महाराष्ट्र… काय होता, काय झाला, कुठे पोचला (ले० चंद्रशेखर धर्माधिकारी)

निवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ विचारवंत श्री० चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या ’महाराष्ट्र टाईम्स’मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अत्यंत वाचनीय लेखातील काही भाग आपल्या वाचनासाठी टाचला आहे.
.
धर्माधिकारींनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यामागे असलेले त्यांचे खोल विचार, तसेच समाजातील दुर्भागी आणि पीडित लोकांबद्दल त्यांना वाटणारी कणव व गेल्या पन्नास वर्षांत अशा लोकांचे दुःख आणि गैरसोई कमी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले राजकारणी आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलची चीडसुद्धा स्पष्टपणे दिसून येते.
.
लेख वाचल्यावर आपले मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. लेखात नमूद केलेल्या प्रत्येक प्रकारच्या दुर्दशेला आपणच सर्व कारणीभूत नाही का? त्यात चर्चिलेल्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न अमेरिका, चीन, पाकिस्तान किंवा कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहारने निर्माण केलेला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येस आपण महाराष्ट्रीय मंडळीच बर्‍याच प्रमाणात सामुहिकरित्या व काही प्रमाणात व्यक्तिशः जबाबदार आहोत हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे आणि त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.
.
Advertisements