एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)

भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत; हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो. या सर्व विधानांमध्ये काही विरोधाभास आहे असे आपल्याला वाटते का? त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे आणि म्हणूनच मी भारतीय आहे व या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही विधानेही सुसंगतच आहेत, हे मनाला स्पष्टपणे उमगायला हवे.

२० डिसेंबर २००९ या दिवशी लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_एकच अमोघ उपाय- मराठी एकजूट_Loksatta_201209

लेख आवडल्यास आपल्या मित्रांनासुद्धा अग्रेषित करावा.

ता०क० सर्वांच्या माहितीसाठी काही मुद्दे.

१. स्वतःबरोबरच घरातील सर्व मराठीप्रेमी सज्ञान (मतदानायोग्य वय असणार्‍या) मंडळींचीही नावे देऊन त्यांना मराठी एकजुटीत सभासद करून घ्यावे. मित्रमंडळी-सहकारी यांनाही सहभागी होण्यास सांगावे. जेवढ्या अधिक मराठीप्रेमींची एकजूट होईल तेवढी आपली शक्ती वाढेल.

२. संपर्कासाठी घरचा पत्ता, ई-मेल पत्ता (शक्य असल्यास) व चलध्वनी/दूरध्वनी क्रमांक अवश्य द्यावेत. पुरेसे मराठी बांधव उपलब्ध झाल्यास आपण मराठी एकजुटीचे स्थानिक संघसुद्धा सुरू करणार आहोत. त्यासाठी पत्ता आवश्यक आहे.

३. शक्यतो ई-मेल पत्तेसुद्धा कळवले तर संपर्क साधणे अधिक सुलभ होईल. शक्यतो आपला व्यक्तिगत ई-मेल पत्ता कळवावा. ई-मेलवर लक्ष ठेवावे.

४. वय, शिक्षण, व्यवसाय ही माहिती सक्तीची नाही पण ती समजल्यास आपण प्रत्येकाला योग्य असे काम/जबाबदारी ठरवू शकू.

५. ज्यांना अधिक जबाबदारी, पुढाकार घेण्याची इच्छा आहे अशांनी तसे कळवावे.

६. सर्व तपशील शक्यतो ई-मेलने marathi.ekajoot@gmail.com या ई-पत्त्यावर अन्यथा पत्राने ’मराठी एकजूट’, टपाल-पेटी क्रमांक १९२०, पुणे-४११०३८, या पत्त्यावर कळवावेत.

आभारी आहोत.

अमृतयात्री गट

ता०क० स्वभाषाभिमान याच विषयाशी संबंधित लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले श्री० सलील कुळकर्णी यांचे  खालील दोन लेखही अवश्य वाचा.

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

.

Tags: 

.

38 thoughts on “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)

    • प्रिय श्री० अभिजित नीलेगावकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सदिच्छेबद्दल आभार. “मराठी संस्कृती व भाषेचे संस्कार करण्यासाठी गावोगावी गल्लोगल्ली मुंबई पुण्यात सर्वत्र शाखा काढाव्यात.” पण केवळ पुण्या-मुंबईतच का? संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशातही मराठी एकजुटीच्या शाखा निघू देत. आपल्या सदिच्छेप्रमाणे तसे झाले तर मग आपल्याला मराठीला तिचे गतवैभव मिळवून देण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि तो आपला किंवा आमचा नाही तर आपल्या मायबोलीचाच विजय ठरेल.

      ता०क० आपल्या वाक्यातील रा०स्व०संघाचा उल्लेख आम्ही टाळला; कारण आज कोणाला संघाचे वावडे(ऍलर्जी!!) असते तर कोणाला शिवसेना-मनसेचे. कोणाला कॉंग्रेसचे तर कोणाला कम्युनिस्टांचे. आपण मराठी मंडळींनी आपल्या राजकीय आवडीबाजुला ठेऊन केवळ मराठी म्हणूनच एकत्र येऊया. कशाला नको त्या विषयावरून फुटीला आमंत्रण द्या?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. […] This post was mentioned on Twitter by abhijit vaidya, memarathi. memarathi said: एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकरà. http://bit.ly/82idCB […]

  2. सलील कुळकर्णी हार्दिक अभिनंदनं
    आपल्या प्रयत्नांमुळे मराठीचा अभिमान पुन्हा एकदा जाग्रुत होतो आहे.
    सर्वच थरातुन मिळालेल्या प्रतिक्रिया आपल्याला हेच दाखवून देत आहेत.
    परंतू यामुळेच आपली जबाबदारी कैक पटिने वाढली आहे.आपण जी एकजुट बांधत आहोत त्याला एक ठरावीक दिशा देणे आवश्यक आहे.कोणतेही आंदोलन हे अहिंसक मार्गाने अधिकाधिक प्रभावशाली ठरते हेच आपण आत्तापर्यंत पाहिले आहे.तसेच मराठीचा हट्ट धरतानाच सम्पुर्ण मराटी समाज विकसित होण्यासाठी कार्य करणे क्रमप्राप्त ठरते.त्यामुळे आपल्या ह्या उपक्रमाची व्याप्ती किती असेल याची कल्पना येईल.गेली ५० वर्षे झोपलेल्या समाजास जाग करण्याच कार्य आपण हाती घेतले आहे परंतु त्यात धैर्य ,सातत्य आणि एकजुट फारच मह्त्वाची आहे.आपला इतिहास पाहता भाउबंधकीनेच महाराष्ट्राचा घात केलेला आहे, त्यामुळे जात,पोट्जात,समाज,गरिब-श्रीमंत,वर्ण-सवर्ण सगळे भेदाभेद बाजुला ठेउन एकसंघ मराठी समाजाची नवी घडीच आपल्याला बसवायची आहे.त्या साठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.हे
    सर्व लिहिण्यामागे उपदेशाचे डोस देणे हा हेतु नसुन एक कल्पना यावी एवढाच आहे.

    • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आपले कथन म्हणजे उपदेशाचे डोस नसून पोट तिडिकीतून उमटणार्‍या भावना आहेत हे सर्वांनाच समजते. आपल्या पत्रात आपण ’आपण, आपली, आपल्या’ ही जी सर्वनामे वापरली आहेत ती आपणा सर्वच मराठी एकजुटीच्या वारकर्‍यांना लागू आहेत, नाही का? जय झाला तरी तो आपणा सर्वांचाच आणि पराजयही सर्वांचाच.

      इतर राज्यातील राजकारणी एवढे बेपर्वा नसतात कारण ते काही विशेष प्रामाणिक असतात म्हणून नव्हे तर त्यांच्यावर सामान्यजनांचा भाषा-संस्कृतीच्या बाबतीत तरी दबाव असतो. आपल्या राज्यातील राजकारण्यांना तो जाणवतच नाही कारण आपण फक्त (बंद खोल्यांत) त्यांच्या नावाने बोटे मोडतो आणि मग स्वतःच्या पोटापाण्याच्या कामाला लागतो. आपली पोटतिडिक इतरांपर्यंत पोचत नाही हेच मूलभूत कारण आहे.

      ’इंग्रजी भाषेचा विजय’ लेखाप्रमाणे इंग्रजी भाषेची स्थिती एवढी सुधारेल अशी किती इंग्रजांना आशा होती? स्वतःच्या भाषेला व परिस्थितीला दोष देऊन गप्प बसणे सोडून त्यांनी कृती करण्यास शासनाला भाग पाडले तेव्हाच तो मोठा बदल झाला. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, भारताचे स्वातंत्र्य, यासुद्धा एकेकाळी अशक्यप्राय घटनाच होत्या. पण त्या घडू शकल्या. आणि यापैकी प्रत्येक घटना ही अनेक सामान्य एकत्र आल्यानेच झाली. एका इंग्रजाने, एकट्या शिवाजी महाराजांना किंवा एकट्या गांधीजींनी अशा घटना घडवल्या नाहीत तर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जनसामान्यांनीच त्या घटना घडवल्या.

      आम्ही दिलेली उदाहरणे हास्यास्पद वाटतीलही. पण त्या घटना घडण्याच्या आधी तसे स्वप्नरंजन करण्याचे धारिष्ट्यही अनेकांना शक्य नव्हते.

      आता नकारात्मक विचार मनात न आणता आपण प्रत्येकाने यथाशक्ती कृती-सहाय्य-सूचना-पाठबळ अशा जमेल त्या कामास लागुया. आपण मराठी माणसे किंवा आपली भाषा कुठल्याही दृष्टीने नालायक, हिणकस, अक्षम, नाही एवढा आत्मविश्वास बाळगून जसे जमेल तसे पुढे जाण्याचा प्रयत्न करू.

      आपण मराठी एकजुटीसाठी नोंदणी केली नसल्यास ती ताबडतोब करावी, ही नम्र विनंती.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. आपल्या सर्व मराठीप्रेमी जागरुक मंडळींना माझे असे आवाहन आहे की एक्सिस बँकेच्या मराठीला दुर लोटण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी मी खालिल संदेश व्यवस्थापनाला पाठविला आहे, तरी आपण सर्वांनी किमान एक-एक तरी संदेश बँकेला पाठविला तर आणि तरच आपले मत व्यवस्थापनेला विचार करण्यास भाग पाडेल.यातुनच आपण आपली एकजुट दाखवू शकतो आणि मराठीचा वापर करण्यासाठी दबाव आणू शकतो.

    प्रति,
    सेक्रेटरी साहेब

    मी सुरेश जानु भागडे आपल्या बँकेचा ग्राहक आहे.सदर बँकेत व्यवहारासाठी लागणारी सर्व पावतीपुस्तके ईंग्रजी मध्ये आहेत, परंतु त्यामुळे कित्येक महाराष्ट्रियन ग्राहकांना व्यवहारात अडचणी येतात.कित्येकांना तर अगदी अनोळ्खी मणसांची मदत घ्यावी लागते त्यामुळे फ़सगत होण्याचा धोका संभवतो.
    मराठी ही महाराष्ट्राची राज्य भाषा असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व व्यवहारासाठी तिला प्राधान्य दिले पाहिजे,असे असताना सुध्दा आपल्या बँकेने मराठीचा ढळ्ढळीत अपमान चालवलेला आहे.

    ॠपा करुन आपण योग्य तो निर्णय घेवून कार्यालयीन व्यवहारात मराठीचा सन्मानाने समावेश करावा अन्यथा देशभरातील सर्व मराठी ग्राहक एक्सिस बँकेकडुन सेवा घेणे बंद करतील याची नोंद घ्यावी.

    आपला जागरुक ग्राहक

    सुरेश भागडे

    • प्रिय श्री० सुरेश भागडे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण उचललेले पाऊल स्तुत्यच आहे. त्याबद्दल अभिनंदन. सर्वच मराठीप्रेमी, स्वाभिमानी मंडळींना त्यापासून स्फूर्ती, उत्तेजन मिळेल यात शंकाच नाही. अशाच प्रकारचे व्यापक अभियान आपण ’मराठी+एकजूट’ या यात्रेद्वारे हातात घेऊ. ही कामे सामान्य मराठी माणसाने केल्याशिवाय होणारच नाहीत. पण एकदा जनसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर या विषयात रस, गांभीर्य दाखवले तर मग मात्र सर्व मंत्री, शासनकर्ते, राजकारणी, सामाजिक पुढारी इत्यादी खडबडून जागे होतील व जनसामान्यांच्या यात्रेत सहभागी होतील.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपण बहुसंख्येने एकजूट बांधली तर याविषयी काही सुधारणा घडू शकतील.

      आम्ही सर्व इथे मराठीतून थेट लिहू शकतो. प्रथम खर्ड्यावर मजकूर लिहून मग तो चिकटवण्याचा उद्योग करावाच लागत नाही.

      या अनुदिनीवरील सर्व सुविधा वर्डप्रेस यांनी पुरवलेल्या आहेत. इतर मोठ्या संस्थळावरील सोयी इथे देणे आम्हाला शक्य नाही. मोठ्या संकेतस्थळावर अधिक खर्च करून उपलब्ध केलेले सॉफ्टवेयर व सुविधा यांच्यापुढे आम्ही यःकश्चित माणसे आहोत. असो.

      बरेच वाचक आपले प्रतिमत (feedback) मराठीत देत आहेत. आपणही त्यासाठी बराहाचा उपयोग करू शकता. त्यासाठी कृपया याच अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचावा.

      आपण याचा जरूर फायदा करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांनाही मायबोलीत लिहिण्याचा आग्रह करा. वरील लेखाचा दुवा आपण मुक्तपणे अग्रेषित करू शकता. त्याने आपल्या मायबोलीच्या प्रसार संवर्धनास हातारच लागेल.

      आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला थोडी भीतीच वाटते. पण काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण स्वतःलाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणी आणि इतर संबंधितांशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच अशा आधुनिक मेघदूताशी आपण लवकरात लवकर संधान बांधायला हवे.

      शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे…. कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्I

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. आधी व्यवस्थापन मग software, cost accounting, coaching classes, सनदी सेवा व आता (राजकारण मार्गे) सामाजीक चळवळ; तंत्रविद्ऩ्यान सोडून कशाकशात घुसतायत हे IIT’ians! मराठी हितासाठी शिवसेना झगडून थकली. शिवसेनेसारखे या चळवळीचेही नंतर बाजारीकरण नाही झाले म्हणजे मिळवले.

    • प्रिय श्री० आर्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. आत्तापर्यंतच्या कटु अनुभवांमुळे मराठी माणूस संशयी, निराशावादी, झाला आहे; आणि ते तसे स्वाभाविकच आहे. पण तरीही कोणालाही प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा असेल तर करू दे. आपण पत्रकार असाल (ईंडिया टाईम्स?) तर आपण नक्कीच या बाबतीत खूपच करू शकतात. मराठीच्या इतिहासात अनेक थोर पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत केला. तसेच करण्याची आज वेळ आली आहे. मराठी माणसाला स्वभाषा व स्वसंस्कृतीप्रति असलेला न्यूनगंड, अनास्था, औदासिन्य टाकून द्यायला लावून स्वाभिमानाने व जिद्दीने ही परिस्थिती बदलण्याच्या मागे लागण्यास उद्युक्त करायला पाहिजे.

      आपण याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचलात का? नसल्यास अवश्य वाचा. निराशा थोडी कमी होईल, थोडा हुरूप वाटेल.

      आय०आय०टी० किंवा सी०ए०, पत्रकार किंवा चित्रकार, मायबोलीवर प्रेम करणार्‍या कोणीही मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस यांच्यासाठी आपापल्या परीने काम करावे. श्रीरामांसाठी जसा हजारो वानरांनी सेतु बांधला तसे करण्याचा प्रयत्न होऊ दे. त्यातून कोणी स्वार्थी निघाला तर काय करणार? आयुष्यात आपला अनेक वेळा विश्वासघात होत असतो. पण तरीही लहान-मोठ्या प्रमाणात आपण विश्वास ठेवतोच. विश्वासाशिवाय हा समाज, हे जग एक दिवस तरी चालेल असे आपल्याला वाटते का?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. मी गेली अनेक वर्षे संगणकावर मराठी मधूनच लिहितो आहे. सरकारी नोकरीत होतो तेंव्हा आय्लीप वापरत होतो. आता हे पत्र बरहामध्ये नोटप्याडवर लिहून तेथून येथे चिकटऊन पाठवत आहे. माझ्या ल्यापटापवर विंडोज विस्टा आहे.त्यावर मराठी लिहिता येत नाही. या विषयातील मी तज्ञ नाही.
    बरे येथे बरहाप्याड चा थेट कसा वापर करावयाचा ते मला समजून येत नाही.

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आम्ही सर्व बराहाच्या मदतीने एक्सेल, वर्डपॅड, ई-मेल्स, अशा सर्वच वाबतीत थेट मराठीत लिहितो. आपण याच अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचला का? कृपया तो लेख नीट वाचून त्यातील उदाहरणांचा स्वतः सराव करावा. काहीही अडचण आल्यास नि:संकोचपणे विचारावे. आपले मित्र मदत करतीलच.

      शिवाय आपल्या संगणकाचे सेटिंगही जाणकाराकडून तपासून घ्यावे.

      सप्रेम नमस्कार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. उद्या आपल्या अमृतमंथन अनुदिनीचे (blog) संकेतस्थळात रूपांतर करायचे ठरवले तर आपली सूचना निश्चितच उपयोगी ठरेल.

      सप्रेम नमस्कार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. arya says:
    मंगळवार, 29 डिसेंबर 2009 at 9:06 सकाळी

    आधी व्यवस्थापन मग software, cost accounting, coaching classes, सनदी सेवा व आता (राजकारण मार्गे) सामाजीक चळवळ; तंत्रविद्ऩ्यान सोडून कशाकशात घुसतायत हे IIT’ians! मराठी हितासाठी शिवसेना झगडून थकली. शिवसेनेसारखे या चळवळीचेही नंतर बाजारीकरण नाही झाले म्हणजे मिळवले.

    sujit
    मी सुद्धा या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. इ-मेल आणि पत्र व्यव्हारातुं संपर्क साधण्या पेक्षा सर्वाना एकत्र आणून समोर-समोर बोलून विश्वासात घेणे हे मला अधिक महत्वाचे वाटते. यातून मराठी प्रेम भावना कशी वाढणार आहे एकत्र येवून कोणता उद्देश साध्य करायचा आहे किंवा काय साध्य करता येइल हे समजवने, समजावून घेणे अधिक महत्वाचे. या सर्वमधुन मला फ़क्त शंका काढायचा नाहीत किंवा मराठीला विरोध ही करायचा नाही मी सुधा मराठी आहे, मी मराठीचा खुप आदर करतो परन्तु आज पर्यंतच्या खुप निर्माण झालेल्या मराठी संस्था आणि त्यानी बदलेली रुपे याचा विचार करता मराठी माणसाचा मराठी माणसा वरील विश्वास कमी होने साहजिक च आहे.

    तसेच अमृतयात्री हे आहे तरी काय आणि लेo सलिल कुलकर्णी ही व्यक्ति नेमकी कोणं आहे या सर्वांची ओलख होण हे सुधा मला तितकच गरजेच वाटत.
    सलिल कुलकर्णी सर आपल्या मराठी प्रेमा बद्दल खुप-खुप धन्यवाद व आपल्या सर्वाना नविन वर्श्याचा खुप-खुप शुभेच्छा.

    • प्रिय श्री० सुजित जाधव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व समस्त मित्रपरिवाराला नवीन वर्ष व त्यानंतरचा काळही सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो, ही देवाकडे प्रार्थना.

      आपले पत्र आम्हाला नीट समजले नाही असे वाटते. काही शंका.

      १. शिवसेनेची वाट आय०आय०टी०च्या अभियंत्यांनी लावली का?

      २. अभियंते, डॉक्टर, वकील, साहित्यिक, किंवा इतर कुठल्याही उच्चशिक्षितांनी समाजकारण किंवा राजकारणाकडे फिरकायचंच नाही का? ती सर्व क्षेत्रे अशिक्षित, अर्धशिक्षित, गुंड, इत्यादींसाठीच राखून ठेवायची का? गवळी, लालू, मुलायम, शिबू सोरेन ह्यांनाच आपण आदर्श मानायचं का?

      ३. प्रत्येक अशिक्षित हा मूर्ख किंवा देशविरोधी असतोच असे नाही. तीच गोष्ट सुशिक्षिताची. पण आज राज्य चालवण्यास शिक्षण, विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर देशात सर्व महत्त्वाच्या निर्णयांसाठी त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. आपल्याकडे मंत्रीच सर्व विद्यात पारंगत समजला जातो. तो सर्वांना उपदेश करतो. आणि एखादी तज्ज्ञ समिती नेमली व त्यांनी गैरसोयीचे मुद्दे मांडले तर त्यातून मंत्री लोक काहीनाकाही पळवाटा काढतात. नुकतेच घडलेले राम प्रधान समितीच्या अहवालाचे प्रकरण पहा. एक वर्ष झालं तरीही काहीच सुधारणा नाही.

      ४. स्वातंत्र्याच्या चळवळीपासूनच टिळक, सावरकर, आंबेडकर, गांधीजी, विनोबा, साने गुरूजी, अशी लाखो सुशिक्षित मंडळी समाजकारण व राजकारणात होती. त्यामुळे देशाचं भयंकर नुकसान झालं का? स्वातंत्र्यानंतरही यशवंतराव, डांगे, अत्रे, असे विद्वान त्या क्षेत्रांत होते. देशात महाराष्ट्राला मान होता. आणि आता स्वतः नापास होणारे शिक्षण महर्षी होतात. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली की अधोगती?

      ५. कृपया ’एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट’ हा लेख पुन्हा नीट वाचा. ’मी मराठी’ या एकमेव अस्मितेच्या मुद्द्यावर आपण एकत्र यायचं असंच आवाहन केलेलं आहे. इतर कुठलेही क्षुल्लक मुद्दे काढून वजाबाकीचं गणित करायचंच नाही. मराठी माणसाने दुहीमुळे, फुटीमुळे वेळोवेळी खूप नुकसान सोसले आहे. आता नवीन निकषांचे स्पृश्यास्पृश्यतेचे मुद्दे मनातून पूर्णपणे काढून टाकू व केवळ मराठी या एकाच तत्त्वावर एकजूट बांधू.

      लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
      जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
      धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
      एवढ्या जगात माय मानतो मराठी
      ————-
      आपण मराठी+एकजुटीवर नोंदणी केलीत का? म+१ साठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मदत घेऊ. पाहूया मराठी माणूस वैयक्तिक हेवेदावे, भेदभाव बाजूला ठेऊन कितपत एकी साधू शकतो. आपण मोठ्या संख्येने एकजूट साधली तर बरेच काही करू शकू. नाहीतर आहे तसेच चालणार, उलट अधिकाधिक भयंकर होत जाणार.

      असो. याउपर फुटीच्या मुद्द्यांवर चर्चा न करता एकी कशी साधायची ते पाहू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीरंग वि० जाधव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले पत्र वाचून फार आनंद झाला. आपण लवकरात लवकर प्रस्तुत लेखात सांगितल्याप्रमाणे ’मराठी+एकजूट’वर नोंदणी करावी ही विनंती.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • आदरणीय श्री० उपाध्ये गुरूजी यांसी,

      सप्रेम नमस्कार. आशीर्वाद असावा.

      जेजुरीच्या खंडेरायाला समस्त मराठीजनांतर्फे दंडवत.

      मराठी माणसाचा स्वतःबद्दलचा, स्वभाषेबद्दलचा, स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान वाढावा यासाठीच तर अमृतमंथन अल्पसा प्रयत्न करीत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे महाराष्ट्रात सांगून मराठीला टांग मारतात व आपण ते सर्वत्र चालवून घेतो. मराठी समाजात फारशी न दिसल्याने व न ऐकू आल्याने ती हिणकस, कमी दर्जाची भाषा असा तिच्यावर शिक्का बसतो व आपल्या मराठी मंडळींनासुद्धा त्याबद्दल न्यूनगंड वाटू लागतो. ते गणित निश्चयपूर्वक बदलायलाच हवे.

      हा लेख अधिकाधिक मराठी/अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. Koni maraathi baandhav Phaley/Bhaajyaa/Machhi/khaanyachya vastunwar prakriya karuoon Gothavun/Sheet Gruhaacha upayaog karun tyaa udyogat padaavaya tayaar asel tar mee madat karvayas tayar aahe..

    If any marathi can handle food preservation by freezing/ cold store and similar process and marketing the same I am prepared to assist and associate with him.

    • प्रिय श्री० प्रभाकर नेने यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले आवाहन आपल्या मराठी बांधवांच्या माहितीसाठी प्रकाशित केले आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. पुण्याच्या नुतन मराठी विद्यालय आणि भावे हायस्कूल सारख्या नामांकीत शाळांबद्द्ल ज्यांनी महाराष्ट्र आणि देशाला अनेक क्षेत्रांत अनेक ऊत्तूंग अशी व्यक्तिमत्वे दिली; माझ्या एका मित्राने परवा काढलेले खालील उद्गार ऐकून हसावं की रडावं हेच कळेनासं झालं..
    “अरे आजकाल नु.म.वि किंवा भावे हायस्कूल मध्ये ‘स्टॅंडर्ड पब्लिक’ नसतं. सगळी झोपडपट्टीवाली ‘साईडी’ मूलं असतात. त्यामूळे अशा ‘सबस्टॅंडर्ड’ ठिकाणी ‘पॅरेंट्स’ आपल्या मुलांना का टाकतील? त्यापेक्षा सिंबायोसिस, स्प्रिंगडेल, पवार इंटरनॅशनल स्कूल अशा ‘स्कूल्स’मध्ये आय.सी.एस.सी आणि इंटरनॅशनल लेव्हलचं ‘सिलॅबस’ असतं.. तिथे ५०००० रूपये फी भरणे ‘वर्थ’ आहे..!!”

    आता बोला.. याला आमच्या पिढीचा पैशांचा माज म्हणायचा, की राजकारण्यांची मराठी शाळांना परवानगी न देण्याची धोरणात्मक दिवाळखोरी, की पाश्चिमात्य चंगळवादामूळे आपल्या शहरी मराठी समाजाला आलेलं ‘इंग्रजी’ बाळसं??

    -अभिजीत आष्टीकर.
    _______________________________________________

    वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या : –

    ‘दूरदर्शन सह्याद्री’ सोडल्यास इतर सगळ्या वाहिन्यांकडून बातम्या सांगताना आणि खाली बातम्या छापताना मराठी व्याकरणाच्या अगणित चूका असतात. झाली होती, केली होती, याऐवजी ‘झालेली’ ‘केलेली’ असे शब्द वापरेले जातात. ‘सवाल’ ‘वर्दी’ ‘फैसला’ यांसारखे शब्द आणि गरज नसताना वाक्यांमद्ये इंग्रजी शब्द पेरण्यामागे काय प्रयोजन आहे? प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना त्यांच्या वृत्तपत्रांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर ‘प्रमाण’ भाषा वापरावी, बोलीभाषा नव्हे. लोक अजूनही ‘दूरदर्शन च्या ७ च्या बातम्या’ का बघतात याचा सर्व वृत्तसमालोचकांनी एकदा विचार करावा. आपणच आपल्या भाषेला मान दिला नाही तर इतरांकडून याची अपेक्षा का ठेवावी?

    • प्रिय श्री अभिजित आष्टीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे.

      {{आता बोला.. याला आमच्या पिढीचा पैशांचा माज म्हणायचा, की राजकारण्यांची मराठी शाळांना परवानगी न देण्याची धोरणात्मक दिवाळखोरी, की पाश्चिमात्य चंगळवादामूळे आपल्या शहरी मराठी समाजाला आलेलं ‘इंग्रजी’ बाळसं??}}

      मराठी माणसाच्या दुर्दैवाने हे सर्वच, शिवाय आणखीही काही घटक. अशा मुद्द्यांबद्दल प्रा० मनोहर राईलकर (नूमवि व स०प० महाविद्यालय) ह्यांनी लिहिलेले काही उत्तम लेख आपल्या या अमृतमंथन अनुदिनीवर प्रकाशित केलेले आहेत. आपण अवश्य वाचा व इतर समविचारी मित्रांसही अवश्य वाचायला द्या.

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/19/खरंच-आपण-स्वतंत्र-झालो-आह/

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/

      हे लेख देखील पहा.

      Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

      Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

      —————-

      {{वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या}}

      ह्यांच्याबद्दल काय बोलणार? पूर्वी मराठी वृत्तपत्रांनी जनतेला स्वदेश व स्वभाषा यांच्याबद्दलच्या अभिमानाचे बाळकडू दिले तर आजची वर्तमानपत्रे अगदी त्याविरुद्ध कृती करीत आहेत. दूरचित्रवाणीच्या इतर वाहिन्या एकवेळ परवडल्या अशाप्रकारे वृत्तवाहिन्या मोकाट सुटल्या आहेत. मराठी बोलताना अधिकाधिक इंग्रजी व हिंदी शब्द वापरण्यात त्यांना धन्यता वाटते व स्वच्छ मराठी बोलणे हे अडाणीपणाचे लक्षण वाटते. प्रिन्सिपल कॉरस्पॉंण्डण्ट, ब्यूरो चीफ, सिनियर एडिटर असल्या पदव्या स्वतःहून स्वतःला लावून घेतल्या की आपण केंब्रिज-ऑक्स्फर्डमधूनच वृत्तपत्रकारिता/राज्यशास्त्र (सोप्या मराठीत जर्नॅलिझम/पोलिटिकल सायन्स) या विषयांत पारंगत झालो आहोत असे त्यांना वाटते.

      सह्याद्री वाहिनीवर इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे ’ब्रेकिंग न्यूज’ व ’ब्रेक’ यांच्या घोषणांचा सतत मारा चालू नसतो. बातम्या अधिक विश्वसनीय असतात व भाषा कितीतरी अधिक चांगली असते. त्यामुळे इतर आस्थापनेच्या व आर्थिक चणचणीमुळे दिसणार्‍या त्रुटी लक्षात घेऊनही आम्ही देखील आवर्जून त्या वाहिनीवरील बातम्या पाहतो. त्यानंतर मी मराठी, ई टीव्ही, इत्यादी वाहिन्या देखील वृत्तासाठी वृत्तवाहिन्यांपेक्षा अधिक विश्वसनीय वाटतात.

      मध्यंतरी कडोंमपा निवडणूकीच्या बलाबलाबद्दलच्या बातम्या निकालाच्या दुसर्‍या दिवशीही ब्रेकिंग न्यूज म्हणून वृत्तवाहिनीवरून फेकल्या जात होत्या.

      {{प्रसारमाध्यमांनी बातम्या देताना त्यांच्या वृत्तपत्रांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर ‘प्रमाण’ भाषा वापरावी, बोलीभाषा नव्हे.}}

      मराठीत योग्य शब्द असतानाही अयोग्य, अनावश्यक हिंदी किंवा इंग्रजी शब्द किंवा तशी धाटणी वापरली तर ती मराठीची बोलीभाषा नव्हेच. ती अशुद्ध भाषाच आहे. मराठी कार्यक्रमात बोलताना वाक्यातील दहा शब्दांपैकी आठ शब्द इंग्रजीमधील बोलणार्‍या पल्लवी जोशीची भाषा ही मराठीची बोली भाषा म्हणाल की इंग्रजीची? कोकणीत ज्याला “आईस ना बापूस” म्हणतात तसाच तो धेडगुजरी प्रकार म्हणायचा.

      {{आपणच आपल्या भाषेला मान दिला नाही तर इतरांकडून याची अपेक्षा का ठेवावी?}}

      मराठी माणसाच्या सर्व समस्यांचे मूळ या विधानात आहे. ह्याचे विश्लेषण खालील लेखात केले आहे. इतर वाचकांनीही आवर्जून वाचून पाहावे.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० दत्तात्रेय किरकिरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अमृतमंथनावर प्रत्येक मराठीप्रेमीचे आनंदाने स्वागत.

      ही अनुदिनी (ब्लॉग) वर्डप्रेसने बनवलेली आहे. त्यात त्यांनी दिलेल्या सुविधा वापराव्या लागतात. खाजगी संकेतस्थळांप्रमाणे मराठी टंकनाची थेट सोय देता येत नाही. पण आपण त्यासाठी इनस्क्रिप्ट, बराहा किंवा इतर कुठलेही योग्य सॉफ्टवेअर वापरून मराठीत लिहू शकता. त्यासाठी खालील लेख पहावेत.

      संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –} http://wp.me/pzBjo-2d

      संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती –} http://wp.me/pzBjo-Aw

      कुठलीही शंका/अडचण असल्यास अवश्य सांगा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० भगवत मोरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल व शुभेच्छांच्याबद्दल आभार.

      दोन-चार मराठी माणसांनी काहीतरी करून मराठी समोरील प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी एक चळवळच उभी राहिली पाहिजे. तुम्ही-आम्ही आपले समविचारी मित्र, अशा सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषा व मराठी संस्कृतीच्या जोपासना व संवर्धनासाठी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर काम केले पाहिजे. तसेच शासनावर दबाव आणून अनेक उपयुक्त गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत.

      खाली अमृतमंथनावरील काही लेखांचे दुवे खाली दिलेले आहेत. सवड काढून अवश्य वाचा. आपले प्रतिमत (feedback) आपण लेखाखाली नोंदवू शकता.

      लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले काही लेख.

      इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –}  http://wp.me/pzBjo-8x  

      हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W  

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/ http://wp.me/pzBjo-e8

      एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8  
       
      क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११) –}  http://wp.me/pzBjo-DI  

      अंतर्नाद मासिकात प्रसिद्ध झालेले काही लेख.

      हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) –}  http://wp.me/pzBjo-BF  

      मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी) –}  http://wp.me/pzBjo-Kp  

      आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख) — }  http://wp.me/pzBjo-Iv  

      अमृतमंथनावरील इतर काही लेख.

      Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8  

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/22/’मणभर-कर्तृत्वाचा-कणभर-द/

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/31/जगाची-भाषा-आणि-आपण-ले०-सुध/

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/31/महाराष्ट्राच्या-सुजाण-जन/

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/27/मराठीचा-उत्कर्ष-कसा-कराव/

      Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/मातृभाषेचं-मानवी-जीवनातल/

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/

      “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…” या विषयावरील लेख, चर्चा व विचारमंथनासाठी “अमृतमंथन” या अनुदिनीवरील लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
      https://amrutmanthan.wordpress.com/

      आपले घोषवाक्य आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

      मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. मराठी माणसाचा ’स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा’ हा गैरसमज दूर करून त्याचा न्यूनगंड नाहीसा करण्याचा हा प्रयत्न आहे.

      आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान या भावनांचा सतत प्रसार करीत राहिले पाहिजे.

      अमृतमंथनावर असे इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. अमृतमंथन परिवाराच्या संस्कृतीत बसणार्या अधिकाधिक लोकांना जवळ आणणे, त्यांची एकजूट घडवणे हा आपल्या चळवळीचा एक उद्देश आहेच.

      मराठीच्या उत्कर्षासाठी आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहून यथाशक्ती, यथाशक्य प्रयत्न करीत राहू.

      क०लो०अ०

      ता०क० अमृतमंथनावरील नवीन लेखांबद्दल नियमितपणे माहिती मिळवण्यासाठी आपण मुखपृष्ठावरील Follow या सुविधेचा उपयोग करू शकता. 

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.