शासकीय पाठ्यपुस्तक आणि मी (ले० सुभाष भेंडे)

गड्या आपुला गाव बराहे माझ्या अमेरिका भेटीवर आधारलेलं प्रवासवर्णन. अमेरिकेत आज सुबत्ता आहे, सुखाची रेलचेल आहे. परंतु काही बाबतीत त्या देशात अध:पतन कसं चालू आहे याविषयी सारांशरूपानं लिहिलं होतं. त्याचा समावेश बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी झाला…

आपल्या राज्यशासनाचा रुक्ष, नीरस, चाकोरीबद्ध कारभार चालवताना नोकरशहा मंडळी कधीकधी नकळत विनोद निर्माण करीत असतात. मात्र एकीकडे त्यांच्या रूक्ष व संकुचित वृत्तीमुळे होणारा त्रास व दुसरीकडे त्यांच्या उथळ व निर्बुद्ध वागण्यामुळे उद्भवणारा प्रासंगिक विनोद ह्यामध्ये सापडलेल्या सामान्य माणसाला “हसू की रडू” असे होऊन जाते.

महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला श्री० सुभाष भेंडे यांचा हा लेख आपले मित्र सुशांत देवळेकर व विजय पाध्ये यांनी पाठवला होता. संपूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.

अमृतमंथन_शासकीय पाठ्यपुस्तक आणि मी_ले० सुभाष भेंडे_100604

.

आपले अभिप्राय लेखाखाली अवश्य नोंदवा.

.

– अमृतयात्री गट

.

17 thoughts on “शासकीय पाठ्यपुस्तक आणि मी (ले० सुभाष भेंडे)

    • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आमच्या मते केवळ विनोद हाच ह्या कहाणीचा स्थायीभाव नव्हे. सरकारी लोकांचा कावेबाजपणा, कायद्याची भीती दाखवून सामान्य नागरिकास घाबरवणे व आपली चूक किंवा मूर्खपणा झाकून घेणे, आपली चूक असताना ती दुरुस्त करण्याऐवजी समोरच्याला ती तशी आहे म्हणूनच तू वाचलास असा उपकार केल्याचा आव आणणे हे सर्व सरकारी नोकरांचे लाक्षणिक (टिपिकल) गुणही ह्या प्रसंगातून उघड होतात.

      म्हणूनच ही एक केवळ विनोदी कथा नसून त्यातील विनोदी पात्राच्या भूमिकेला खलनायकी झाकही आहेच.

      आपल्याला काय वाटते?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • हा मुर्खपणा जो केला तो निश्चितच जाणूनबुजून केलेला आहे. दोनच शब्द गाळणं, आणि त्याला कारण पण असं दिलंय की म्हणे अमेरिकेशी संबंध दुरावतील. अशी कारणं केवळ विनोदी कथांमधेच विनोद निर्मिती साठी वापरेली वाचण्यात आली होती. आज प्रत्यक्ष पाहिले.

        तुमचा लेख काढून टाकू म्हणून दिलेली धमकी पण एक प्रकारे ब्लॅकमेलिंग आहे .हे स्टेटमेंट पण असं आहे की जसे काही पुस्तक १२वीच्या अभ्यासक्रमातून काढले तर श्री सुभाष भेंडे रस्त्यावर येतील. बाबूगिरीचा एक नमूना आहे हा. लाललफितशाही म्हणा हवं तर!

        • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          अगदी बरोबर बोललात. विनोदाबरोबरच आपण नोंदलेले हे इतर पैलूदेखील वाचकांच्या लक्षात यावे म्हणूनच हा लेख इथे प्रसिद्ध केला.

          अशा सर्व शासनव्यवस्थेला आपण लोकशाही कितपत म्हणू शकतो याबद्दल आम्हाला शंकाच वाटते. सत्याग्रहाचा, सत्याचा आग्रह धरण्याचा इंग्रजांवर जेवढा परिणाम झाला तेवढादेखील आपल्या स्वतंत्र भारतातील लोकशाही सरकारावर होत नाही, हेच मोठे दुःख आहे.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  1. शासकिय कारभाराचा विजय असो!

    आहो हा असलाच बिनडोकपणा सध्याच्या शिक्षणशास्त्र (बी एड) महाविद्यालयांमध्ये चालतो. म्हणजे शिक्षक तयार होतानाच या मुशीतून काढले जातात. भावना दुखावणे इ. गोष्टींचे तर जागोजागी तण माजलेले आहे. “तर्कशुध्द विचार करणे” या गोष्टीचे अस्तित्त्व संपले आहे.

    वरील सुध्दा एक खूप मोठा विनोद आहे. संभाजी ब्रिगेड वाले पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत मधुन मधुन असले विनोद करत असतात. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे म्हणत त्यांच्याच नावाने जातीयवाद करून ब्राह्मणांचा द्वेष करणे.

    • प्रिय सौ० अपर्णा लळिंगकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      खरंच आहे. सरकारी कार्यालयात असे अनेक विनोद घडत असले तरी त्याची शिक्षा कुणा दुसर्‍यालाच होत असते. म्हणूनच श्री० महेंद्र ह्यांना लिहिलेल्या उत्तरात विनोदाबरोबरच सरकारी नोकरांच्या इतर व्यवच्छेदक गुणांचाही उल्लेख केला आहे, खरं म्हणजे ते निरीक्षण मूळ लेखामध्येच घालायला हवे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. हे मात्रं अगदी खरं आहे की सरकारी नोकरीतील लोक हे राजकारणी लोकांच्या हाताखाली काम करून इतके कावेबाज झाले आहेत की त्यांना आपण नक्की कोणत्या कामाचे पैसे घेतो (वेतन) हेच लक्षात राहीलेले नाही.

    माझ्या म्हणण्याचा अर्थ हा पूर्ण पणे उपरोधिक आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था म्हणजे “स्वत: तर्कशुध्द विचार न करणे” आणि विद्यार्थ्यांना शक्य तेव्हढ्या लहान वयापासून पोपट पंची करायला शिकवणे येव्हढंच करते आहे. खरं तर त्या दोन तीन शब्दांनी असे कोणते अमेरिकन लोक दुखावले जाणार होत? जसे काही यांची १२ वीची मराठी विषयाची पुस्तके व्हाइट हाऊस च्या ग्रंथालयात संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात…..परराष्ट्र खात्याच्या मंत्र्यांकडून…..ते मराठीचं पुस्तक बारावीतील सगळ्या मराठी विषय घेतलेल्या मुलांनी जरी वाचलं तरी खूप झालं. खरंतर त्या धड्याचा विषय असा होता की त्या शब्दांशिवाय देखिल मराठीच्या शिक्षकांनी वर्गातील मुलांमध्ये त्याविषयावर चर्चा घडवुन आणायला हवी होती. मुलांना त्यांचा मूळ लेख शोधून काढून तो लेख वाचायला आणि त्यावर चर्चा करण्यास उद्युक्त करावयास हवं होतं.
    मुख्य म्हणजे लेखकांनी तसं त्यांना ठणकावून सांगायला हवं होतं. किमान ज्या मुलांनी त्यांना प्रश्न विचारला होता, ती मुलं नक्कीच अधिक जागरूक आहेत हे सत्य स्विकारून त्यांना मूळ लेखाच्या छायाप्रति लेखकाने पोस्टाने पाठवायला काहीच हरकत नव्हती. म्हणजे पहिल्यामुलाला काहीच उत्तर न देणे आणि दोन वर्षांनी त्याच्या भावाने विचारलेल्या प्रश्नाला एका वाक्यात ‘काहीही म्हणू नये, चूप बसावे’ असे नकारात्मक उत्तर पाठवून आपली शासकिय व्यवस्थेपुढची आगतिकता प्रदर्शित करायला नको होती. पहिल्याच मुलाला जर लेखक महाशयां कडून चार कौतुकाचे शब्द आणि मूळ लेखाची छायाप्रत गेली असती तर १) त्याच्या भावाने तोच प्रश्न विचारला नसता. २) त्यामुलाला खूप आनंद आणि अप्रुप वाटलं असतं. आणि त्याला त्यातून प्रेरणा मिळाली असती.

    मला लेखकाने दिलेले प्रतिसाद आजीबात पटले नाहीत. तसेच महाविद्यालयातील भाषा विषय शिकवणारे शिक्षक मुलांना भाषा शिकवतात म्हणजे नक्की काय करतात हा एक मोठा प्रश्नच आहे?

    • प्रिय सौ० अपर्णा लळिंगकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले सर्वच मुद्दे योग्य आहेत. खरं म्हणजे ते आदर्श आहेत. आणि भारतातील आजची आपली लोकशाही ही कुठल्याही आदर्शवादाचे मुळातच खच्चीकरण करण्यास तत्पर असते. अभय बंग, अण्णा हजारे यांच्या सारखे अगदीच मोजके समाजकारणी सोडले तर तुम्हा-आम्हासारख्यांना अशा मस्तवाल नोकरशाही व त्यांच्यावर तसे संस्कार करणारी माजखोर मंत्री मंडळी ह्यांच्याशी टक्कर देण्याच्या बाबतीत बर्‍याच मर्यादा आड येतात. अर्थात हे सर्व सहन करूनही काही लोक त्यासाठी तन, मन, धन खर्च करतात. पण असे फारच थोडके. माणूस म्हणून मराठी लेखक हे सर्वसामान्य पांढरपेशा मध्यमवर्गीय मराठी मंडळींप्रमाणेच. पूर्वीच्या काळाप्रमाणे आजकालचे लेखक हे समाजाला मार्ग दाखवणारे धुरिण वगैरे नसतातच. आणीबाणीच्या काळातही अगदी हाताच्या बोटांनी मोजण्याएवढ्या साहित्यिकांनी शासनाचा निषेध केला. आणि त्यानंतर तीस वर्षांनी आजची परिस्थिती आणखीनच खालावली आहे. आज “सत्यमेव जयते” असे बोधवाक्य असणार्‍या भारतात सत्याला कोण महत्त्व देतो? आणि सत्याचा पाठपुरावा करणार्‍याचा सतीश शेट्टी होतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. majedar vaaTale.’Gadya aapula gaav baraa’ pustak vaachaayachee iccha aahe. nakkeech majedar asel. kuThe miLel krupaya kaLavave.
    ya hasyatun adhoon madhoon svatah baddal, aaplya deshabaddal keev nirmaaN hotey.aapaN amerikela bheeto, Cheen la bheeto (dalai lama baddal kuNi kahi lihile tar ashich kahi pratikriya sadhya pahayala miLel),ajoon hi kityekaanna bheeto (tasleema prakaraN ityadi). ha fakt nokarshah manDaLichach naahi, sabandh deshaa chya durdaivaacha prashna aahe.

    • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले दोन्ही मुद्दे पटले.

      १. पुस्तकाच्या उपलब्धतेबद्दल कल्पना नाही. पण सुभाष भेंडेंचे पुस्तक सहज उपलब्ध असावे. मुंबै-पुण्यात तरी नक्की.

      २. आपण मांडलेला हा मुद्दा तर फारच मूलभूत व अत्यंत महत्त्वाचा आहे. पण आपण नुसताच दुर्दैवाला दोष देऊन उपयोग नाही. ह्या सर्वामागे भारतीयांचा हरवलेला आत्मविश्वास, पूर्वजेत्यांच्या बद्दल अजुनही वाटणारा धाक व दास्यवृत्ती, स्वतःबद्दलचा न्यूनगंड अशी सर्व कारणे आहेत. चीन तर सोडा. पण २६/११ नंतर पाकिस्तानला दिलेल्या विविध धमक्यांचे काय झाले. चीन, इस्रायल, जपान, किंवा इतर कुठल्याही स्वाभिमानी देशाची कृती अशा गंभीर घटनेनंतर अशीच असती काय? बळी तो कान पिळी आणि भित्यापाठी ब्रह्मराक्षस, दुसरे काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. kharey. durdaivaala dosh deoon haatavar haat dharun basoo naye. tasech nokarshaah manDaLee la athavaa sarkaar la dosh deoon fakt saantvana hotey, upachaar naahi.
    saantvana karoon gheNyaachi savay jhaleli aahe bhaarataalaa. BhopaL cha bhopaLaa karNaarya union carbide viruddh punhaa khaTlaa bharaayla tayyaar naahi amerika, paN ‘weapons of mass destruction’ baLagNyaachya kevaL sanshayaa varoon yuddh karoo shakate. asalee ‘chemical Ali’ koN? bhitya paaThee brahma raakshas? bhogale temvha tuTale saahas!
    nokarshahee kaDoon moorkhapNachee mhaNaje Dokan na vaaparNyaacheech apeksha asate sarkaar la. nasate, binDok raajkaaraNaache aadhipatya raahaNaar kase? ha aaplya ghaTanecha praadurbhaav. ghaTane baabat tark kelyaas raajadrohi karaar hoNyaachi sambhavana asate (naanee paalkhivaala vagaLata). mhaNoon nokarshah pachat nasel tari khaat raahataat. ya shivaay kay karNaar? tar baaraavee paasoonach bhyaayche prashikhaN nako ka dyaayala?

    • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले मुद्दे पटण्याजोगे आहेत.

      आपण नियमितपणे मराठी लेखांविषयी आपुलकीने लिहित आहात. म्हणून आपल्याला एकच नम्र विनंती करू इच्छितो. आपण यूनिकोडाधारित मराठी-देवनागरीमध्ये का लिहित नाही? म्हणजे आपले विचार वाचण्यास, समजून घेण्यास सहज, सोपे ठरतील.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. नमस्कार,
    आपुले अगदी पटले। या पुढे असेच करायचे प्रयत्न करीन। झालेल्या तकलीफ बद्दल खेद. अमृतमंथन हे खूप चांगले नाव निवडले आपण. आपुले कार्य सार्थक होवो, तसेच आम्हाला असाच लाभ होत राहो.
    जास्त चिंतन केल्याने मजा सजा होते। या पुढे गमतीदार गोष्टींत आरोप/ प्रत्यारोप/ स्पष्टीकरण न करता फ़क्त मजा घेऊ या.
    -आपुला अमृतसहयात्री.

    • प्रिय श्री० भास्कर भट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      गैरसमज न करून घेता आमची विनंती मान्य केल्याबद्दल आभारी आहोत.

      प्रस्तुत घटनेचे वर्णन करताना लेखकाने जरी ती विनोदी शैलीत आपल्या समोर मांडली आहे; तरी त्या विनोदाला असलेली अक्षमता, बजबजपुरी, दादागिरी अशा शासकीय नोकरशाहीच्या गुणांची झालर आपण नजरेआड करता येणार नाही. स्वतः लेखकाला देखील तसे अभिप्रेत नसावे. त्यालाही हे गुण अधोरेखित करायचे आहेत असे वाटते.

      आपले स्वेच्छेने, आनंदाने स्वीकारलेले अमृतसहयात्री हे बिरूद फार आवडले, हृदयाला स्पर्शून गेले. आपल्या अमृतयात्रेच्या वारीमध्ये आपण सर्वच सहयात्री एकमेकांचा हात धरून ही यात्रा सफल करण्याचा सतत प्रयत्न करू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. Shantiusdha yaani manadalele mudde na patanaare asecha aahet.Mulanaa zeraox prat patahavun dili asati tar tyanche shanka nirasan jhale asate he jari khare asale tari tyane mul prashna sutala nasatach. Bhende Mahodayana pudhe jo anubhav shasakiy yantranekadun milala to yethe jaast mahatwacha aahe. Ugicha Bhende yanchevar tondasukha ghenyat kaay artha aahe? Shasakiy Nokaradar manadali kiti aani kashi halakat asatat yaacha anubhava gheun pahaa mhanaje kalela ase sanagavse vatatay.
    Tyaani sambandhitashi patravayavahar kelaa mhanun he saare samajale, anyatha sagala guladastacha raahile asate.
    [Mi sadya NY-USA t aahe. ya sanaganakavar mi devanagari lihu/vachu shakat naahi.Agadi unikod suddha. Aso.

    • प्रिय श्री० पुरुषोत्तमराव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे पटते. श्री० सुभाष भेंडे किती जणांना छायाप्रती पाठवून शासनाच्या पापांचे क्षालन करीत बसणार? थोड्या अश्लाघ्य शब्दांत म्हणजे शासनाने करून ठेवलेली राड ते व्यक्तिशः कितपत स्वच्छ करू शकणार? (शासनाच्या निर्लज्ज आणि बेदरकार स्वभावाबद्दलच्या आणि उलट सामान्य पापभीरू जनतेला छळण्याची धमकी देण्याच्या वृत्तीबद्दल वाटणार्‍या तीव्र संतापाच्या भावना याहूनही अश्लाघ्य शब्दांत मांडाव्याशा वाटतात. पण आवरतो.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

Leave a reply to अमृतयात्री उत्तर रद्द करा.