प्रचंड मोठय़ा संख्येने पण मुख्यत: तलवार आणि भाले घेऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यांना बंदुका व तोफांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर मूठभर इंग्रजांनी सहज हरवलं होतं, हा आपला इतिहास आहे. आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगभरात संगणक व माहितीजालाचा उपयोग माहिती आणि संज्ञापनासाठी वाढत असताना मराठी नागरिक व ग्राहक म्हणून स्वत:चे अधिकार मिळवण्यासाठी आपणही संगणक व महाजालाचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. पत्रव्यवहार व दूरध्वनी या जुन्या साधनांवरच जर आपण अवलंबून राहिलो तर आधुनिक जगात मागे राहू.
लोकप्रभा मासिकातील संपूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.
अमृतमंथन-मर्द मराठ्यांची ऑनलाईन लढाई_लोकप्रभा_080110
.
प्रस्तुत लेख आपले वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे व श्री० आनंद भंडारे यांनी पाठवला आहे.
लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
MAZI TAMAM MARATHI BANDHWANNA NAMRA WINANTI AHE KI APAN KONTYAHI BANKETUN CREDIT CARD SATHI KINWA ITAR KONTYAHI SEWESATHI PHONE ALA TAR TYANCHYASHI MARATHITUNACH BOLNYACHA AGRAH DHARAWA. TASECH KONTYAHI SEWA DENARYA KARYALAYATUN PHONE ALA TAR TYANCHYASHI MARATHITUNACH BOLAWE. SAMORUN MARATHI SODUN HINDI ATHAWA ENGLISH MADHUN UTTAR YET RAHILYAS PHONE BAND KARAWA. MALA KHATRI AHE ASHA YA KRUTITUN HAJARO MARATHI BANDHWANNA CALL CENTRE KINWA TASHACH PRAKARCHYA NOKRYA SAHAJ UPALABDH HOTIL.
प्रिय श्री० परेश काशीद यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले म्हणणे योग्यच आहे. महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व व अनिवार्यता वाढली तर आपोआपच मराठी माणसांना रोजगाराच्या संधी वाढतील. त्यांच्या नोकर्यांवर परप्रांतीयांना सहजासहजी डल्ला मारता येणार नाही.
मराठीबोलण्याचा आग्रह करताना ते मराठीच्या लिपीत लिहीण्यास सुरू करावे ही नम्र विनंती. थोड्या प्रयासाने ते सहजच जमेल. अन्यथा रोमी लिपीत मराठी लिणे म्हणजे काट्याचमच्याने पुरणपोळी किंवा पिठलंभाकरी खाण्यासारखे वाटते. नीट चव लागत नाही. (आपण गैरसमज करून घेणार नाही अशी आशा.)
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
किर्तिकुमारांचा लेख अतिषय उद्बोधक आहे.मी स्वतः सर्वाना मराठीमधूनच शुभेच्छा विरोप पाठवतो.आणि जे इतर भाषक मित्र आहेत त्याना त्यांचे भाषेत उत्तर लिहिण्यास सांगतो.केवळ द्क्षिणेकडील मित्रांना मी विनंती करतो कि त्यानी त्याखाली इंग्रजीतून ही लिहावे आणि सोबत दरवेळी त्यांच्या भाषेतील एका अक्षराची ओळ्ख पण करून द्यावी.त्यामुळे मैत्री वाढण्यास याचा उपयोग होतो.
सावधान !!!
प्रिय श्री० सावधान,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत. परप्रांतीयांनी/परदेशीयांनी जिथे स्थायिक व्हायचे तिथल्या भाषेचा/संस्कृतीचा आदर करायलाच पाहिजे आणि त्यात सामावून जाण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. हे जगभर मान्य असलेले तत्त्व आहे. त्याला भारतातील केवळ एका राज्यातच, महाराष्ट्रातच, का अपवाद केला जावा हे कळतच नाही. अर्थात आपण हे नहमीचालवून घेत आलो आहोत. इतर तसे खपवून घेत नाहीत. हेच मूलभूत कारण आहे म्हणा !!
आपणही परप्रांतात/परदेशात गेल्यावर तेच करायला पाहिजे. आणि बडोदे, तंजावर, इंदूर, ग्वाल्हेर, पानिपत, कलकत्ता, लंडन, स्विट्झरलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणचे मराठी तसे करतातही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत. परप्रांतीयांनी/परदेशीयांनी जिथे स्थायिक व्हायचे तिथल्या भाषेचा/संस्कृतीचा आदर करायलाच पाहिजे आणि त्यात सामावून जाण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. हे जगभर मान्य असलेले तत्त्व आहे. त्याला भारतातील केवळ एका राज्यातच, महाराष्ट्रातच, का अपवाद केला जावा हे कळतच नाही. अर्थात आपण हे नहमीचालवून घेत आलो आहोत. इतर तसे खपवून घेत नाहीत. हेच मूलभूत कारण आहे म्हणा !!
आपणही परप्रांतात/परदेशात गेल्यावर तेच करायला पाहिजे. आणि बडोदे, तंजावर, इंदूर, ग्वाल्हेर, पानिपत, कलकत्ता, लंडन, स्विट्झरलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणचे मराठी तसे करतातही.
प्रिय श्रीमती राजश्री यांसी,
सप्रेम नमस्कार.
अगदी बरोबर बोललात. आपण परराज्यात/परदेशात गेल्यावर तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा मान राखायलाच पाहिजे. परकीय ठिकाणी उपजीविकेसाठी स्थायिक व्हायचे असेल तर तिथली भाषा व रीतीरिवाज आत्मसात करून घ्यायलाच पाहिजेत. तसे जगात सर्वत्र घडत असते व तसेच घडायला पाहिजे. तेच नैसर्गिक व योग्य आहे. दुर्दैव हेच की हे केवळ आमच्या महाराष्ट्रातच घडत नाही. आणि याला कारण म्हणजे तसे घडावे यासाठी आपण (सर्व, एकत्रितपणे, व व्यक्तिगत पातळीवर देखील) काहीच करीत नाही. उलट परप्रांतीयाच्या कानावर आपली भाषा चुकूनही पडू नये यासाठी आपण त्यांच्याशीच नव्हे तर इतर मराठी माणसांशीही घराबाहेर हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो. महाराष्ट्रात नवीन आलेल्या तमिळ माणसालाही आपण हिंदी भाषा शिकण्यास भाग पाडतो, मराठी नाही.
काय म्हणावे आपल्या या कपाळकरंटेपणाला? कशाला दोष द्यायचा आपण इतरांना?
क०लो०अ०
अमृतयात्री गट