गांधीहत्या, कपूर आयोग व सावरकर – भाग १ (ले० अक्षय जोग)

आयोगाचे निष्कर्ष वा त्याच्यासमोरील पुरावे न्यायालयावर बंधनकारक नसतात. न्यायालय ते फेटाळू शकते, पण न्यायालयाचे निर्णय फेटाळण्याचा वा त्यांना चुकीचे म्हणण्याचा अधिकार आयोगाला नसतो. कपूर आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले, तरीही विशेष न्यायालयाचा निर्णयाधिकार त्यांच्या आयोगापेक्षा वरचढच असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुध्द सरकार अपिलात गेलेच नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो.

Read More »

इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)

प्रास्ताविक: विज्ञानाच्या परिभाषेकरता इंग्रजी शब्द घ्यायला हरकत नसावी, असं पुष्कळ विद्वानांना वाटतं. एके काळी मलाही तसं वाटत असे. पण, जपानची अफाट प्रगती पाहिली आणि त्यामागचं विश्लेषण कळलं, तेव्हा वाटलं, “आपल्या विचारांत काही तरी घोटाळा आहे.” आणि पुनर्विचार सुरू केला. वरील मत व्यक्त करणारे वर असं सांगतात, “इंग्रजीनं नाही का अन्य भाषांतले शब्द स्वीकारले? मग आपल्याला काय हरकत? असे शब्द घेऊन इंग्रजी भाषा टणक झाली, तशी मराठी का होऊ नये?” हे प्रतिपादन मराठी भाषकांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणारं असल्यानं त्याचा परामर्श घेणं अत्यावश्यक आहे. 

Read More »

हे शिक्षण आपलं आहे? (ले० प्रा० मनोहर राईलकर, दै० लोकसत्ता)

जगभरातल्या २०० अव्वल विद्यापीठांच्या यादीत एकही भारतीय विद्यापीठ नाही. कुणाला ही भारताची शैक्षणिक पडझडवाटेल (लोकसत्ताने या शीर्षकाचा अन्वयार्थही १४ सप्टेंबरला छापला होता); परंतु पडझडहोण्यासाठी मुळात वास्तूची उभारणी व्हावी लागते.. ती आपल्याकडे झाली होती का

आपल्या महान देशाच्या तुलनेत चिल्लर अशा देशांच्या विद्यापीठांचीही नावंही यादीत आहेत, पण भारताच्या एकाही नाही! याची काही खंत वाटते का?

Read More »

केतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) भारतीयांना वावडे, विकिपीडिया मात्र जोरात ! (ले० मंगेश नाबर)

दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, “मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार,  समाजहिताचा,  त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत मोजली.”  

“मी एरवी  गांधींची भक्त; पण  त्यांचं जिथं चुकलं तिथ सांगितलंच पाहिजे. भलत्या ठिकाणी भक्ती काय कामाची ? तेव्हा एशियाटिक लायब्ररीचे एक सभासद प्रभावळकर  म्हणून होते. आजचे नाट्य कलावंत दिलीप प्रभावळकर  यांचे वडील. ते मला म्हणाले होते, ” बाई, तुम्ही गांधीनाही  सोडलं नाहीत…! “

Read More »

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली राज्यशासनाची शिक्षणविषयक कर्तव्ये (ले० सलील कुळकर्णी)

“भारताच्या राज्यघटनेप्रमाणे केंद्र सरकार किंवा कुठलेही राज्य सरकार इंग्रजी भाषेच्या जोपासनेस, संवर्धनास किंवा प्रसारास मुळीच बांधील नाहीत. घटनेच्या तत्त्वाप्रमाणे कुठल्याही राज्याने प्रामुख्याने आपल्या राज्यभाषेच्या माध्यमातूनच आपल्या जनतेची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

“नुसतेच स्थानिक भाषेतून शिक्षण देणे याबरोबर राज्यशासनाची कर्तव्यपूर्ती होत नाही; तर त्या भाषेतूनच जनतेची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होईल या दृष्टीने सतत प्रयत्न करणे हेदेखील शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यादृष्टीने शासनाने कायदे केले पाहिजेत व धोरणे आखली पाहिजेत.”

“वरील विवेचनावरून असे स्पष्टपणे समजून येते की प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यभाषेतील शिक्षणासच सर्वाधिक महत्त्व देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. इंग्रजी ह्या परकीय व घटनेच्या परिशिष्ट-८ मध्येही समाविष्ट नसलेल्या भाषेला अनाठायी महत्त्व देऊन इंग्रजी माध्यमातील शाळांवर जनतेचा पैसा खर्च करण्याचे तर मुळीच कारण नाही. मराठी शाळांत इंग्रजीचे उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न नक्की व्हावा. मात्र स्थानिक भाषेला शिक्षणक्षेत्रात सर्वाधिक महत्त्व मिळालेच पाहिजे. ज्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी किंवा इतर माध्यमांतून शिक्षण द्यायचे असेल त्यांनी ती हौस स्वतःच्या कुवतीवर भागवावी, सरकारी पैशावर नव्हे.

Read More »

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education

“We seem to have come to think that no one can hope to be like Bose unless he knows English. I cannot conceive a grosser superstition than this. No Japanese feels so helpless as we seem to do….

The cancer has so eaten into the society that in many cases the only meaning of education is ‘Knowledge of English’. All these are for me, signs of our slavery and degradation. It is unbearable to me that the vernaculars should be crushed and starved as they have been.”

Read More »

सर विन्स्टन चर्चिल यांची भारताविषयीची मते व भाष्य

ब्रिटनचे भूतपूर्व पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र भारताला उल्लेखून केलेली खालील भविष्यवाणी बरीच प्रसिद्ध आहे. चर्चिल यांचा भारत देश, भारतीय संस्कृती व भारतीय लोक यांच्याबद्दलचा तिरस्कार व तुच्छतेची भावना त्यातून दिसून येते. हे उद्गार आपल्या दृष्टीने कितीही निंदनीय असले तरी आपणा भारतीयांपैकी बर्‍याच जणांनी मात्र ते सत्यात उतरविण्याचे फार गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते आहे.

Read More »