दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, “मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत मोजली.”
“मी एरवी गांधींची भक्त; पण त्यांचं जिथं चुकलं तिथ सांगितलंच पाहिजे. भलत्या ठिकाणी भक्ती काय कामाची ? तेव्हा एशियाटिक लायब्ररीचे एक सभासद प्रभावळकर म्हणून होते. आजचे नाट्य कलावंत दिलीप प्रभावळकर यांचे वडील. ते मला म्हणाले होते, ” बाई, तुम्ही गांधीनाही सोडलं नाहीत…! “
भारतीय भाषेतील पहिला ज्ञानकोश रचणार्या ध्येयवेड्या कै० श्रीधर व्यंकटेश केतकर या थोर पुरुषाची ही थोडक्यात ओळख. आपले मराठीप्रेमी मित्र श्री० मंगेश नाबर यांचा हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_केतकर-पिडीयाचे भारतीयांना वावडे_120403
लेखाबद्दल आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
Tags: गांधीजी, दुर्गाबाई भागवत, मंगेश नाबर, मराठी, महात्मा गांधी, महाराष्ट्र, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, श्रीधर व्यंकटेश केतकर, GANDHIJI, MAHARASHTRA, MAHATMA GANDHI, MARATHI, MARATHI ENCYCLOPEDIA,SHREEDHAR VYANKATESH KETKAR
.