“माझ्या भाग्यानं विपुल आणि समृद्ध प्रेमजीवन माझ्या वाट्याला आलं. ते मी नि:संकोचपणानं जगलो. प्रांजळपणाने, निरागसपणाने जगलो. अगदी धुंद होऊन आणि सर्व प्रकारचे धोके पत्करून जगलो. त्यावर मी पापाचे शिक्के कधीच मारले नाहीत. उलट, मी ती पुण्यसाधनाच मानली. आपल्या आणि प्रेयसीच्या प्राणाचा ठाव घेण्याच्या या आर्त भक्तीनं प्रेमभावनेच्या शारीर पातळीपासून आत्मिक पातळीपर्यंतच्या तिच्या चढत्या ‘सिंफनीज’ मला उमगत गेल्या. आपल्यावर जिवाभावाने प्रेम करणारी स्त्री ही आपली संरक्षक आणि संजीवन देवता आहे, अशी माझी जन्मजात श्रद्धा आहे.”
श्रेणी: ०६.२ कविता
विचारमंथन – तिन्ही सांजा सखे मिळाल्या (प्रश्नकर्ता: सुशांत देवळेकर)
अमृतमंथन परिवारातील प्रिय मित्रांनो,
हल्लीच काही दिवसांपूर्वी, आपले एक मित्र, मराठीचे अभ्यासक, श्री० सुशांत देवळेकर यांनी मराठीप्रेमी मित्रमंडळापुढे एक प्रश्न मांडला, तोच अधिक विस्तृत चर्चेसाठी, विचारमंथनासाठी आपणा सर्वांपुढे मांडीत आहोत. प्रश्न असा आहे:
स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी
सुमारे १४ वर्षांपूर्वी कविवर्य कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता प्रसिद्ध झाली होती. सर्व मराठीजनांच्या पुनर्स्मरणार्थ ती ह्या अनुदिनीवर पुन्हा सर्वांसमोर ठेवावी असा विचार करीत असतानाच आपले आणखी एक अत्यंत स्वाभिमानी मराठीप्रेमी मित्र सुशांत देवळेकर ह्यांनी कुसुमाग्रजांच्या त्याच कवितेचे सद्यकालानुरूप केलेले ‘स्वातंत्र्यदेवीची समजावणी’ हे पुनर्लेखन वाचनात आले. आता दोन्ही कविता समांतरच प्रसिद्ध करीत आहोत.
’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)
सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. नुकतीच श्रीनिवास नार्वेकर या आपल्या रसिक मित्राने पाठवली. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्यात वळचणीला पडलेल्या जुन्या सुखद आठवणींच्या वरची धूळ झटकली जाऊन त्या आठवणींच्या उबेने मन काही क्षणापुरते का होईना पण पुन्हा टवटवीत होते व आयुष्याचे काही क्षण अत्यंत स्वर्गीय आनंदात जातात.
असा आनंद वाटत फिरणार्या मित्राचे आभार कसे मानायचे?
कविता खालील दुव्यावर वाचा. भविष्यकाळातही जेव्हा मनाचा तो नाजुक कोपरा उघडून पहावासा वाटेल तेव्हा पुन्हा वाचा. त्यामुळे जाग्या होणार्या आठवणींमुळे स्वतःचे सांत्वन करता येईल की – “देवाने आपल्यावर केवळ अन्यायच नाही केला.”
अमृतमंथन_मनातल्या मनात मी_कवि सुरेश भट
.
आपल्या प्रतिक्रिया, भावना, रसग्रहणे, निरूपणे, अभिप्राय, लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. सर्वच रसिकमित्रांबरोबर तो आनंद वाटून घेऊ.
– अमृतयात्री गट
.
’अखेर कमाई’ (कवी कुसुमाग्रज)
मनाला उबग आणणार्या महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ’अखेर कमाई’ या कवितेत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.