’मराठी विश्वकोश प्रकल्प’ हा तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी यांनी संकल्पिलेला आणि हाती घेतलेला मराठीमधील शिवधनुष्यासम अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर्कतीर्थांच्या मृत्युनंतर जरी ढेपाळला असला तरीही त्यांनी आतापर्यंत केलेले, करून घेतलेले प्रचंड काम आता महाजालावर ’युनिकोड’मध्ये उपलब्ध होत असल्याने (ती घोषणा खरोखरच आणि लवकरच प्रत्यक्षात येवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!) मराठी माणसास तो मराठीतील माहितीचा भव्य खजिना महाजालाद्वारे (टिकटिक करून) चुटकीसरशी प्राप्त होऊ शकेल.
आपले मराठीप्रेमी मित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवलेली लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेली ही महत्त्वाची बातमी खालील दुव्यावर वाचू शकता.
अमृतमंथन_मराठी विश्वकोश आता ‘युनिकोड’मध्ये_111026
आपली मते व प्रतिक्रिया या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
[…] मराठी विश्वकोश आता ‘युनिकोड’मध्ये ! […]
युनिकोड म्हणजे युनिव्हर्स कोड
मराठीला आता जगाच्या पाठीवर कुठेही नेता येईल.
जय महाराष्ट्र
प्रिय श्री० घनश्यामभाऊ पाटील यांसी,
सप्रेम नमस्कार.
युनिकोडच्या साहाय्याने मराठीला जगाच्या पाठीवर कुठेही नेता येईल हे खरे. पण साधन मिळाले म्हणजे काम झाले नाही. त्या साधनामागचा माणूस तसाच भक्कम, निश्चयी, स्वाभिमानी, तत्त्वनिष्ठ असायला हवा. एरवी महाराष्ट्रात मराठी ही कायद्याने राज्यभाषा असूनही आपण इंग्रजी व हिंदीचाच प्रसार करण्यात धन्यता मांडतो, तसाच प्रकार व्हायचा.
तेव्हा बोलताना, लिहिताना जिथे-जिथे शक्य तिथे आवर्जून मराठीचाच उपयोग करू अशी शपथ आपण घेऊ.
अमृतमंथनावरील लेख वाचीत जा व आपले प्रतिमत (feedback) देखील कळवीत जा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट