’अखेर कमाई’ (कवी कुसुमाग्रज)

मनाला उबग आणणार्‍या महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ’अखेर कमाई’ या कवितेत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.

आपले मराठी साहित्यप्रेमी मित्र श्री० विजय पाध्ये यांनी पाठवलेली ही कविता स्वयंस्पष्टच आहे. तुम्हाआम्हांसारखे सामान्यजनही महाराष्ट्रातील अशा दुर्दैवी प्रकारचे जातीय राजकारण पाहून हताश होतात, तर कुसुमाग्रजांसारख्या संवेदनशील कवीला कशा यातना झाल्या असतील; एवढेच नव्हे तर वरून हे सर्व पाहणार्‍या त्या मानवश्रेष्ठांना किती पश्चात्ताप होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. ’अखेर कमाई’ ही कविता खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_अखेर कमाई_कवी कुसुमाग्रज_291209

.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य मांडा.

– अमृतयात्री गट

.

4 thoughts on “’अखेर कमाई’ (कवी कुसुमाग्रज)

    • प्रिय श्री० सावधान,

      सप्रेम नमस्कार.

      आपण केलेले विधान १००% सत्य आहे, अत्यंत दुर्दैवी असले तरीही. महात्मा गांधींच्या साक्षीनेच देवघेव चालते, विचारांची नव्हे, तर गांधीजींची प्रतिमा छापलेल्या कागदाच्या कपट्यांची. स्वतः गांधीजींना ह्याबद्दल काय वाटत असेल याची कल्पनाही न केलेली बरी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती अरुंधती गुंजकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. आपले म्हणणे पूर्णतः पटते. पण याला आपण सामान्यजनच जबाबदार आहोत. इंग्रजांचे ’फोडा आणि झोडा’ हे धोरणच आजचे राजकारणी पुढे नेत आहेत. एका गटाला दुसर्‍या गटाच्या विरुद्ध लढत ठेवायचे, आणि आपल्या दुष्कृत्यांपासून जनतेचे दुर्लक्ष घडवायचे. त्यांचा हा डाव आपण ओळखला पाहिजे व जात-धर्म इत्यादी मुद्‌द्यांवर आपापसात दुही माजू देता कामा नये.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.