‘पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटा’च्या अहवालाचा पाठपुरावा करण्यासाठी उचलायची पावले (डॉ० माधवराव गाडगीळ)
————————-
‘पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटाच्या (डॉ० माधवराव गाडगीळ समितीच्या) अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आपण सरकारला भाग पाडले पाहिजे’ हा लेख प्रसिद्ध करून झाल्यावर आता स्वतः पर्यावरणतज्ज्ञ असलेले आणि पश्चिम-घाट-पर्यावरण-तज्ज्ञ-गटाचे प्रमुख असलेले डॉ० माधवराव गाडगीळ ह्यांनी ह्या अहवालाचा पाठपुरावा करण्यासाठी कशा प्रकारे पावले उचलता येतील ह्याविषयी केलेल्या सूचना आम्ही खालील दुव्यावर प्रसिद्ध करीत आहोत.
Amrutmanthan_Follow-Up Response_WGEEP Report_Dr Madhav Gadgil_Marathi_120623
Further to the article ‘We must force the Govt for implementation of the Western Ghats Ecology Expert Panel ‘, we now publish at the link below the follow up action points suggested by Dr. Madhav Gadgil, the Ecology Expert who headed the panel.
Amrutmanthan_Follow Up Response_WGEEP Report_Dr Madhav Gadgil_English_120623
ह्याविषयी अत्यंत तातडीने करायची एक महत्त्वाची कृती म्हणजे केंद्र सरकारच्या ‘पर्यावरण आणि वने’ मंत्रालयाला थोडक्यात आपले प्रतिमत (feedback) पाठवून देणे. ह्याच मंत्रालयाने तज्ज्ञगटाची नियुक्ती केली होती आणि हा अहवाल पूर्णतः किंवा अंशतः स्वीकारणे आणि अंमलात आणणे ही ह्याच मंत्रालयाची जबाबदारी आहे. आपल्याला हे नक्कीच माहीत आहे की जनतेकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला तरच सरकार ह्या अहवालावर कृती करण्यास राजी होईल. अन्यथा, इतर अनेक अहवालांच्या बाबतीत जसे केले गेले त्याचप्रमाणे हा अहवालदेखील विस्मृतीत गाडला जाईल.
The immediate and the most important step to be taken first is to provide our feedback in short to the ‘Ministry of Environment & Forests’ of the Central Government, who had constituted this panel and who are responsible for accepting and implementing, in full or part, the WGEEP report. We know very well that the government will act on this report only if it receives a very large no. of responses from the general public to do so. Else, the report is likely to be dumped into oblivion the way it has been done with so many other reports.
.
वरील लेखात सुचवलेला कृतिकार्यक्रम वाचून झाल्यावर कृपया तातडीने आपले प्रतिमत (feedback) खालील पत्त्यावर पाठवावे. (आपण पत्राद्वारे, फॅक्सद्वारे किंवा ई-मेलनेदेखील आपला प्रतिसाद पाठवू शकता.)
Please go through the suggested follow up points in the above article and urgently provide your feedback to the address given below. (You can send your response by letter, fax or email also.)
Dr. Amit Love, Deputy Director,
Address: Room No. 539, Paryavaran Bhavan, CGO Complex, Lodi Road, New Delhi – 110 003.
Telephone: 011-24362827,
Telefax: 011-24364594, Email: amit.love@nic.in , sv.godavarthi@nic.in.
.
आपल्या काही शंका, सूचना असल्यास ह्या लेखाखालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य नोंदवा. डॉ० माधवराव गाडगीळांना आपण प्रतिसाद देण्याची विनंती करू.
If you have any doubts or suggestions, do note them down in the discussion cell below this article. We shall request Dr. Madhav Gadgil to respond to them.
– अमृतयात्री गट
.
ता०क० पश्चिम-घाट-तज्ज्ञ-गटाच्या अहवालाबद्दल अधिक सविस्तर माहिती खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
P.S. For more details about the WGEEP report, you may please refer to the following link.
.