कधी ना कधी तरी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल. पण कालांतराने तो मागे पडला असेल. आज आपले एक अत्यंत ज्येष्ठ असे मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० यशवंत कर्णिक यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे, त्यावर चर्चा करू.
Category: ३०. विचारमंथन चर्चापीठ (प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा)
भाषा, साहित्य, कला, संस्कृती, परंपरा, विज्ञान, निसर्ग, इतिहास, सामान्य ज्ञान… अशा कुठल्याही विषयातील प्रश्न-शंका-सूचना व त्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ
पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’)
श्री० ’जय महाराष्ट्र’ या आपल्या अमृतमंथन-परिवारातील सदस्याने विचारलेल्या शंकेला थोडे वेगळा आकार देऊन अमृतमंथनाच्या विचारी वाचकांसमोर ठेवीत आहोत.
————-
’जय महाराष्ट्र’ यांची शंका अमृतमंथनावर हल्लीच प्रकाशित केल्या गेलेल्या ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकासंबंधात आहे. ते म्हणतात:
“मला एक मुद्दा आपल्यापुढे विचारार्थ मांडायचा आहे. ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये? फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे?”
————
अमृतमंथनच्या सुविद्य वाचकांनो,
श्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या या शंकेबद्दल आपल्याला काय वाटते? अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत? त्यांचे फायदे-तोटे काय? ती चिन्हे एकसारखीच असावीत की वेगवेगळी? या प्रश्नांचा उहापोह व संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीची चर्चा या विचारमंथन चर्चापीठावर करूया. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य पाहिजेच.
या विषयासंबंधित माहिती, आपले मत, कारणमीमांसा या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० वर उल्लेख केलेल्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे आहे.
हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)
.
‘काव्य’ आणि ‘कविता’ हे एकच की भिन्न? (प्रश्नकर्ता: श्री० कल्पेश कोठाळे)
प्रिय अमृतयात्री गट,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अमृतमंथनावरील विचारमंथन चर्चापीठापुढे एक विषय चर्चेसाठी ठेवत आहे.
“काव्य आणि कविता या दोन शब्दांचे अर्थ एकच की भिन्न?”
शाळेत असताना आम्ही दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे समजत आलो.
पण आपण रामायण, महाभारत यांचा उल्लेख महाकाव्ये असा करतो, महाकविता असा नाही. (अजूनतरी तसे ऐकण्यात आलेले नाही). म्हणजे त्यांत काहीतरी अंतर असावे असे आता वाटते आहे.
अमृतमंथन परिवारातील सुबुद्ध बांधवांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.
कलावे, लोभ असावा.
आपलाच,
कल्पेश कोठाळे
.
आपले मित्र श्री० कल्पेश कोठाळे ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे? आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.
– अमृतयात्री गट
.
Conformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)
अमृतमंथन परिवारातील एक सदस्य श्री० मंगेश नाबर यांनी conformity या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला आहे. भाषाप्रेमी अमृतयात्रींनी मंगेशरावांना योग्य शब्द सुचवावेत असे आवाहन.
’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)
“अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा? गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे?”
“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हे गीतच मुख्यतः स्वातंत्र्याचा मंत्र म्हणून सर्वमुखी झालेले असतानाही त्या गीताला पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारले गेले नाही असा प्रश्न मनात येऊन त्याविषयी खेद वाटल्याशिवाय राहात नाही.”
स्टेट बॅंकेची दिनदर्शिका तमिळमध्ये. मराठीत का नाही? (श्री० प्रसाद परांजपे)
“स्टेट बॅंक ऑफ इंडिया” ची २०१० च्या वार्षिक दिनदर्शिकेचे चित्र टाचले आहे. ही दिनदर्शिका विशेषतः तामिळनाडूसाठी, तामिळीत बनवलेली आणि तामिळ संस्कृतीच्या संबंधीची प्रचलित वैशिष्ट्ये दाखवणारी अशीच आहे.
विचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात?
प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात की ज्यांचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होतात. भाषेवर प्रभुत्व असणारे कवी ह्या अलंकाराचा उत्तम उपयोग करून घेतात. काव्यातील किंवा आलंकारिक भाषेतील या प्रकाराला श्लेष असे म्हणतात. संस्कृत भाषेतील काव्यांत तर अशा उदाहरणांची रेलचेल आहे. मराठीमधील बहुतेक लोकप्रिय विनोदी लेखक, चिं० वि० जोशी, आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे इत्यादींनीही मुख्यतः शाब्दिक कोटींवर म्हणजे श्लेषावरच भर दिलेला दिसतो.
विचारमंथन: चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द ओळखा (प्रश्नकर्ता: डॉ० उमेश करंबेळकर)
“नाशिकच्या डॉ. वि. म. गोगटे सरांनी आम्हाला एक कोडे घातले होते; चार अक्षरी वैशिष्ट्यपूर्ण शब्द शोधून काढण्याबद्दल….”
विचारमंथन – प्रकट की प्रगट (प्रश्नकर्ता: डॉ० उदय वैद्य)
“प्रगट आणि प्रकट (similar to manifestation in English) या दोन शब्दांच्या अर्थात काय फरक आहे?”
विचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)
अमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,
हल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे: