दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ ! (ले० विद्युल्लेखा अकलूजकर)

आई आपल्याला जन्म देते, बालपणी लालन-पालन करते. पण लवकरच आपल्याला स्वतःच्या पायांवर उभे राहावे लागते आणि स्वकर्तृत्वावरच आपले सर्व जीवनव्यवहार करावे लागतात. जन्मल्याबरोबर आईच्या तोंडून जी भाषा ऐकली, ज्या भाषेनेच पुढे आपल्यावर संस्कार केले आणि आपले विचार-स्वभाव-सदसद्विवेक-व्यक्तिमत्व घडवले, ज्या भाषेतून आपण आपल्या सुख-दुःखाच्या, आनंद-पश्चात्तापाच्या भावना स्वतःशी आणि जिवलगांशी व्यक्त करतो, अशी आपली मायबोली जन्मभर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या मागे आईसारखीच उभी असते आणि आपल्याला वेळोवेळी धीर देत असते, मार्गदर्शन करीत असते. अशा ह्या मायबोलीबद्दल आपल्या आईप्रमाणेच प्रेम, अभिमान, कृतज्ञता, वाटणे आणि तिची काळजी घेणे, जपणूक करणे, रक्षण करणे, हे आपले स्वाभाविक कर्तव्य नाही काय?

कॅनडादेशामधील टोरांटो शहरातील मराठीप्रेमी मंडळींनी चालवलेल्या ‘एकता’ ह्या त्रैमासिकाच्या जुलै १९९४ च्या अंकामध्ये विद्युल्लेखा अकलूजकर ह्या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री-लेखिकेने लिहिलेला संपादकीय लेख इथे पुनःप्रसिद्ध करीत आहोत. कै० गंगाधर रामचंद्र मोगरे ह्या कवीच्या ‘मराठी ग्रंथकारांस प्रार्थना’ ह्या शतकापूर्वी लिहिलेल्या  कवितेतील “दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ !” ह्या ओळीचे सूत्र धरून लेखिकेने हा लेख लिहिलेला आहे. दुर्दैव असे की लेखिकेने जवळजवळ वीस वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीबद्दल खंत व्यक्त केली, त्या परिस्थितीत आज फारसा फरक तर पडलेला नाहीच; किंबहुना थोडीफार आणखीनच अधोगतीच झाली असावी, असे वाटते. त्यामुळे आजही हा लेख तितकाच तात्कालिक, समयोचित वाटतो.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

दे जन्म मात्र माता, भाषा व्यवहार चालवी सकळ (ले० विद्युल्लेखा अकलूजकर)

ह्या लेखात व्यक्त केलेल्या विचारांबद्दल आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम ह्या विषयांवरील अनेक लेख आपल्या ह्या अमृतमंथन अनुदिनीवर प्रसिद्ध झालेले आहेत. नमुन्यासाठी काही निवडक लेखांचे दुवे खाली दिले आहेत. अवश्य वाचून पहा.

पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख)

मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)

समांतर अर्थव्यवस्थासुद्धा चालेल का? (ले० उन्मेष इनामदार)

स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी

महेश एलकुंचवार यांचे विश्व-मराठी-साहित्यसंमेलनातील अध्यक्षीय भाषण

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s