स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी आत्मार्पण केले. त्याआधी त्यामागची भूमिका विशद करणारा लेख त्यांनी लिहिला होता. स्वा० सावरकरांच्या लेखातील अंश लोकसत्तेने प्रसिद्ध केला आहे.
सावरकरांची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक केलेली आणि तर्काधिष्ठित असे. कधीकधी त्यांच्या कृती व विचारांमागील त्यांची भूमिका व त्यांची योग्यता सामान्य माणसाला लगेच लक्षातही येत नसे. म्हणूनच त्यांचा आत्मार्पण करण्याचा बेत निश्चित झाल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याआधी त्यांनी हा लेख प्रसिद्ध केला असावा. त्यावेळी हा लेख वाचून सावरकरांच्या मनातील ह्या योजनेची किती जणांना चाहूल लागली होती, कोण जाणे.
समाजासाठी प्रामाणिकपणे काहीही करण्याची कुवत नसताना, समाजाला मार्गदर्शन करण्याची लायकी नसताना आणि स्वतः शारीरिकदृष्ट्याही सुदृढ नसताना, केवळ हव्यासापोटी विविध उच्च पदांना व मानसन्मानाला चिकटून राहण्यासाठी केविलवाणी धडपड करणार्या आजच्या राजकारण्यांनी, सामाजिक नेत्यांनी व इतर क्षेत्रातील तथाकथित मान्यवरांनीही सावरकरांच्या ह्या आत्मत्यागाबद्दलच्या लेखापासून स्फूर्ती घेऊन निदान उच्चपदाच्या व मानसन्मानाच्या हव्यासाच्या त्यागाचा विचार करावा आणि उर्वरित आयुष्य समाजाच्या निष्काम सेवेसाठी घालवावे.
लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला स्वा० सावरकरांचा लेखांश खालील दुव्यावर वाचावा.
अमृतमंथन_आत्महत्या आणि आत्मार्पण_110313
आपले प्रतिमत (feedback) या लेखाखालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य नोंदवावे.
– अमृतयात्री गट
.
Tags: आत्मसमर्पण, आत्मार्पण, विनायक दामोदर सावरकर, समाधी, स्वातंत्र्यवीर वि० दा० सावरकर, SAVARKAR, V. D. SAVARKAR, VINAYAK DAMODAR SAVARKAR
.
खूपच सुरेख लेख आहे. ठायी ठायी स्वातंत्र्यवीरांची विद्वत्ता आणि उत्तम लेखनाची हातोटी प्रचितीस येते आहे. आपल्या देशाचं दुर्देव की अशा द्रष्ट्या माणसाला अपराधी ठरवलं गेलं आणि शेवटी त्यांनाही अतिशय घाणेरड्या राजकारणाला कंटाळून आत्मार्पण करावं लागलं. आज किमान ४-५ सावरकरांची गरज आहे. तरच आपला देश वाचू शकतो.
प्रिय सौ० शांतिसुधा यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.
आपले अक्षरन् अक्षर खरे आहे. नेहरू आणि त्यांची कॉंग्रेस यांना अशा खर्या देशभक्तांची नेहमीच भीती वाटत आली आहे. म्हणून त्यांनी सातत्याने त्यांचे महत्त्व कमी करायचे काम केले. आपल्या या देशात प्रामाणिक भावनांना किंमत नाही आणि भोंदूपणा, जाहिरातबाजी, ढोंगी व्यक्तिपूजा यालाच अधिक महत्त्व आहे. अशा प्रजेच्या नशीबी इतर काय असणार?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे जे लिखाण समोर येते ते वाचून मनात येते की असे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभावे असे कोणते पुण्य महाराष्ट्राने केले असावे?
त्यांचे सद्गुण महाराष्ट्र अजूनही समजू शकला नाही.
सर्व जगात अशी माणसे दुसर्या कुठल्याच देशाला लाभली नाहीत व त्यांना कधीही न समजू शकणारे करंटेही दुसर्या कोण्त्याच देशात झाले नाहीत.
बाळ संत
प्रिय श्री० बाळाराव संत यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.
सौ० शांतिसुधा यांना लिहिलेले उत्तर आपल्या पत्रालाही लिहितो.
आपले अक्षरन् अक्षर खरे आहे. नेहरू आणि त्यांची कॉंग्रेस यांना अशा खर्या देशभक्तांची नेहमीच भीती वाटत आली आहे. म्हणून त्यांनी सातत्याने त्यांचे महत्त्व कमी करायचे काम केले. आपल्या या देशात प्रामाणिक भावनांना किंमत नाही आणि भोंदूपणा, जाहिरातबाजी, ढोंगी व्यक्तिपूजा यालाच अधिक महत्त्व आहे. अशा प्रजेच्या नशीबी इतर काय असणार?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट