We must force the Govt for implementation of the Western Ghats Ecology Expert Panel (Dr. Madhav Gadgil committee) Report

पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटाच्या (डॉ० माधवराव गाडगीळ समितीच्या)  अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आपण सरकारला भाग पाडले पाहिजे.

———–

उद्योगक्षेत्रातील हितसंबंधितांच्या फायद्यासाठी वेळोवेळी पर्यावरणाचा सरळसरळ बळी देणार्‍या सरकारला आपण आता यापुढे पर्यावरणाच्या हातात हात घालून विकास साधणारे औद्योगिक विकास धोरण स्वीकारण्यास भाग पाडले पाहिजे. जगातील सर्वच प्रगत राष्ट्रे आपल्या पर्यावरणाची काळजी घेऊन आपल्या भावी पिढ्यांना कल्याणकारी ठरेल असेच औद्योगिक धोरण आखतात. तर मग आपल्या देशात तसे का घडू शकत नाही? तसे घडावे म्हणून आपणच सरकारवर दबाव आणायला हवा आणि त्यादृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पश्चिम-घाट परिसरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण डॉ० माधवराव गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञसमितीने दिलेल्या अहवाल स्वीकारण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे. जर का सरकारला ह्या तज्ज्ञसमितीच्या कुठल्याही शिफारशींच्या योग्यायोग्यतेबद्दल शंका असेल तर सरकारने त्याबद्दलची विशिष्ट कारणे व तत्संबंधित वस्तुस्थिती ह्यांच्या आधारे आपले आक्षेप स्पष्टपणे देशाच्या जनतेसमोर मांडावेत.

It’s high time we forced our government that allows blatant destruction of our ecology from time to time for the benefit of the interested parties in the industry, to henceforth follow an ecofriendly industrial development policy. All the developed countries in the world plan their industrial policy that takes care of the ecology to ensure welfare of the future generation of the country. Why can’t we too do the same? We must pressurise the government to adopt just to do that and as the first major step in that direction, we must force the central government to accept and implement the report submitted by the Expert Panel under the chairmanship of Dr. Madhav Gadgil. If the government has any reservations about any of the recommendations of the expert panel, let it put forth before the people of this country, its objections supported by related facts and specific reasons, why they feel the recommendations of the panel are not acceptable to them.

भारतात यापुढे पर्यावरणस्नेही विकासधोरणे राबवली जावीत व त्याद्वारे आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य सुखी व्हावे अशी मनापासून इच्छा असेल तर कृपया खालील माहिती नजरेखालून घालावी. आपल्याप्रमाणेच जीवनमूल्ये मानणार्‍या मित्रांनादेखील ही माहिती निश्चितपणाने अग्रेषित करावी. 

If you sincerely wish that India should adopt ecofriendly development policies to ensure happiness for the generations to come, then kindly have a look at the information presented below. You may also forward the information to your friends holding similar values in life.

१. आपल्या देशातील पर्यावरणाच्या सातत्याने होत असलेल्या र्‍हासावर नियंत्रण आणण्यासाठी काही निश्चित धोरण आखण्याच्या उद्देशाने हातात घेतलेल्या कृतियोजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ’पर्यावरण व वन’ विभागाने पश्चिम घाटाच्या परिसरातील पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रख्यात पर्यावरण तज्ज्ञ डॉ० माधवराव गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांचा ’पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गट’ नियुक्त केला.

1. As a part of the action plan to formulate a definite policy to check the continuous damage to the ecology of our country, the ‘Ministry of Environment and Forest’ of the Central Government appointed a 13 member ‘Western Ghats Ecology Expert Panel’ under the chairmanship of Dr. Madhavrao Gadgil, an eminent environmentalist, to study the ecology of the Western Ghats and surrounding areas.

२. ह्या तज्ज्ञगटाच्या अहवालासंबंधातील विविध घडामोडींबद्दल थोडक्यात माहिती ‘दिव्य मराठी’ ह्या दैनिकातील लेखात डॉ० माधवराव गाडगीळांनी मांडली होती. तो लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

2. The various developments pertaining to the report of the expert panel have been narrated in short in the following article of Dr. Madhav Gadgil that appeared in the Marathi daily ‘Divya Marathi’. The article is available at the link given below.

Amrutmamthana_Sahyadri for Divya Marathi_120619

३. ह्या तज्ज्ञगटाने मार्च २०१० ते ऑगस्ट २०११ ह्या काळात त्या भागाच्या पर्यावरणाचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर केला. खरे तर हा अभ्यास चालू असतानादेखील सरकारच्या विविध विभागांनी आवश्यक ते सहकार्य न करणे, आवश्यक ती माहिती न देणे, कधीकधी तर खोटी माहिती देणे अशा प्रकारचे उद्योग करून त्यात खो घालण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तज्ज्ञगटाने नेटाने आपले काम पूर्ण करून आपला अहवाल सरकारला सादर केला.

3. After carrying out the study between March 2010 and August 2011 the committee submitted its report to the government. As such, even during the study period, the government tried various tricks such as non-cooperation, not providing the required information/data, at times even providing false data etc., in order to scuttle the study. Nevertheless, the committee steadfastly completed the assigned work and submitted the reported.

४. अहवाल पाहताच तो राजकारणी व त्यांचे उद्योगक्षेत्रातील भागीदार असणार्‍या हितसंबंधी मंडळींच्या हिताला ह्या अहवालामुळे धोका पोचण्याची शक्यता आहे अशी धास्ती सरकारला वाटल्यामुळे सरकारने नेहमीप्रमाणे तज्ज्ञांच्या अभ्यासाच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्याचा आव आणून तो अहवाल प्रसिद्ध न करता कायमचा दडपून टाकण्याची युक्ती केली.

4. On going through the report, the government sensed that the report is likely to prove to be a major hindrance in serving the interests of the politicians and their partners in the industry and hence decided to deploy the usual method of commissioning study groups to study the report of the study carried out by the expert group and suppress the report forever.

५. माहिती अधिकाराखाली ह्या अहवालाची प्रत मागितली असता ती देण्यास ’पर्यावरण व वन’ विभागाने ढिसाळ कारणे पुढे करून तसे करण्यास नकार दिला. पर्यावरण मंत्रालयाच्या ह्या भूमिकेच्या विरुद्ध मुख्य माहिती आयुक्तांच्याकडे पुनर्विचारार्थ केलेल्या विनंतीनंतर आयुक्तांनी सुनावणी घेऊन खालीलप्रमाणे अभ्यासपूर्ण निर्णय दिला. (मराठी भाषांतर) –

Amrutmanthan_CIC order WGEEP Marathi version_120619

5. On being requested for a copy of the report, the ‘Ministry of Environment and Forests’ refused to oblige giving flimsy reasons. On receiving an appeal against the stand taken by the MoE&F, the Chief Information Commissioner gave the following studied judgment. (English version) –

Amrutmanthan_CIC Judgment_WGEEP_English_120619

६. मुख्य माहिती आयुक्तांच्या निर्णयाच्या विरुद्ध केंद्र सरकारने दिल्लीच्या उच्च न्यायालयाकडे धाव घेतली असता, उच्च न्यायालयाने त्यांना फटकारताना केलेली चर्चादेखील सुरस व वाचनीय आहे. (मूळ इंग्रजी आवृत्ती) –

6. When the Central Government approached the Delhi High Court, the High court while rejecting their petition made some interesting observations. (Original English version) –

Amrutmanthan_Delhi High Court_WGEEP_120619

७. सरतेशेवटी नाईलाजास्तव दिनांक 23 मे 2011 या दिवशी सरकारने तो अहवाल प्रसिद्ध केला.

7. Finally, having been left with no choice, the government made the report public on the 23rd May 2011.

८. ह्या अहवालातील ठळक मुद्दे, अहवालाच्या संबंधातील महत्त्वाची माहिती आणि भविष्यकाळात पर्यावरणाच्या हातात हात घालून चालणारा विकास कसा साधता येईल ह्याबद्दल काही सूचना डॉ० माधवराव गाडगीळांनी खालील पीपीटीमध्ये नोंदल्या आहेत. अवश्य नजरेखालून घाला. (इंग्रजी आवृत्ती) –

8. The salient points of the report and related areas as well as suggestions regarding what can be done to promote ecofriendly development in the future have been noted down by Dr. Madhavrao Gadgil in the following ppt. Do check out. (English version) –

Amrutmanthan_WGEEP follow up plan_Dr Madhav Gadgil_120619

९. अमृतमंथन अनुदिनीवर ह्यापूर्वीच प्रसिद्ध झालेला ’कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष (डॉ० माधवराव गाडगीळ समिती)’ हा लेखही आपण खालील दुव्यावर पुन्हा वाचून पाहू शकता.

http://wp.me/pzBjo-zT

9. Amrutmanthan had published an article on the ‘Ratnagiri Sindhudurg Environmental Study Tour Report by Madhav Gadgil Committee’. You may once again have a look at the same at the following link. (Marathi article)

http://wp.me/pzBjo-zT

१०. ह्याविषयी अधिक सविस्तरपणे अभ्यास करू इच्छिणार्‍यांसाठी वरील अहवालाचे संपूर्ण पाठ्य दोन खंडांच्या स्वरूपात खालील दुव्यांवर उपलब्ध आहे.

10. Those, who are interested in detailed study of this subject, may go through the complete text of the report, which is presented in two parts at the links below.

१०क. पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटाचा अहवाल – खंड पहिला (पृष्ठ क्र० १ ते १५०)

10a. Report of the Western Ghats Ecology Expert Panel – Part-1 (Page no. 1 to 150)

Amrutmanthan_WGEEP Report_Part-I_120619

१०ख. पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटाचा अहवाल – खंड दुसरा (पृष्ठ क्र० १५१ ते ३२७)

10b. Report of the Western Ghats Ecology Expert Panel – Part-2 (Page no. 151 to 327)

Amrutmanthan_WGEEP Report_Part-II_120619

आपली मते, सूचना आणि शंका ह्या लेखाखालील चर्चा चौकटीमध्ये अवश्य नोंदवा. आपल्या शंकांना उत्तरे देण्यासाठी आपण स्वतः डॉ० माधवराव गाडगीळांना विनंती करू.

Please do note down your views, suggestions and doubts in the discussion cell under this article. We shall request Dr. Madhavrao Gadgil to reply to your doubts.

– अमृतयात्री गट

– Amrutyatri Goup

.


One thought on “We must force the Govt for implementation of the Western Ghats Ecology Expert Panel (Dr. Madhav Gadgil committee) Report

  1. […] We must force the Govt for implementation of the Western Ghats Ecology Expert Panel (Dr. Madhav Gadg… […]

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s