मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर)

मुख्य म्हणजे मराठी भाषेचा प्रसार ह्या संगणकीय युगातही वेगाने होऊ शकेल. तसेच इंग्रजीची भीती असल्याने संगणकाला ‘परग्रहावरचा पदार्थ’ समजणारे विद्यार्थी संगणकावर हुकूमत गाजवतील. मराठीतील प्रचंड माहितीचे, ज्ञानाचे चलनवलन-वहन सहजतेने होईल. शासकीय व खाजगी क्षेत्रात संगणकीय मराठी भाषेशी संबंधित रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषेची सुवर्णझळाळी उठून दिसेल.

२७ फेब्रुवारीच्या ’मराठीभाषा दिना’निमित्ताने ’अंतर्नाद’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या फेब्रुवारी २०११च्या मराठीभाषा विशेषांकातील श्री० विनय मावळणकर यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान_ले० विनय मावळणकर_अंतर्नाद_110219

प्रस्तुत विषयाबाबतची आपली मते या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहावीत.

– अमृतयात्री गट

ता०क० ’अंतर्नाद’ मासिकाच्या त्याच मराठीभाषा विशेषांकातील श्री० सलील कुळकर्णी यांचा लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

संगणकावर मराठीमधून लेखन करण्याविषयीचा वरील लेखात उल्लेख केलेला लघुपट युनिकोडमधून लिहिण्याबाबतची माहिती खालील दुव्यांवर सापडेल.

संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती

संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल

.

3 thoughts on “मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर)

  1. […] This post was mentioned on Twitter by memarathi, amrutyatri. amrutyatri said: मराठी भाषा, संगणक व माहिती तंत्रज्ञान (ले० विनय मावळणकर) http://wp.me/pzBjo-CY […]

  2. नमस्कार,
    ‘संगणकावर, महाजालावर मराठीचा वापर न करणे ही एक गंभीर समस्या आहे हेच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षांत येत नाही….’
    खरे आहे। कृपया माझी एक अडचण सोडवा. माझ्या या संगणकावर मी यूनिकोड कार्यान्वित केली आहे। यावर ‘लीप आफ़ीस’ मध्ये मी भाषा ‘मराठी’, कळ्पट ‘इन्स्क्रिप्ट’ व टंक ‘डीवी-टीटी योगेश’ असे घेऊन थेट मराठीतच टंकण करून ‘कापी’ केल्यानंतर ते अमृतमंथनच्या ‘तुमचा अभिप्राय नोंदवा’ यांत काही केल्या त्या रूपात ‘पेस्ट’ होत नाही। इन्स्क्रिप्ट कळफ़लकाचा सराव असून ही शेवटी मला ‘अळ्गी यूनिकोड एडिटर’ मध्ये लिप्यांतरण करून ते इथे ‘पेस्ट’ करवे लागले।
    लेखांत ‘माहिती तंत्रज्ञान’ विषयक शब्दांचे कंसांत इन्ग्रज़ी शब्द दिल्याने सोय झाली; कृपया काही काळ असेच करत रहावे अशी विनंती।

    • प्रिय श्री० शां. भास्कर भट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

      योगेश हा टंक युनिकोड संकेतप्रणालीवर आधारित नसावा. त्यामुळे तो सर्व आधुनिक, युनिकोड प्रणाली प्रमाण मानून विकसित केल्या गेलेल्या सॉफ्टवेअर प्रणालींवर चालणार नाही. इनन्स्क्रिप्ट वापरून युनिकोडातून टंकन करण्यासाठी आपल्याला कदाचित आपल्या संगणकाची निटावणी (setting) बदलायला लागेल. आपण खालील लेखांची मदत घ्यावी.

      संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –} http://wp.me/pzBjo-2d

      संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती –} http://wp.me/pzBjo-Aw

      संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर) –} http://wp.me/pzBjo-gH

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.