पुनश्च! : मराठीमधील उत्तम वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आगळा उपक्रम

मराठीतील नियतकालिकांची परंपरा तब्बल १८५ वर्षांची. त्यांतील लेखनाने प्रबोधन आणि कल्पकता यांची सांगड घालत मराठी भाषेला सौष्ठव प्राप्त करून दिले. या दीर्घ आणि समृद्ध परंपरेतील कालसुसंगत लेखन ‘आज’च्या वाचकांना उपलब्ध करून देणारा ‘पुनश्च’ हा उपक्रम २१ सप्टेंबर रोजी वाचकार्पण होत आहे. अॅप व संकेतस्थळ या नव-तंत्रमाध्यमांद्वारे सुरू होणाऱ्या या आगळ्या उपक्रमाविषयी..

Read More »

मराठी वाचनप्रेमींसाठी घरपोच पुस्तकांची सुविधा – ग्रंथस्नेह वाचनालय

वाचकांना आपल्या कामाच्या वेळेनंतर ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची ने-आण करणे हे नेहमीच शक्य नसते अशावेळी आपल्या कार्यालयात किंवा घरात कोणी पुस्तके आणून देत असेल तर ते कोणाला आवडणार नाही? नेमकी हीच भन्नाट कल्पना ह्या वाचनालयाच्या स्थापनेमागे आहे.

Read More »

पुस्तक ओळख – केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ (संपादक: विलास खोले)

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

संपादक : विलास खोले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे: २३८, मूल्य: २५० रूपये

केशवराव कोठावळे ( २१ मे १९२३ – ५ मे १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.

Read More »

‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र’ (ले० सत्वशीला सामंत)

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकमधील एका मराठी विद्यार्थिनीला ‘कुसुमाग्रज कोण होते?’ असं शिक्षकांनी विचारलं तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ते शिक्षक अतिशय खंतावले. ही गोष्ट पुण्याच्या संजीवनी बोकील या संवेदनशील कवयित्रीच्या कानी आली तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली आणि एक बीज पेरलं गेलं. कालांतरानं ते रुजलं आणि आता त्यातून एक सुंदर रोपटं जन्माला आलं असून, दिवसेंदिवस ते तरारून दमदारपणे वाढत आहे…….

‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे।’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत? अक्षरश: न संपणारी नामावळी!…..

या स्थानिक उपक्रमाची सर्वदूर प्रसिद्धी करण्यामागील मुख्य हेतू हा की, त्यापासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मराठीप्रेमी व्यक्तींना प्रेरणा मिळावी.. ज्योत से ज्योत जलाते चलो। लवकरच सोलापूर येथे अशा प्रकारचा उपक्रम सुरू होणार असून, सांगली येथेही तशीच हालचाल सुरू झालेली आहे. उपक्रमशील व्यक्तींनी आपापल्या भागांत जर अशी चळवळ सुरू केली तर मराठीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल.

अंधार फार झाला, पणती जपून ठेवा!

लोकसत्ता, चतुरंग पुरवणी (१८ जुलै २००९) मधील सत्वशीला सामंतांचा लेख खालील दुव्यावर पहा.

http://www.loksatta.com/daily/20090718/ch12.htm