फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. 

३० जानेवारी २०१२च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_फॅशन म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये_Loksatta_120130

आपले प्रतिमत (feedback) या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

3 thoughts on “फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये – डॉ. अनिल काकोडकर

    • प्रिय श्री० देविदास खोत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. तुमच्या-आमच्यासारखे लोक फार अल्पसंख्य आहेत. आपण मायबोलीबद्दलचे आपले मत इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करून अधिकाधिक लोकांना आपल्या वर्गात सहभागी करून घ्यायला पाहिजे.

      हल्लीच प्रसिद्ध झालेली तमिळनाडूमध्ये तमिळचे शिक्षण सर्वांनाच अनिवार्य असल्याबद्दलचा लेख आपण वाचला का? नसल्यास खालील दुव्यावर वाचावा. त्यासंबंधित इतर लेखांवरही नजर घालावी.

      परराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल! – मुख्यमंत्री जयललिता –} http://wp.me/pzBjo-K4

      अमृतमंथनावर मुख्यतः मराठी भाषा, संस्कृति व त्यांच्या अनुषंगाने भारतीय संस्कृति-परंपरा यांच्याशी संबंधित लेख असतात. चाळून पाहा. जे आवडतील ते मित्रांना अग्रेषित करा.

      आपण अनुदिनीच्या मुखपृष्ठावरील Follow ही कळ दाबून अमृतमंथनाचे सदस्य होऊ शकता, जेणेकरून आपल्याला प्रत्येक नवीन लेखाबद्दल माहिती कळवली जाईल.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. […] फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी…  –}}  https://wp.me/pzBjo-JY […]

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s