मराठीमध्ये बोलणारी पुस्तके – एक अभिनव उपक्रम

ज्यांना मराठी वाचणे नीट जमत नाही अशांसाठी, दृष्टी अधू असणार्‍यांसाठी, वृद्धांसाठी, संगणकावर किंवा इतर कामे करताकरता पुस्तक वाचण्याच्या सोयीच्या दृष्टीने (विशेषतः रेडियो ऐकत अभ्यास किंवा काम करण्याची सवय असणारे विद्यार्थी, गृहिणी, व इतर रसिकांना फायदेशीर होईल अशा प्रकारे) स्वतःच बोलणारी पुस्तके श्री० आनंद वर्तक ह्यांनी आपल्या संकेतस्थळावर सादर केली आहेत. श्राव्य पुस्तकांचे (ऑडियो बुक्सचे) जणू एक श्राव्य वाचनालयच (ऑडियो लायब्ररीच) वर्तक स्थापन करीत आहेत.

मराठी भाषेचे अभ्यासक व आपले मराठीप्रेमी मित्र श्री० सुशांत देवळेकर ह्यांनी दाखवलेले हे अभिनव पद्धतीचा उपक्रम हाती घेतलेले ’बोलती पुस्तके’ हे संकेतस्थळ.

तसं म्हटलं तर वर्तकांच्या उपक्रमाची तशी ही सुरुवातच आहे. पण आपणा मराठी वाचनप्रेमींचा (श्रवणप्रेमींचा?) चांगला प्रतिसाद लाभल्यास वर्तकांना प्रोत्साहन मिळेल व ते अधिकाधिक प्रकारची पुस्तके सादर करतील. भरघोस प्रतिसाद मिळाल्यास अशा प्रकारची आणखी संस्थळेही निघू शकतील. आपल्यापैकी काही हौशी मराठीप्रेमी अशा प्रकारच्या उपक्रमास स्वयंसेवी पद्धतीने हातभारही लावू शकतील.

महाराष्ट्रातील वा परदेशातील ज्या पालकांना आपल्या मुलांना मराठीतील उत्तमोत्तम गोष्टी, गाणी, व इतर साहित्य वाचून दाखवायची इच्छा आहे पण पुरेशा वेळेचा, पुस्तकांचा अभाव किंवा इतर काही कारणांमुळे तसे करणे जमत नसेल तर अशा मंडळींसाठीदेखील ह्याच पद्धतीची संकेतस्थळे प्रस्थापित केली जाऊ शकतात.

आपल्यातील संगणककुशल (computer savvy) मित्रांना तर काम करताकरता मराठी साहित्याचे वाचन (श्रवण) करण्याच्या दृष्टीने ही मोठीच पर्वणी ठरावी.

संस्कृतभारतीसारख्या संस्कृतभाषेतून सहजपणे संभाषण करण्याच्या कल्पनेच्या बाबतीत विविध प्रयोग, प्रात्यक्षिके व प्रसार करणार्‍या संस्था अशा पद्धतीचा उपयोग आपल्या उद्दिष्टांसाठीही करू शकतील.

मराठीतून बोलती पुस्तके सादर करणारे श्री० आनंद वर्तकांचे संस्थळ खालील दुव्यावर सापडेल. नक्की भेट देऊन पहा.

http://boltipustake.blogspot.com/2009/01/marathi-audio-books-mp3-talking-book_05.html

अशा नवनवीन, अभिनव, स्वयंसेवी प्रयोगांबद्दल आपल्याला काय वाटते ते इथे ह्या लेखाखालील स्तंभात अवश्य लिहा.

– अमॄतयात्री गट

.

Tags: ,

.

2 thoughts on “मराठीमध्ये बोलणारी पुस्तके – एक अभिनव उपक्रम

    • प्रिय श्री० संजय नाईक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. मराठीच्या संबंधातील कुठल्याही चांगल्या उपक्रमाला आपण उत्तेजन, पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s