतर केवळ १४ वर्षांनी) लिहिला गेला असे दिसते. याच्या सत्यासत्यतेबद्दल अर्थातच आम्ही काहीच सांगू शकत नाही. पण तरीही याचे वाचन सुरस ठरावे.

Read More »

पानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत)

“शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे!…”

“या कादंबरीच्या निमित्ताने सदाशिवरावभाऊ यांची एक लेचापेचा, नवशिका सेनापती अशी जनामनात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसून गेली. पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही धक्का बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक ’पुण्यपथ’ असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे…”

Read More »

हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा (ले० अंजली कीर्तने, लोकसत्ता)

फाळणीपूर्वीच्या या लाहोरमध्ये कृष्णानगर, संतनगर नावाच्या वस्त्या होत्या. भारत नावाची इमारत होती. गीता नावाचं सभागृह होतं. मोहिनी नावाचा रस्ता होता. सनातन धर्ममंदिर होतं. कपूरथळा, नाभा, पतियाळा संस्थानातील राजेरजवाडय़ांचे बंगले होते. या लाहोरमध्ये गुजराती लॉज नावाची खाणावळ होती आणि तिथे जेवायला जाणारी बहुसंख्य मंडळी मराठी असत. लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर शादीलाल नावाचे गृहस्थ होते आणि सक्करचं प्रसिद्ध धरण गंगाधर नीळकंठ गोखले या मराठी अभियंत्यानं बांधलं होतं.

सर्वाना वाटत होतं की रावी नदी ही भारत पाकिस्तानची सीमारेषा ठरेल. लाहोर भारतात येईल. मात्र तसं झालं नाही.

Read More »

लता की आशा? (ले० शिरीष कणेकर, दिवाळी अंक – लोकप्रभा २०१०)

गेल्या पन्नास-साठ वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील कुठल्याही क्षेत्रात मराठी माणसाला सर्वोच्च अभिमान वाटावा असे सातत्याने कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्या मनात कुठले नाव येते? ‘पन्नास-साठ वर्षे’, ‘राष्ट्रीय पातळी’, ‘सर्वोच्च अभिमान’ व ‘सातत्याने’ हे निकष पाहिल्यावर भारतरत्न लता मंगेशकर किंवा पद्मविभूषण आशा भोसले (किंवा दोघीही) यांच्याशिवाय दुसरे कुठलेही नाव आपल्या मनात येईल असे वाटत नाही.

‘‘ही माधुरी दीक्षित माझ्याशी हिंदीतून का बोलते हो?’’ लताने एकदा मला विचारले, ‘‘मी मराठीतून बोलत्येय आणि ही हिंदीतून बोलत्येय. आम्ही इतर कोणाही इतकचं चांगलं हिंदी बोलतो. हयात घालवल्येय या फिल्म इंडस्ट्रीत पण म्हणून मी उद्या घरी आल्यावर माईला म्हणाले, ‘क्यौं माई, कैसी हो?’ तर ते तिला खटकणार नाही का?’’

Read More »

मराठी जनतेची राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका (मराठी+एकजूट)

खरं म्हणजे मराठीजनांनी एकत्रितपणे तयार केलेली राज्याच्या सांस्कृतिक धोरणाविषयक श्वेतपत्रिका म्हणजे सामान्य मराठी जनतेने शासनाला सादर केलेले जनतेचे मागणीपत्र नव्हे तर जनतेचे आदेशपत्र आहे. हा सामान्य माणसाचा सांस्कृतिक जाहीरनामा आहे. ह्या जाहीरनाम्यातील सूचनांबद्दलच्या शासनाच्या कार्यवाहीचे येत्या काळात मूल्यमापन करून मराठी माणसाने शासनाचे प्रगतिपुस्तक भरावे आणि त्यातील कामगिरीवरूनच पुढील निवडणुकीच्या वेळी ह्याच शासनकर्त्यांना पुन्हा प्रवेश द्यायचा की बोटाला धरून बाहेरची वाट दाखवायची ह्याचा निर्णय घ्यावा.

Read More »

लाहोरवर कब्जा (ले० निनाद बेडेकर, दै० पुढारी, २८ फेब्रु० २०१०)

“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “

प्रख्यात इतिहाससंशोधक व लेखक निनाद बेडेकर ह्यांनी २८ फेब्रुवारी २०१० दिवशीच्या दैनिक पुढारीमधील बहार पुरवणीसाठी लिहिलेला हा लेख आपले मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी आपल्यासाठी पाठवला आहे.

मराठ्यांमुळे केवळ दक्षिण भारतातील मंदिरांचेच संरक्षण झाले असे नव्हे तर मराठ्यांमुळे जवळपास संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू, शीख, जैन बौद्ध, व इतर धर्मियांची  मंदिरे, प्रार्थनास्थळे, जनसामान्यांची घरे, जमीनजुमला, शेती-संपत्ती, व्यवसाय-उद्योग ह्यांचे संरक्षण तसेच भारतीय स्त्रियांचे शीलरक्षण झाले. मराठ्यांच्या शौर्याचा हा इतिहास म्हणजे हिंदुस्थानाच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. म्हणूनच आपण आज अभिमानाने म्हणू शकतो, – “लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी”.

निनाद बेडेकरांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_लाहोरवर कब्जा _ले० निनाद बेडेकर_150310

.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यासंबंधी सूचनांसाठी ’मराठी+एकजूट’ द्वारा आवाहन

महाराष्ट्र शासनाने डॉ० आ०ह० साळुंखे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा सादर केला आहे आणि त्या समितीने – म्हणजेच पर्यायाने शासनाने – जनतेला दि० २८ फेब्रुवारी २०१०पर्यंत सदर मसुद्यावरील सूचना पाठविण्यास सांगितले आहे. आपण ह्या मसुद्याच्या अनुषंगाने, त्यात आपण सुचवू इच्छित असलेल्या सर्व सूचना आमच्याकडे विरोपाने (ई-मेलने) पाठवून द्याव्यात अशी ’मराठी+एकजूट’ द्वारा आम्ही विनंती करतो. ’मराठी+एकजूट’कडे आलेल्या सूचनांचे मान्यवरांच्या सहाय्याने एकत्रित संकलन करून, त्यात आवश्यक तिथे मान्यवरांचे स्पष्टीकरण/भाष्य जोडून, ते ’मराठी+एकजूट’च्या सूचना करणार्‍या सहकार्‍यांच्या नामनिर्देशासह शासनाच्या सांस्कृतिक धोरणासाठी नेमलेल्या समितीला सादर केले जाईल.

Read More »