इंग्रजी जरूर शिकू, मराठीला मारण्याची काय गरज? (दै० लोकमत मधील काही लेख)

“खुद्द साहेबाच्या देशातही इसवीसन १६५१ पर्यंत इंग्रजी बोलली जात नव्हती. तेव्हा युरोपवर फ्रेंच भाषेचे वर्चस्व होते. शेवटी इंग्लंडच्या राजाला इंग्लंडमधील सर्व व्यवहार इंग्रजीतच होतील असा वटहुकूम काढावा लागला. त्यातून पुढे औद्योगिक क्रांती झाली व इंग्रज सर्व जगात पसरले. त्यांच्या विजिगिषू वृत्तीने त्यांनी जग जिंकले. आम्हाला साहेबाकडून काही घ्यायचे असेल तर ही विजिगिषू वृत्ती घ्यायला हवी. त्याऐवजी आपण त्यांची भाषा उरावर घेऊन बसलो आहोत.”

Read More »

विचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)

अमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,

हल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे:

Read More »

घरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण (ले० अपर्णा लळिंगकर)

दि. १२ जूनच्या चतुरंग मध्ये “घरीच शिक्षण किंवा होम स्कुलिंग” या संकल्पनेवर आधारीत घरात शाळा हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची पायवाट हा वंदना अत्रे यांचा आणि शिकतं घर हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहीती सांगणारा असे तिनही लेख वाचनात आले. सर्वशिक्षा अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरूवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या प्रतिसादा मध्ये करत आहे.

Read More »

85% of Shops Comply with Nameboard Norms in Chennai (The Hindu, 22 June 2010)

The Chennai Corporation on Monday started removing nameboards of shops and commercial establishments, which did not display the names in Tamil.The action against 1,387 shops and commercial establishments on the first day of the drive came after the deadline set by the civic body to change nameboards ended.

Read More »

English not the medium – Malaysia’s dilemma

मलेशियामध्ये सध्या देशपातळीवर चालू असलेल्या एका महत्त्वाच्या चर्चेमधील एक सुरस लेख. विषय: सेमी-इंग्रजी माध्यमाची पद्धत  (गणित व विज्ञान या विषयांसाठी इंग्रजी भाषेचे माध्यम). मलेशियातील या समस्येचे स्वरूप बरेचसे आपल्यासारखेच दिसते आहे. पण एकच मुख्य फरक म्हणजे तेथील सरकार या चर्चेत सर्वांचे विचार लक्षात घेते आहे व झालेल्या निर्णयामधील चूक मान्य करून ती दुरुस्त करण्यास ते तयार आहे.

Read More »

शासकीय पाठ्यपुस्तक आणि मी (ले० सुभाष भेंडे)

गड्या आपुला गाव बराहे माझ्या अमेरिका भेटीवर आधारलेलं प्रवासवर्णन. अमेरिकेत आज सुबत्ता आहे, सुखाची रेलचेल आहे. परंतु काही बाबतीत त्या देशात अध:पतन कसं चालू आहे याविषयी सारांशरूपानं लिहिलं होतं. त्याचा समावेश बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी झाला…

Read More »

आपल्या बॅंकेचे मूल्यांकन करून बॅंकेला जाब विचारण्यासाठी प्रश्नावली

थोडक्यात सांगायचे म्हणजे याविषयी थोडीफार जागृती होते आहे. पण सर्वांनी मिळून नेट लावला तरच पूर्वापार रक्तात भिनलेली मराठीकडे तुच्छतेने पाहायची इतरांची वृत्ती आपण बदलू शकू. असे मोठ्या प्रमाणात घडणे आवश्यक आहे; तरच महाराष्ट्रातील बॅंका व रिझर्व बॅंक ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहतील, मराठी माणसांना गृहित धरणे थांबवतील आणि मराठी भाषेला योग्य तो सन्मान व आदर देऊ लागतील.

Read More »