आर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)

संपूर्ण भारताचे राज्य मिळवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी आणि त्यावरील आपली मांड बळकट करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी  भारतात नेहमीच  “फोडा आणि झोडा” ह्या रणनीतीचा अवलंब केला. त्याचाच एक भाग म्हणून भारतीयांना आपली समृद्ध संस्कृती, प्राचीन ज्ञानपरंपरा, उत्कृष्ट शिक्षणपरंपरा विसरायला लावणे, भारतीयांच्या मनात  स्वतः न्यूनगंड उत्पन्न करणे तसेच भारतीयांत जात, धर्म, आर्य-द्रविड इत्यादी विविध बाबींच्या आधारे दुही माजवणे आणि त्यायोगे भारतीयांना एकमेकांचा द्वेष करायला लावणे, अशा क्लृप्त्या त्यांनी केल्या. अन्यथा मूठभर इंग्रजांना विशाल, बलाढ्य आणि सुसंस्कृत अशा भारत देशावर दीडदोन शतके अधिराज्य गाजवणे शक्यच झाले नसते.

अशा षड्‍यंत्राचा एक भाग म्हणूनच आर्यांच्या भारतावरील आक्रमणाच्या उपपत्तीचा (Aryan Invasion Theory) खोडसाळ प्रसार करून भारतातील विद्वानांचादेखील बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. (आणि तो बर्‍याच प्रमाणात यशस्वीही झाला.) मात्र आज जगभरच्या विविध क्षेत्रांतील अनेक विद्वानांनी आपापल्या क्षेत्रांत नवनवीन संशोधन करून वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे ह्या उपपत्तीचा फोलपणा उघड करण्याचे प्रयत्न केले आहेत. पण तरीही पाश्चात्य बनावटीचा चष्मा लावून भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करणारे भारतातील भारत-अभ्यासक (Indologists) आजही मूठभर भारतद्वेष्ट्या पाश्चात्य संशोधकांची शेपूट धरून कळतनकळत भारताला कमीपणा आणण्यार्‍या ह्या सिद्धान्ताचाच प्रसार करण्याचाच प्रयत्न करीत आहेत. तसेच आज स्वतंत्र भारतामध्ये स्वतःला निधर्मी (सेक्यूलर), समाजवादी किंवा साम्यवादी म्हणवणारे राजकीय नेतेसुद्धा आपल्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्यांचे पाठीराखे आपल्या अज्ञानामुळे ह्या पोकळ उपपत्तीचे समर्थन करताना दिसून येतात.

पाश्चात्यांनी कपटाने रचलेल्या अशा या खोट्या भारतविरोधी सिद्धांताचा फोलपणा स्पष्ट करणारा डॉ० श्रीकांत तलगेरी यांचा लेख इथे सादर करीत आहोत. ह्या लेखात मुख्यत्वेकरून भाषाशास्त्र, पुराणवस्तुशास्त्र, मूलग्रंथपरीक्षणशास्त्र  ह्या शास्त्रांच्या आधारे उपलब्ध पुराव्यांच्या विविध पैलूंचा विचार केला गेला आहे. ह्या लेखात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धान्त तर खोडून काढलेलाच आहे, शिवाय “सर्व आर्य युरोभारतीय) भाषांची मायभूमी भारतच आहे”, असाही सिद्धान्त मांडलेला आहे.

डॉ० श्रीकांत तलगेरी ह्यांचा तो लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

Aryan Invasion Theory (by Dr. Shreekant Talgeri)

देशप्रेमी मराठीजनांनी मुद्दाम वेळ काढून हा लेख अवश्य वाचावा आणि आपल्या समविचारी मराठी आप्तबांधवांनादेखील तो अवश्य वाचायला द्यावा. स्वतंत्र भारताच्या एकात्मतेच्या तत्त्वाच्या मुळावर घाव घालणार्‍या ह्या देशविभाजक आणि म्हणून देशविघातक मोहीमेच्याविरुद्ध जनजागृती करून तिला लवकरात लवकर मूठमाती द्यायला हवी. ते एक देशभक्तीपर कार्यच ठरेल.

(डॉ० श्रीकांत तलगेरी ह्यांच्या ह्या लेखाचे अंश क्रमशः विवेक साप्ताहिकाच्या डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ ह्या अंकांत प्रसिद्ध झाले होते.)

.

प्रस्तुत लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य नोंदवाव्या. मात्र अमृतयात्री गटातील मंडळींचा स्वतःचा ह्या विषयातील अभ्यास मर्यादित असल्यामुळे काही विशेष शंकांना आणि मुद्द्यांना स्वतः डॉ० तलगेरींच्याशिवाय इतर कोणी उत्तर देऊ शकणार नाही.

– अमृतयात्री गट

.

प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरांच्या संबंधात बरेच लेख अमृतमंथनावर प्रकाशित केलेले आहेत. त्यांच्यापैकी काही खालीलप्रमाणे.

आर्यांचं भारतावर आक्रमण : पुस्तकाचा समारोप (मूळ लेखक – डेव्हिड फ्रॉली) –}} http://wp.me/pzBjo-Qu

भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions) –} भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions)

Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System

A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell –}}  A History of Sanskrit Literature by Arthur A. Macdonell

.

4 thoughts on “आर्यभाषांची मायभूमी भारतच (ले० डॉ० श्रीकांत तलगेरी)

  • प्रिय श्री० मुकुंद निकते यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या आपुलकीच्या आणि कौतुकाच्या पत्राबद्दल आभार.

   भारताच्या प्राचीन संस्कृतीविरुद्धचा अपप्रचार थांबवण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून आपण प्रत्येकाने डॉ० तलगेरींच्या ह्या लेखाचा शक्य तेवढा विस्तृत प्रचार करायला हवा.
   लेखाच्या प्रस्तावनेत म्हणून असे म्हटले आहे की, “देशप्रेमी मराठीजनांनी मुद्दाम वेळ काढून हा लेख अवश्य वाचावा आणि आपल्या समविचारी मराठी आप्तबांधवांनादेखील तो अवश्य वाचायला द्यावा. स्वतंत्र भारताच्या एकात्मतेच्या तत्त्वाच्या मुळावर घाव घालणार्याह ह्या देशविभाजक आणि म्हणून देशविघातक मोहीमेच्याविरुद्ध जनजागृती करून तिला लवकरात लवकर मूठमाती द्यायला हवी. ते एक देशभक्तीपर कार्यच ठरेल.”

   अमृतमंथन अनुदिनीवरील मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संदर्भातील इतरही लेख वाचावे आणि आवडलेले लेख इतरांना अग्रेषित करावे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० अरूण केळकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार. ह्या विषयी आपल्या अमृतयात्री गटापैकी कोणी अभ्यास केलेला नाही. अमृतमंथन अनुदिनीच्या परिवारापैकी कोणाला काही कल्पना असल्यास त्यांनी ती आपल्याला कळवावी असे आम्ही त्यांना इथे आवाहन करतो.

   बहुधा टिळकांना आर्यांच्या भारतावरील आक्रमणाची (आर्य भारताबाहेरून आले अशी) उपपत्ती (Aryan Invasion Theory) मान्य होती. पण आमच्या समजुतीप्रमाणे टिळकांनी मांडलेली उपपत्ती (थियरी) आता मागे पडली असून त्याबद्दल कोणी फारशी चर्चा करीत नाहीत. बहुधा त्याचे खंडन पूर्वीच झाले असावे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s