मराठी वाचनप्रेमींसाठी घरपोच पुस्तकांची सुविधा – ग्रंथस्नेह वाचनालय

वाचकांना आपल्या कामाच्या वेळेनंतर ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची ने-आण करणे हे नेहमीच शक्य नसते अशावेळी आपल्या कार्यालयात किंवा घरात कोणी पुस्तके आणून देत असेल तर ते कोणाला आवडणार नाही? नेमकी हीच भन्नाट कल्पना ह्या वाचनालयाच्या स्थापनेमागे आहे.

या उत्तम उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती खालील दुव्यावर सापडेल.

अमृतमंथन_मराठी वाचनप्रेमींसाठी सुविधा_ग्रंथस्नेह वाचनालय_101019

मुंबई परिसरातील मराठी वाचनप्रेमींनी ह्या सुविधेचा अवश्य फायदा घ्यावा. ही योजना यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही तशाच प्रकारच्या सोयी सुरू करण्याबद्दल आपण त्यांना सुचवू शकतो. किंवा इतर कोणी ह्यापासून स्फूर्ती घेऊन आपापल्या नगरात अशी योजना सुरू केल्यास तेदेखील इष्टच ठरावे.

आपल्याला प्रस्तुत उपक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण त्यांच्या दूरध्वनी क्रमांकावर त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता किंवा इथे आपल्या शंका लिहिल्यास आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ शकतो, म्हणजे त्या माहितीचा फायदा इतर वाचकांनाही होईल.

– अमृतयात्री गट

.

4 thoughts on “मराठी वाचनप्रेमींसाठी घरपोच पुस्तकांची सुविधा – ग्रंथस्नेह वाचनालय

  1. Sorry for writing in English as I do not know how to use the Marathi font provided by gmail here.
    I am already a member of the ‘Granthsneh’ courier library being conducted by Smt. Supriya Mhatre, Lata Pokle and Chitra Happan. Their service is regular and efficient. The ladies are polite and helpful. I have presented them 2 of my own story collections ‘Dolkathi’ and ‘Brahmkamal’. I wish they should approach different writers and request them to donate their works to the Granth Sneh library. Granth Sneh should also procure some old classics as well as new literary works of high standard. At my advanced age, the Granthsneh’ library is a boon to me as it is not possible for me to go and procure books from libraries. In any case a Marathi library is almost 20 kms. away from Versonva where I live.
    Yeshwant Karnik.

    • प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपल्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी व स्वतः लेखक असणार्‍या व्यक्तीने दिलेले श्रेय व शाबासकी यामुळे ग्रंथस्नेह मंडळाला तसेच अशाच प्रकारचे विविध लहानमोठे उपक्रम जिद्दीने करणार्‍या मंडळींना नक्कीच प्रोत्साहन लाभेल.

      समस्त अमृतमंथन परिवाराच्या वतीने अशा सर्व मंडळींसाठी शुभेच्छा !!

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० शरद अष्टेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      वाचनालय/ग्रंथालय हे आपल्या मातेचे मंदिरच होय. मराठीत वाचनालय चालवणे ही मायबोली मराठीची मोठीच सेवा आहे. देव आपल्या भागातील अधिकाधिक मराठी जनांना आपले सभासद होण्याची सद्‍बुद्धी देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

      मराठी पालकांना आपल्या मुलांना बालपणापासूनच मातृभाषेतून योग्य वाचनाची आवड निर्माण करण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. (कोणी हा प्रश्नच आहे म्हणा.)

      (आपले वाचनालय मराठी पुस्तकांचे आहे असे आम्ही गृहीत धरीत आहोत.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.