पुस्तक ओळख – ’प्रिय जी. ए.’ (ले० सुनीता देशपांडे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

प्रिय जी. ए.

लेखिका: सुनीता देशपांडे

मौज प्रकाशन गृह, पृष्ठे: १८६, मूल्य: २०० रूपये

नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे

दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे

अशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का? तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो? कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का? तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ टिकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा! म्हणजे निश्चित असं आपण काहीच नसतो.  त्या त्या क्षणी ते ते असतो. तेव्हा ही वैफल्याची जाणिव खरी आहे, तितकंच तिच्यावर स्वार होऊन माणसं दौडत फार मोठा पल्ला गाठू शकतात हेही खरं आहे. कारण शेवटी काहीच खरं नाही तसं काही खोटंही नाही हेच खरं आहे.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s