इंग्रजांच्या अधिकाराखालील गुलामगिरीत दीर्घ काळ घालवल्यामुळे आणि मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीत पुरेसा बुद्धिभेद केला गेल्यामुळे, भारतीयांना आपल्या भाषा ह्या गावंढळ आणि खालच्या दर्जाच्या व इंग्रजी भाषा ही मात्र अत्यंत उच्च दर्जाची भाषा असे वाटते. जगातील सर्व भाषांमध्ये इंग्रजी हीच एकमेव ज्ञानभाषा आहे आणि इंग्रजीशिवाय ज्ञानप्राप्ती शक्यच नाही असे भारतीयांना वाटते. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजीवर अनावश्यक भर न देता स्वतःच्या भाषेतच शिक्षण घेणार्या देशांनीच भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात शिक्षणाचा प्रसार, संशोधन, नोबेल पारितोषिके इत्यादी गोष्टी आणि एकंदरीत सामाजिक प्रगती साधलेली दिसून येते. ह्यासाठी जपान, इस्रायल, कोरिया, चीन, सर्व युरोपीय देश इत्यादींची उदाहरणे पाहता येतील.
श्रेणी: ११. भाषाविचार – लेख, चिंतन, चर्चा
विविध भाषांच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा
Difficulties of learning to read and write English (by Masha Bell)
The author says : “Because of the many irregularities, English-speaking children take roughly 10 times longer to learn to read and write than in Finland, Estonia or Korea which have completely regular spelling systems.” |
मराठी भाषा आणि संस्कृती : १९९७ (ले० पद्मश्री अशोक केळकर)
शिक्षणव्यवस्थेत मराठीचं भलं व्हावं यासाठी शासनानं काय करावं असं तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विचारल्यावर मी तत्काळ म्हटलं : एक, मराठी माध्यमाच्या शाळांमधलं इंग्रजीचं अध्ययन सुधारावं; दोन, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधलं मराठीचं अध्यापन सुधारावं, किंबहुना त्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेसाठी मराठी अनिवार्य करावं; आणि तीन, दीर्घकालीन उपायांसाठी ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची स्थापना करावी.
भाषेचा विकास आणि ती ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्या मंडळींचा बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास हातात हात घालून होत असतो. मराठीचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास यांना वेगळं काढता येणार नाही.
सामासिक शब्दांची घटकपदं (अनुदिनी- मराठी बाणा)
“समासात दोन शब्दांचा संयोग होतो. हे शब्द सुटे स्वतंत्र शब्द म्हणून वावरू शकतात. समासात ते सलग लिहिले म्हणजे त्या पदांत समासाच्या स्वरूपाचा संबंध आहे हे कळतं. सुटं लिहिल्याने त्यांतला संबंध समासाच्या स्वरुपाचा आहे की अन्य कोणता हे ठरवावं लागतं. उदा. ’शंकराचार्य मठातील विहिरीत पडल्याने बालिका जखमी’ असा बातमीचा मथळा एका वृत्तपत्रात मी वाचला. आणि शंकराचार्य पडल्याने बालिका कशी काय जखमी झाली असेल ह्याचा विचार करू लागलो.”
मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी)
“जेव्हा आवश्यक व अपरिहार्य असेल, तेव्हा दुसर्या भाषेतील सुयोग्य शब्द आपल्या भाषेत अवश्य घ्यावे. पण आपल्या भाषेतील रूढ असलेल्या योग्य शब्दांचे उच्चाटन करून त्यांच्या जागी अनावश्यक व भाकड परभाषिक शब्द प्रस्थापित करणे पूर्णपणे आत्मघातकी आहे.”
’निरंकुशाः कवयः’ व इतर काही मुद्दे (ले० सलील कुळकर्णी)
मराठीमध्ये शुद्धलेखनाचे जे नियम गद्याला असतात तेच पद्याला असतात. पण आज या विषयी बरेचसे गैरसमज लोकांच्या मनात दृढमूल झालेले आढळतात. ’जुन्या मराठी कवितांमधील लेखन आजच्या पिढीला व्याकरणदृष्ट्या चुकीचे व अशुद्ध वाटत असल्यास त्यात सत्य किती व भ्रम किती’ या मुद्द्यावर विचार करताना तिच्या अनुषंगाने माझ्या मनात आणखीही काही छोट्याछोट्या उपशंका उद्भवल्या. त्या सर्वांचा यथामति सांगोपांग विचार करून माझे विचार मांडतो.
भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक)
भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, “मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला हातभार लावते ती संस्कृती. त्या संस्कृतीचा जवळून परिचय व्हायला हवा. नाही तर ती भाषा अवगत झाली असं म्हणता येणार नाही.”
मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यातील भेद समजून घेऊन प्रमाणभाषेच्या नियमांच्या आवश्यकतेबद्दल काही निश्चित विचार मांडणारा एक अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेख.
सचिवालय, मंत्र्यालय की मंत्रालय? (प्रश्नकर्ता: यशवंत कर्णिक)
कधी ना कधी तरी हा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवला असेल. पण कालांतराने तो मागे पडला असेल. आज आपले एक अत्यंत ज्येष्ठ असे मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० यशवंत कर्णिक यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारला आहे, त्यावर चर्चा करू.
पूर्णविराम व लघुरूपचिन्ह एकसारखेच असावे की भिन्न? (प्रश्नकर्ता: ’जय महाराष्ट्र’)
श्री० ’जय महाराष्ट्र’ या आपल्या अमृतमंथन-परिवारातील सदस्याने विचारलेल्या शंकेला थोडे वेगळा आकार देऊन अमृतमंथनाच्या विचारी वाचकांसमोर ठेवीत आहोत.
————-
’जय महाराष्ट्र’ यांची शंका अमृतमंथनावर हल्लीच प्रकाशित केल्या गेलेल्या ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकासंबंधात आहे. ते म्हणतात:
“मला एक मुद्दा आपल्यापुढे विचारार्थ मांडायचा आहे. ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)’ या लेखाच्या शीर्षकात आपण जो फुगीर बिंदू किंवा टिंब दिले आहे तशी चिन्हे सामान्यपणे हिंदीमध्ये वापरली जातात. अशी ही पद्धत मी इतर बर्याच मराठी प्रकाशकांनीही आपल्या पुस्तकांत वापरल्याचे पाहिले आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की आपण या बाबतीत मोठ्या फुगीर टिंबांचे एवढे कौतुक करण्याचे काही कारण नाही. आपण वर उल्लेखलेल्या लेखाचे शीर्षक ’हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले. सलील कुळकर्णी)’ असे का लिहू नये? फुगीर टिंबात एवढे काय मोठे वैशिष्ट्य सामावलेले आहे?”
————
अमृतमंथनच्या सुविद्य वाचकांनो,
श्री० ’जय महाराष्ट्र’ यांच्या या शंकेबद्दल आपल्याला काय वाटते? अवश्य कळवा. आपल्या दृष्टीने टोकदार टिंबाचा पूर्णविराम व पोकळ वर्तुळाकार पूज्याचे लघुरूप (short form) दर्शक चिन्ह अशी भिन्न पद्धतीची चिन्हे देण्यामागील कल्पना काय आहेत? त्यांचे फायदे-तोटे काय? ती चिन्हे एकसारखीच असावीत की वेगवेगळी? या प्रश्नांचा उहापोह व संबंधित विषयाबद्दल अधिक माहितीची चर्चा या विचारमंथन चर्चापीठावर करूया. अर्थात त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य पाहिजेच.
या विषयासंबंधित माहिती, आपले मत, कारणमीमांसा या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० वर उल्लेख केलेल्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे आहे.
हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)
.
‘काव्य’ आणि ‘कविता’ हे एकच की भिन्न? (प्रश्नकर्ता: श्री० कल्पेश कोठाळे)
प्रिय अमृतयात्री गट,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अमृतमंथनावरील विचारमंथन चर्चापीठापुढे एक विषय चर्चेसाठी ठेवत आहे.
“काव्य आणि कविता या दोन शब्दांचे अर्थ एकच की भिन्न?”
शाळेत असताना आम्ही दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत असे समजत आलो.
पण आपण रामायण, महाभारत यांचा उल्लेख महाकाव्ये असा करतो, महाकविता असा नाही. (अजूनतरी तसे ऐकण्यात आलेले नाही). म्हणजे त्यांत काहीतरी अंतर असावे असे आता वाटते आहे.
अमृतमंथन परिवारातील सुबुद्ध बांधवांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.
कलावे, लोभ असावा.
आपलाच,
कल्पेश कोठाळे
.
आपले मित्र श्री० कल्पेश कोठाळे ह्यांच्या शंकेबद्दल आपले काय मत आहे? आपले विचारपूर्ण स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीखालील चर्चाचौकटीत सविस्तरपणे मांडावे.
– अमृतयात्री गट
.
Conformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)
अमृतमंथन परिवारातील एक सदस्य श्री० मंगेश नाबर यांनी conformity या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला आहे. भाषाप्रेमी अमृतयात्रींनी मंगेशरावांना योग्य शब्द सुचवावेत असे आवाहन.
हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)
“आपल्या मराठी भाषेत इतके उत्तम शब्द उपलब्ध असतानाही त्यांच्याऐवजी हिंदी पंडितांनी जन्माला घातलेला, विपर्यस्त अर्थाचा शब्द आपण विनाकारण का रूढ करतो, असे कोडे मला पडले.”
मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)
“समारोपादाखल मी गांगल यांची आजवरची भूमिका वेळोवेळी कशी बदलत गेली आहे ते थोडक्यात सांगते…”
“गांगल यांना मतस्वातंत्र्य आहे व त्यांना आपल्या मताचा प्रचार करण्याचाही अधिकार आहे. पण त्यांना अपुर्या अभ्यासानिशी विपर्यस्त माहितीचा समाजात प्रसार करण्याचा अधिकार मात्र निश्चित नाही. गोबेल्सचे प्रचारतंत्र चांगले अवगत असल्याने ते वारंवार लोकांची दिशाभूल करणारे असे लेख लिहितात…”
स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)
पत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. लगोलग ’महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.
च्यायला, आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी काय? (ले० अतुल तुळशीबागवाले)
भारतीय संस्कृतीचे मूळ हे अशा काही मोजक्या तत्त्वांत आहे असे मी समजतो, व त्यावरून आपली नैसर्गिक जीवनशैली ओघाने येतेच. इतका सहजपणा आणि विवेक मी अन्य कुठेही बघितला नाहिये. पण निसर्गाबरोबर एवढ्या समरसतेने राहूनही १५०० वर्षांपूर्वीचा आर्यभटाचे गणित आता आधुनिक समजल्या जाणार्या गणिताच्या तोडीचं निघालं, आणि कणादांनी २००० वर्षांपूर्वी अणूंची कल्पना मांडली. आयुर्वेद, हठयोग व अन्य स्वास्थ्यविषयक शास्त्रांचा प्रभावीपणा तर आपल्या सर्वांना माहितच आहे.
मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन ! (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर)
मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत सादर करीत आहोत.
मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स)
प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,
आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.
पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)
लोकमान्यांनी हा लेख लिहून शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली. टिळकांचा काही आशावाद काळाने चुकीचा ठरवला; त्याचप्रमाणे काही निराशावादही काही प्रमाणात अनाठायी होता असे काळाने सिद्ध केले. बर्याच प्रश्नांना उत्तरे फक्त काळच देऊ शकतो हेच खरे!
आपले पुण्याचे मित्र श्री० विजय पाध्ये (भाषांतरकार, त्यांच्या स्वतःच्या शब्दांत – wordsmith) यांनी पाठवलेला लोकमान्य टिळकांनी सन १९०५ साली ’केसरी’मध्ये लिहिलेल्या एका लेखातील काही अंश पहा.