मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन)

ज्ञानभाषा प्रकाशन या नावाने विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकीय-संगणक-व्यवस्थापन अशा अनेक विद्याशाखांची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्याचा विचार आहे.  इ.११ वीची गरभौजी (गणित, रसायन, भौतिक, जीव) गटाच्या अभ्यासक्रमांना आवश्यक अशी सुमारे २५० पानांची दोन संयुक्त पुस्तके सुरूवातीला प्रकाशित होतील. या पुस्तकांची पहिली आवृत्ती २००० प्रतींची असेल.

१९७७ पासून ११ वी-१२ वी विज्ञान परीक्षा मराठीतून देण्याची परवानगी महाराष्ट्रात असली तरी याची माहिती सर्व मुलांना कोणीही कधीच मनापासून दिली नाही. स्वभाषेत शिकण्याची सोय असूनही या विषयांची मराठी पुस्तके नाहीत म्हणून चाळीस वर्षे  सोयीचा लाभ घेता आला नाही. सुरूवातीला विद्यार्थी ही पुस्तके मोठ्या प्रमाणात विकत घेणार नाहीत तरीही ती त्यांच्यापर्यंत पोचावीत, म्हणून पहिली दोन पुस्तके मराठीप्रेमी नागरिकांच्या आर्थिक सहाय्याने तयार करून विनामूल्य वितरण करावे, असा विचार आहे.

या पुस्तकाच्या प्रत्येक पानासाठी १००० रू. अर्थसहाय्य हवे आहे.

पुस्तकाच्या सुरूवातीला अर्थसहाय्य देणार्‍यांची यादी असेल. (उदा.पान १ ते १० – साई मोटार स्कूल पुणे.) साई मोटारसह सत्येन जोशी, संजय भगत, नितीन देशपांडे, संजय गोडबोले ही प्रथम पुढे आलेल्या काही सहाय्यकर्त्यांची नावे आहेत. अधिकाधिक मराठीप्रेमींनी १००० रू.पासून हजाराच्या पटीत रक्कम या प्रकल्पासाठी द्यावी, अशी विनंती.  पुरेसे अर्थसहाय्य मिळाल्यास पहिल्या आवृत्तीचे विनामूल्य वितरण केले जाईल, अन्यथा अर्थसहाय्याच्या प्रमाणात पुस्तके सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना विकत दिली जातील.

ज्ञानभाषा हे नाव ‘मराठी ज्ञानभाषा आहे’ हे सूचित करण्यासाठी वापरले असून याबाबतचा आर्थिक व्यवहार माझ्या मालकीच्या ‘आकांक्षा’ उद्योग या खाजगी संस्थेतर्फे होईल, याची कृपया आर्थिक सहाय्य देणार्‍यांनी नोंद घ्यावी, ही विनंती. याशिवाय याहून अधिक पुस्तके खरेदी करून स्वतंत्रपणे वाटप करण्यासाठी ही पुस्तके कमी किंमतीत उपलब्ध केली जातील. महाविद्यालये, शाळा, संस्था, पक्ष, संघटना, यांनी मराठी पुस्तकांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, ही विनंती.

कळावे, आपला नम्र,

अनिल गोरे उर्फ मराठीकाका

वि-पत्ता: marathikaka@gmail.com

‘आकांक्षा’ उद्योग, अ-११२, बाळाजी प्रासाद, भ्रमणध्वनी ९४२२००१६७१ ४७१, शनिवार पेठ, पुणे-४११०३०.

ता.क. हे आवाहन वाचणार्‍यांनी कृपया विद्यार्थी आणि दानशूर व्यक्ती अशा दोन्ही घटकांपर्यंत ते जमेल त्या मार्गाने- फलक, पत्रक, तोंडी निवेदन, संगणकीय विरोप, भ्र.संदेश, वृत्तपत्रातून इ प्रकारे पोचवावे, ही विनंती.

————-

मराठी माध्यमातून उच्चशिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ज्ञानभाषा प्रकाशनाद्वारा उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व मराठीप्रेमींना यथाशक्ती मदतीचे आवाहन.

– अमृतयात्री गट

.

5 thoughts on “मराठीतून महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी पुस्तके – मदतीसाठी आवाहन (ज्ञानभाषा प्रकाशन)

  • प्रिय श्री० अनिल गोरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आभारी आहे.

   श्री० विश्वास देशमुख यांनी केलेली सूचना व दिलेली माहिती महत्त्वाची आहे. ज्ञानभाषा प्रकाशनाने त्याची नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. The idea is good but please check up which books have been already published. For example I had seen one well written book in Marathi on Railway Engineering authored by a professor in coEP. Some books were written & printed by some organisation of Maharastra Govt with a grant of some 100 crores it received from Central Govt.I believe the books were finally destroyed for want of buyers but I am sure at least a few copies must have been preserved by Maharastra Govt.

  • प्रिय श्री० विश्वासराव देशमुख यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली सूचना व आपण दिलेली माहिती ही महत्त्वाची आहे. ज्ञानभाषा प्रकाशनाने त्याची नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s