उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गिरीश कुबेर, दै० लोकसत्ता)

प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं हे असं वास्तवाचं भान सुटावं अशी प्रत्येक राज्यकर्त्यांचीच इच्छा असते. अशा काळात करमणुकीला अतोनात महत्त्व येतं. कला आणि करमणूक यातील भेद कळायची कुवतही समाज हरवून बसतो.

दैनिक लोकसत्तेच्या दि० ९ एप्रिल २०११ च्या अंकातील श्री० गिरीश कुबेर यांचा लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_उत्सवी मग्न राजा आणि प्रजाही_ले० गिरीश कुबेर

– अमृतयात्री गट

.

2 thoughts on “उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गिरीश कुबेर, दै० लोकसत्ता)

  1. धन्यवाद! अतिशय समर्पक अभ्यासपूर्ण आणि वास्तवाचं भान आणणारा लेख. ही खरी निर्भिड पत्रकारिता. मी श्री गिरीश कुबेरांची आधीपासूनच तेलाच्या पुस्तकांमुळे चाहती होतेच. आता त्यात काकणभर वाढ झाली आणि आनंदही झाला की बरेच वर्षांनी मराठी वृत्तपत्र पत्रकारिला एक वाघ संपादक मिळाला.

    • प्रिय श्रीमती शांतिसुधा यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

      आपण भारतीय मूलतः मूर्तिपूजक आहोत. कोणालाही अचानक देव बनवून त्याची मूर्तिपूजा करू लागतो. अमिताभ बच्चनचे मंदिर बांधतो. एमजीआर किंवा तसाच एखादा राजकारणी आजारी असताना आत्महत्या करतो इत्यादी. आणि आपल्या संस्कृतीत देवही अनेक. त्यात पुन्हा प्रत्येकाला आपलाच देव सर्व देवांत मोठा असे वाटते. अर्थात कधी-कधी एखाद्याचे देवत्त्वही आपण अचानक काढूनही घेतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.