स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी

सुमारे १४ वर्षांपूर्वी कविवर्य कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता प्रसिद्ध झाली होती. सर्व मराठीजनांच्या पुनर्स्मरणार्थ ती ह्या अनुदिनीवर पुन्हा सर्वांसमोर ठेवावी असा विचार करीत असतानाच आपले आणखी एक अत्यंत स्वाभिमानी मराठीप्रेमी मित्र सुशांत देवळेकर ह्यांनी कुसुमाग्रजांच्या त्याच कवितेचे सद्यकालानुरूप केलेले ‘स्वातंत्र्यदेवीची समजावणी’ हे पुनर्लेखन वाचनात आले. आता दोन्ही कविता समांतरच प्रसिद्ध करीत आहोत.

Read More »

’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)

सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. नुकतीच श्रीनिवास नार्वेकर या आपल्या रसिक मित्राने पाठवली. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्‍यात वळचणीला पडलेल्या जुन्या सुखद आठवणींच्या वरची धूळ झटकली जाऊन त्या आठवणींच्या उबेने मन काही क्षणापुरते का होईना पण पुन्हा टवटवीत होते व आयुष्याचे काही क्षण अत्यंत स्वर्गीय आनंदात जातात.

असा आनंद वाटत फिरणार्‍या मित्राचे आभार कसे मानायचे?

कविता खालील दुव्यावर वाचा. भविष्यकाळातही जेव्हा मनाचा तो नाजुक कोपरा उघडून पहावासा वाटेल तेव्हा पुन्हा वाचा. त्यामुळे जाग्या होणार्‍या आठवणींमुळे स्वतःचे सांत्वन करता येईल की – “देवाने आपल्यावर केवळ अन्यायच नाही केला.”

अमृतमंथन_मनातल्या मनात मी_कवि सुरेश भट

.

आपल्या प्रतिक्रिया, भावना, रसग्रहणे, निरूपणे, अभिप्राय, लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. सर्वच रसिकमित्रांबरोबर तो आनंद वाटून घेऊ.

– अमृतयात्री गट

.

’अखेर कमाई’ (कवी कुसुमाग्रज)

मनाला उबग आणणार्‍या महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ’अखेर कमाई’ या कवितेत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.

Read More »

श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत पद्यानुवाद

कुठल्याही एका भाषेतून दुसर्‍या भाषेत अनुवाद करायचा म्हणजे केवळ शब्दकोशाप्रमाणे शब्दाला शब्द योजून उपयोगी नाही. अर्थानुवाद, किंवा त्याही पुढे जाऊन भावानुवाद, उत्तम रीतिने जमण्यासाठी दोन्ही भाषांतील शब्दांच्या विविध अर्थच्छटा व त्यांच्या खाचाखोचा यांची चांगली जाण पाहिजे आणि त्या दोन्ही  भाषांवर प्रभुत्व तर असायलाच पाहिजे परंतु दोन्ही भाषांमागील संस्कृती व परंपरांचेही उत्तम ज्ञान असायला हवे.

अशा या सर्वगुणांनी संपन्न अशा मराठीतील महाकवी ग० दि० माडगुळकर उर्फ गदिमा यांनी केलेला संस्कृतमधील श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा सविस्तर मराठी भावानुवाद आणि तो देखिल पद्यात, खालील दुव्यावर सापडेल.

अमृतमंथन- श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत अनुवाद_111209

.

कृपया आपले प्रतिमत लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. आभारी आहोत.

– अमृतयात्री

पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये

पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:

मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.

तुमचं कविता लेखन काय म्हणतय?

उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!

Read More »