पश्चिम-घाट-तज्ज्ञ-समितीने दिलेल्या अहवालाची सामान्य माणसांना माहिती करून देण्यासाठी श्री० अमित नारकर यांनी लिहिलेला लेख खालील दुव्यावर प्रसिद्ध करीत आहोत.
PASHCHIMGHAT_Article_Amit Narkar
श्री० अमित नारकर यांचा विपत्ता – “amit narkar” <narkaram@gmail.com>
.
exlent article SARKARCHA NISHEDH ASSO…
प्रिय अमित प्रभा वसंत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या भावना प्रकट केल्याबद्दल आभार.
सरकारवर आणि राजकारण्यांवर लोकांमधील असंतोष तेव्हाच लक्षात येतो जेव्हा अधिकाधिक लोक जाहीरपणे विरोधी मते मांडू लागतात, सरकारचा निषेध करू लागतात, तशा आशयाचे लेख आणि पत्रे लिहिली जातात, लोक घोषणा देतात, रस्त्यावर उतरतात, आंदोलन सुरू करतात.
पर्यावरणविरोधी कृत्यांचा ज्यांच्यावर ताबडतोब, सर्वाधिक, थेट घातक परिणाम होतो ती गावातील मंडळी सरकारला फारसा विरोध करू शक्त नाहीत. त्यांच्या बाजूने आपणच काही करायला हवे.
देशात विकास हवा हे खरेच. परंतु काही थोड्या प्रकल्पग्रस्त लोकांनी ताबडतोब आपल्या आयुष्याची होळी करून आणि आपण इतर सर्वांनी आपल्या पुढल्या पिढ्यांचे आयुष्य दुःखदायक करून आज उपभोगलेला विकास कितीसा योग्य आहे?
आपण शहरी, सुशिक्षित, खाऊनपिऊन सुखी असणार्या मंडळींनीही ह्याचा विचार करायला हवा.
अमृतमंथनावरील इतर लेखही अवश्य वाचावे. त्यांच्याबद्दलचे आपले अभिप्राय कळवावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट