स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)

पत्र मिळताच पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ’मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. लगोलग ’महापौर’ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द सहज रुळला.

Read More »

सर विन्स्टन चर्चिल यांची भारताविषयीची मते व भाष्य

ब्रिटनचे भूतपूर्व पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी स्वतंत्र भारताला उल्लेखून केलेली खालील भविष्यवाणी बरीच प्रसिद्ध आहे. चर्चिल यांचा भारत देश, भारतीय संस्कृती व भारतीय लोक यांच्याबद्दलचा तिरस्कार व तुच्छतेची भावना त्यातून दिसून येते. हे उद्गार आपल्या दृष्टीने कितीही निंदनीय असले तरी आपणा भारतीयांपैकी बर्‍याच जणांनी मात्र ते सत्यात उतरविण्याचे फार गंभीरपणे मनावर घेतलेले दिसते आहे.

Read More »

हिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)

“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”

Read More »

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

“Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error.” श्री० अंकलेसरिया स्वामीनाथन अय्यर यांनी भारतातील राज्यशासनांस इशारा दिला आहे.

Read More »

मर्द मराठ्यांची ऑनलाईन लढाई (ले० कीर्तिकुमार शिंदे, लोकप्रभा, ८ जाने० २०१०)

प्रचंड मोठय़ा संख्येने पण मुख्यत: तलवार आणि भाले घेऊन लढणाऱ्या भारतीय सैन्यांना बंदुका व तोफांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर मूठभर इंग्रजांनी सहज हरवलं होतं, हा आपला इतिहास आहे. आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर जगभरात संगणक व माहितीजालाचा उपयोग माहिती आणि संज्ञापनासाठी वाढत असताना मराठी नागरिक व ग्राहक म्हणून स्वत:चे अधिकार मिळवण्यासाठी आपणही संगणक व महाजालाचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. पत्रव्यवहार व दूरध्वनी या जुन्या साधनांवरच जर आपण अवलंबून राहिलो तर आधुनिक जगात मागे राहू.

Read More »

अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.

जरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.

Read More »

महाराष्ट्र… काय होता, काय झाला, कुठे पोचला (ले० चंद्रशेखर धर्माधिकारी)

निवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ विचारवंत श्री० चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या ’महाराष्ट्र टाईम्स’मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अत्यंत वाचनीय लेखातील काही भाग आपल्या वाचनासाठी टाचला आहे.
.
धर्माधिकारींनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यामागे असलेले त्यांचे खोल विचार, तसेच समाजातील दुर्भागी आणि पीडित लोकांबद्दल त्यांना वाटणारी कणव व गेल्या पन्नास वर्षांत अशा लोकांचे दुःख आणि गैरसोई कमी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले राजकारणी आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलची चीडसुद्धा स्पष्टपणे दिसून येते.
.
लेख वाचल्यावर आपले मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. लेखात नमूद केलेल्या प्रत्येक प्रकारच्या दुर्दशेला आपणच सर्व कारणीभूत नाही का? त्यात चर्चिलेल्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न अमेरिका, चीन, पाकिस्तान किंवा कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहारने निर्माण केलेला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येस आपण महाराष्ट्रीय मंडळीच बर्‍याच प्रमाणात सामुहिकरित्या व काही प्रमाणात व्यक्तिशः जबाबदार आहोत हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे आणि त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.
.

खजुराहो: एक नितांत सुंदर अनुभव (ले० राधिका टिपरे)

भटकंतीची आवड असणारे, पुरातन भारतीय संस्कृतीचे जिज्ञासू किंवा अभ्यासक, सृजनकलांचे भोक्ते, तरल भावनाशील मनाच्या व्यक्ती अशा विविध स्वभावपैलूंच्या माणसांनी आयुष्यात एकदा तरी अवश्य भेट द्यावी आणि मन तृप्त करावे असे हे ठिकाण.

‘स्त्री-पुरुषांचं एकमेकांमध्ये मिसळून एकाकार होणं म्हणजे जीवनातील परमोच्च सुख होय… या सुखसमाधीतूनच निर्वाणप्राप्ती होते…’ हे तत्त्वज्ञान खजुराहोच्या कामशिल्पांतून अनुभवायला मिळतं. लेखिकेचे हे उद्गार ऐकल्यावर आचार्य रजनीश (ओशो) यांच्या ’संभोगातून समाधीकडे’ या तत्त्वज्ञानाच्या स्फूर्तीमागे ह्या शिल्पांचाही काही भाग असेल का, अशी शंका मनाला स्पर्श करून जाते.

Read More »

‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र’ (ले० सत्वशीला सामंत)

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकमधील एका मराठी विद्यार्थिनीला ‘कुसुमाग्रज कोण होते?’ असं शिक्षकांनी विचारलं तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ते शिक्षक अतिशय खंतावले. ही गोष्ट पुण्याच्या संजीवनी बोकील या संवेदनशील कवयित्रीच्या कानी आली तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली आणि एक बीज पेरलं गेलं. कालांतरानं ते रुजलं आणि आता त्यातून एक सुंदर रोपटं जन्माला आलं असून, दिवसेंदिवस ते तरारून दमदारपणे वाढत आहे…….

‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे।’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत? अक्षरश: न संपणारी नामावळी!…..

या स्थानिक उपक्रमाची सर्वदूर प्रसिद्धी करण्यामागील मुख्य हेतू हा की, त्यापासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मराठीप्रेमी व्यक्तींना प्रेरणा मिळावी.. ज्योत से ज्योत जलाते चलो। लवकरच सोलापूर येथे अशा प्रकारचा उपक्रम सुरू होणार असून, सांगली येथेही तशीच हालचाल सुरू झालेली आहे. उपक्रमशील व्यक्तींनी आपापल्या भागांत जर अशी चळवळ सुरू केली तर मराठीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल.

अंधार फार झाला, पणती जपून ठेवा!

लोकसत्ता, चतुरंग पुरवणी (१८ जुलै २००९) मधील सत्वशीला सामंतांचा लेख खालील दुव्यावर पहा.

http://www.loksatta.com/daily/20090718/ch12.htm