इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)

प्रास्ताविक: विज्ञानाच्या परिभाषेकरता इंग्रजी शब्द घ्यायला हरकत नसावी, असं पुष्कळ विद्वानांना वाटतं. एके काळी मलाही तसं वाटत असे. पण, जपानची अफाट प्रगती पाहिली आणि त्यामागचं विश्लेषण कळलं, तेव्हा वाटलं, “आपल्या विचारांत काही तरी घोटाळा आहे.” आणि पुनर्विचार सुरू केला. वरील मत व्यक्त करणारे वर असं सांगतात, “इंग्रजीनं नाही का अन्य भाषांतले शब्द स्वीकारले? मग आपल्याला काय हरकत? असे शब्द घेऊन इंग्रजी भाषा टणक झाली, तशी मराठी का होऊ नये?” हे प्रतिपादन मराठी भाषकांच्या मनात संभ्रम उत्पन्न करणारं असल्यानं त्याचा परामर्श घेणं अत्यावश्यक आहे. 

♦ ♦ ♦

[टीप : प्रा० मनोहर राईलकर यांच्या मूळ लेखाचे शीर्षक ’घरी कामधेनू पुढे ताक मागे’ असे होते. तोच लेख इथे प्रकाशित करताना त्याचे शीर्षक त्यांच्या अनुमतीने ‘इंग्रजीप्रमाणे परभाषेतून शब्द उचलण्याविषयी चर्चा’ असे बदललेले आहे, ह्याची कृपया नोंद घ्यावी.]

‘घरी कामधेनू, पुढे ताक मागे’

(इंग्रजीप्रमाणे परभाषेतून शब्द उचलण्याविषयी चर्चा) 

– प्रा. मनोहर राईलकर

ह्या बाबतीत एकच सांगणं पुरेसं आहे. मराठीच्या वापराबद्दल अत्याग्रही असणाऱ्या, भाषाशुद्धीकरता सतत विधायक प्रयत्न करणाऱ्या स्वा. सावरकरांचाही इंग्रजी शब्दांना अंध विरोध नव्हता. ज्या कल्पना किंवा वस्तू आपण इतरांकडून घेतल्या असतील, त्यांच्याकरता त्यांचे त्यांचे शब्दही घ्यायला त्यांचा आक्षेप नसे. तरी शक्यतो त्यांच्याकरताही चपखल प्रतिशब्द घडवावेत, असं त्यांना वाटे. मुख्य म्हणजे त्यांनी तसे अनेक शब्द स्वतः घडवलेही. (पहा. भाषाशुद्धि – स्वा. सावरकर)

सावरकरांनी दिलेलं एक वाक्य, “त्याने जी पोझिशन ऍश्यूम केली होती ती ओरिजिनलीच फॉल्स होती.” हे आणि ह्याहूनही हास्यास्पद शेकडो उदाहरणं देता येतील, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणून मराठीचा आग्रह धरणाऱ्यांचा इंग्रजी शब्दांना अंध विरोध मुळीच नसताना त्यांना का झोडपलं जातं कळत नाही. (त्यांनी लिहिलेले लेख नुकतेच भाषाशुद्धि नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मांडलेली भाषाशुद्धीची मूलतत्त्वे, त्या पुस्तकात पान ६ वर पाहण्यास मिळतात.)

शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्यांना डबकी निर्माण करणारे अशा शब्दांनी हिणवण्यात येतं. मग शिवाजी राजांनी मराठीतील उपर्‍या फारसी शब्दांना पर्यायी असणार्‍या संस्कृतोद्भव मराठी शब्दांचा (ज्यातील बरेच पूर्वी रूढ होतेच)   राजव्यवहारकोश निर्माण करून डबकीच निर्माण केली, असं म्हणायला हवं. सावरकरांनीही तेच केलं नाही का?

इंग्रजी शब्द टाळणं शक्य नाही, असंही कित्येकजणांचं प्रतिपादन असतं. ते ठीक. पण गरज नसताना इंग्रजी शब्दांची घुसखोरी करून आपल्या भाषेची प्रकृती का बिघडवावी? डॅडी, मम्मी का? स्त्रियांनी नवऱ्याचा उल्लेख मिष्टर का करावा? बोलण्या-लिहिण्यातून अकारण इंग्रजी शब्द का यावेत? संस्थांची नावं, त्यांची लघुरूपं, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिका इंग्रजीत का? स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही देशाचा कारभार पूर्वीच्या शासनकर्त्यांच्या परकीय भाषेत चालणं आपल्याला लज्जास्पद का वाटत नाही? महाराष्ट्रात मराठीसुद्धा नीट वाचता येत नाही, अशा आदिवासींच्या भागांत, वस्तू वापरण्याच्या आणि धोक्याच्या सूचना इंग्रजीत का?

वरच्याप्रमाणं धेडजुजरं मराठी आज महाराष्ट्रात अनेकजण बोलतात. पण, त्यांच्यापैकी कितीजणांना दहा मिनिटं तरी इंग्रजीत अस्खलित बोलता येईल? जी भाषा बोलू ती चोखपणे बोलू असं का वाटत नाही? सर्वांत वाईट म्हणजे ह्यात आपलं चुकतंय, असं कुणालाही वाटत नाही. उलट, त्यातच प्रतिष्ठा वाटते. इंग्रजीच्या तुलनेत आपल्या मनात मराठीबद्दल अकारण न्यूनगंड आहे. इंग्रजी सफाईदार यायला हवं, उच्चारही अगदी इंग्रजांसारखे यायला हवेत, इंग्रजी शिष्टाचारही अवलंबायला हवेत. आपण अंतर्बाह्य इंग्रज व्हावं, असं का वाटावं? मोरपिसं लावल्यानं कावळयाचा मोर होतो का? पण, मोराची पिसं गरुडानं कशाला लावायला हवीत? भारतीय भाषा मुळातच गरुड आहेत. पण, विस्मृतीची व्याधी दूर झाली तर. गरुड कशा? नंतर सांगतो.

दोन भाग: वरील प्रतिपादनाचे आपण दोन भाग करू.

(अ) इंग्रजीनं अन्य भाषेतील शब्द घेतले.

(आ) त्यामुळं इंग्रजी भाषा विकसित झाली. तशी मराठी का होऊ नये?

ह्या दोन प्रश्नांची उत्तरे पाहू.

——

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (अमृतमंथन)

.

ह्या लेखांसंबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवाव्या.

– अमृतमंथन गट

♦ ♦ ♦

.

ह्या विषयासंबंधित खालील लेख सवड काढून अवश्य वाचा :–

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education

जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)

मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी)

भाषा आणि संस्कृती (ले० लोकमान्य टिळक)

‘स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक : अनय जोगळेकर)

महेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण

जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)

शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर) 

.

Tags : ,,,,,,

.

4 thoughts on “इंग्रजीप्रमाणे परभाषेतून मुक्तपणे शब्द उचलण्याविषयी चर्चा (ले० प्रा० मनोहर राईलकर)

  1. Your well-researched article — and especially the implied challenge (आवाहन) in it to keep Marathi pure — or at least purer — is largely irrelevant. You seem to have wholly ignored how a language evolves. It doesn’t evolve by authoritarian fiat or the dictates of literary scholars. It evolves in the speech of the common man — that is to say, the men and women who speak it. You may WISH that it evolve in a particular way, but the force of evolution is too strong to make even an iota of impact on the language. In fact, the same is true, in a larger arena, about the mixture of languages extant in a country. There is little that you and I can do to prevent the eventual extinction of a language.

    After the Norman Conquest of England, the French language assumed a more hallowed position vis-a-vis English in England. But eventually, the language on the tongues of the common man re-asserted its prevalence. Then, because of the colonial dominance of the English people, English assumed such a powerful role as the lingua franca of the world that it began to insinuate itself even into the French language. This bothered the French a whole lot and they attempted to legislate through linguistic panels the elimination of English words. Did it succeed? Of course not. The inclusion of English words in French use remains exactly where it would be if there were no such official panels set up to keep French pure.

    When a language changes from its state at a particular instant in history, some part of the culture embedded in it changes, too. When a language becomes moribund and dies, the adjunct culture dies, too. This is tragic. While I would join you in ruing the dilution and, possibly, the extinction of the Marathi culture we have known and read about and loved, there is little we can do about it. So we may as well embrace the composite culture that replaces it.

    • श्री० अजित डोंगरे ह्यांच्या टिप्पणीला प्रा० मनोहर राईलकर ह्यांनी पाठवलेले उत्तर खालीलप्रमाणे :

      “मी हा लेख मराठी भाषेविषयी, मराठी भाषेत आणि मराठी भाषकांना उद्देशून लिहिला आहे. तर मग त्यावरील चर्चा इंग्रजीत कशाकरता करायची? कृपया आपली टीका मराठीत करा आणि पाठवा. मग मी उत्तर देईन.”

      – अमृतयात्री गट

  2. मराठीचे खच्चीकरण करण्यात मोठा वाचा आहे तो दुर्दैवाने मराठी लोकांचा. त्यामुळे मराठी भाषेचा सामाजिक आधार कमकुवत होत आहे. तेंव्हा मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला प्रधान्य हवे. मराठी भाषेत उपलब्ध शब्दासाठी इंग्रजी पर्याय वापरणे उचित नाही.

    • प्रिय श्री० अरविंद वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे योग्यच आहे. मराठी भाषेच्या आणि सर्वसामान्य मराठी माणसाच्यादेखील अधोगतीला मराठी माणूस स्वतःच जबाबदार आहे. आपल्याच राज्यात आपल्या भाषेत बोलण्याचा त्याला कमीपणा वाटतो आणि तो इतर अमराठी माणसांशीच नव्हे तर इतर मराठी लोकांशीदेखील हिंदी किंवा इंग्रजीतून बोलतो. त्यामुळे महाराष्ट्रात बाहेरून येऊन स्थायिक होऊ इच्छिणार्‍या लोकांना मराठी शिकण्याची आबश्यकताच बाटत नाही. त्यामुळे भारतातील इतर राज्यांतून कोणीही उठून येतो आणि सहजपणे महाराष्ट्रात नोकरी मिळवतो किंवा धंदा काढतो. त्यामुळे मराठी माणसाच्या संधी कमी होतात. तसे करणे इतर राज्यांत किंवा इतर देशांत इतके सहजसुलभ नसतो.

      असो. पण तो वेगळाच विषय आहे. त्याबद्दलही काही लेख ह्या अमृतमंथन अनुदिनीवर आढळतील. सहज नजर फिरवावी. आपल्याला सुरस वाटतील ते लेख वाचावेत. इतर समस्वभावी मित्रांनाही वाचायला द्यावेत.

      आपल्या पत्रात थोडीशी भर घालू इच्छितो. मराठीला केवळ इंग्रजीपासूनच नव्हे तर हिंदीपासूनही धोका आहे, हे मराठी माणसाने ओळखले पाहिजे. विनाकारण हिंदीमधील शब्द स्वीकारून मराठीतील रूढ असलेले अधिक चांगले शब्द आपण उखडून टाकतो आहोत. तेही थांबायला हवे. खालील लेख अवश्य वाचावेत.

      हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-BF

      मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-Kp

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s