मायबोली मराठी भाषा दिन – नैमित्तिक नव्हे, नित्यच पाळावा

आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे आपल्या मायबोली मातेचा विचार असायला हवा. त्यासाठी जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा, जितके काही शक्य असेल ते सतत करीत राहिले पाहिजे. त्यातूनच एक मोठी चळवळ उभी राहू शकेल, एक मोठी क्रांती घडू शकेल.त्यात आपल्याला आपल्या मातेचे ऋण फेडल्याचे समाधान मिळेल व शांतपणे शेवटचा श्वास घेण्याच्या वेळी आपली सदसद्विवेकबुद्धी आड येणार नाही. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मग आपणही म्हणू शकू, “याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा”.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_मायबोली मराठी भाषा दिन-नैमित्तिक नव्हे नित्यच पाळावा_280210

.

आपल्याशी केलेल्या वरील हितगुजाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) खालील रकान्यांत अवश्य लिहा.
.
– अमृतयात्री गट
.

2 thoughts on “मायबोली मराठी भाषा दिन – नैमित्तिक नव्हे, नित्यच पाळावा

 1. aaplya pratyek krutimadhe ha vichar asayla hawa, he khara ahe. pan ‘Hindi’ popular honyamage hindi chitrapatancha ani hindi sangeetacha kiti bhag ahe he sarwanna mahitach ahe. aajkalchya baryach marathi chitrapat ani tv serials cha darja pahilyawar manat prashna padat rahto ki ti wel kadhi yeil jevha marathi chitrapat hindi chitrapatnchya todis tod uttar detil. itar ‘regional languages’ ingrajichya ‘so called’ prabhavakhali dablya gelya nahit yacha mukhya shreya tithalya chitrapatancha ahe.

  • प्रिय क्षिप्रा यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या भावना आम्ही समजू शकतो. पण मराठीच्या दुर्दैवाला केवळ मराठी माणूसच जबाबदार आहे. इतर कुठलीही भाषा किंवा इतर भाषिक नव्हेत.

   हिंदी चित्रपट इतर राज्यांतही लोकप्रिय आहेत. पण त्यामुळे कोणी आपल्या भाषेला तिलांजली दिलेली नाही. मराठी माणसासारखी स्वाभिमानशून्यता इतर राज्यांत का आढळत नाही?

   गेल्या काही वर्षांत अनेक उत्तम मराठी चित्रपट तयार झाले. अर्थात मुंबईत त्यांचे नावही ऐकू येत नाही. पुण्यात व इतर लहान नगरांतच त्यांचे प्रदर्शन होते. इतर बहुतेक राज्यांत मात्र राज्यभाषेतील चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहात २५-३५% काळ दाखवावे लागतात. इतर राज्यांच्या मुळे महाराष्ट्रातही शासनाने (नाईलाजाने?) तसा नियम केला आहे. पण त्याचा काळ फार कमी आहे व तेवढाही काळ मराठी चित्रपटांचे खेळ न केल्यास त्यावर काहीही कृती केली जात नाही. इतर राज्यांत त्यांच्या परवान्याचे नूतनीकरणच होणार नाही व चित्रपटगृह बंदच केले जाईल. म्हणून वचकून स्थानिक चित्रपट दाखवावेच लागतात. व म्हणून लोक स्थानिक भाषेतील चित्रपट पाहतात व त्यांना आधारही देतात. महाराष्ट्रात चांगले चित्रपट तोट्यातच जातात. त्यातल्या त्यात चालतात ते भरपूर जाहिरात केलेले उथळ आणि पाचकळ मराठी चित्रपट. असे चित्रपट उलट मराठीचे नावच खराब करतात.

   असो. पण स्वाभिमान हा मूळचाच असावा लागतो. तो चित्रपट पाहण्यावर अवलंबून नसतो. मराठी माणसांत गेल्या ५० वर्षांत त्याचे प्रमाण का कमी झाले हा खरोखरच संशोधनाचा विषय ठरावा.

   मराठीभाषा ही भारतातील इतर कुठल्याही भाषेपेक्षा कमअस्सल, हिणकस नक्कीच नाही. किंबहुना अनेक भाषांच्यापेक्षा अधिक संपन्न आहे. तिला इतर कोणी दाबू शकत नाहीत. आपण मराठी माणसेच तिला दाबून टाकतो, ती आपल्या न्यूनगंडामुळे. आपण समाजव्यवहारात मराठीचा वापर करण्यास शरम बाळगत असल्यामुळे ही अत्यंत हिणकस भाषा असावी असा परप्रांतीयांचा ग्रह होतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s